AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी येत नसेल तर बॅग भरा आणि निघा, मनसे आक्रमक; परप्रांतियांचे धाबे दणाणले

महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी तसेच ओला-उबेर चालकांना 1 मे पासून मराठी बोलणे सक्तीचे करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या निर्णयावर ठाम असून, माजी खासदार संजय निरुपम यांनी याला विरोध केल्याने राजकीय वाद पेटला आहे. मनसेने 'मी मराठी बोलतो' स्टिकर मोहीम राबवत आक्रमक भूमिका घेतली आहे. परप्रांतीय रिक्षा संघटनांनी 4 मे रोजी संपाचा इशारा दिला असून, मनसेने संपाला विरोध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मराठी येत नसेल तर बॅग भरा आणि निघा, मनसे आक्रमक; परप्रांतियांचे धाबे दणाणले
मराठीच्या मुद्यावरून मनसे आक्रमक
| Updated on: Apr 27, 2026 | 11:51 AM
Share

महाराष्ट्रामध्ये रिक्षाचालक, टॅक्सीचालकांना तसेच ओला आणि उबेर चालकांना मराठी बोलणं सक्तीचं करण्यात आलं आहे. येत्या 1 मे पासून मराठी भाषेचा वापर बंधनकारक करण्यात आला असून शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आडून बसले आहेत. तर शिंदे गटाचेच माजी खासदार संजय निरुपम यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केल्याने राज्यात वाद पेटला आहे. मराठी सक्तीच्या या मुद्यावरून मनसेनेही आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मराठी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात 4 मे रोजी परप्रांतीय रिक्षाचालकांनी संप पुकारला असून, त्याच पार्श्वभूमीवर, मनसेने डोंबिवलीत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजते’ असे स्टिकर्स आता रिक्षांवर झळकू लागले असून, मनसे कार्यकर्त्यानंतर आता खुद्द मनसेचे नगरसेवक या मोहिमेसाठी रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे परप्रांतियांचं मात्र धाबं दणाणलं आहे.

मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीत मनसे आणि परप्रांतीय रिक्षाचालक यांच्यातील वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याण ग्रामीणनंतर आता डोंबिवली शहरातही मनसेने आपली ‘मराठी स्टिकर मोहीम’ तीव्र केली आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत आता मनसेचे आजी-माजी नगरसेवकही प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात मनसेचे नगरसेवक संदेश पाटील आणि नगरसेविका रसिका संदेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून रिक्षांना स्टिकर्स लावले. “मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा,” अशा मजकुराचे हे स्टिकर्स रिक्षांच्या दर्शनी भागावर चिटकवण्यात आले आहेत. यावेळी “मराठी येत नसेल तर बॅग भरून निघून जा,” अशा घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

मराठी बोलण्याची लाज वाटते, अडचण असेल कर खुशाल गावी जावं..

मराठी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात, काही परप्रांतीय रिक्षा संघटनांनी येत्या 4 मे रोजी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. मात्र यावर नगरसेवक संदेश पाटील यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. “महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांचा संप आम्ही एकजुटीने हाणून पाडू. ज्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते किंवा अडचण आहे, त्यांनी खुशाल गावी जावे. राज्य सरकारने या बेकायदेशीर संपावर कठोर कारवाई करावी, अन्यथा मनसे आपल्या शैलीत उत्तर देईल” अस त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येत्या 4 तारखेला मनसे नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप