AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यभरात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, जुन्या नियमात मोठा बदल, कशी असणार प्रक्रिया?

राज्यभरात शिक्षक भरतीचा मार्ग आता मोकळा झाला असून ३१ मे २०२६ पर्यंत पवित्र पोर्टलवर सर्व शाळांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. जुन्या नियमात झालेले बदल आणि भरती प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती येथे वाचा.

राज्यभरात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, जुन्या नियमात मोठा बदल, कशी असणार प्रक्रिया?
teacher
| Updated on: May 05, 2026 | 8:14 AM
Share

राज्यातील हजारो भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ३१ मे २०२६ पर्यंत सर्व रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या भरतीमुळे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, केवळ सध्याचीच रिक्त पदे नव्हे, तर मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे रिक्त होणारी संभाव्य पदे देखील या भरती प्रक्रियेत समाविष्ट केली जाणार आहेत. यामुळे पदसंख्या वाढली जाणार आहे. तसेच जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शैक्षणिक संस्थांना त्यांच्याकडील रिक्त पदांची नोंदणी पवित्र पोर्टलवर करण्यासाठी १ ते ३१ मे हा कालावधी निश्चित करून देण्यात आला आहे.

वशिलेबाजीला चाप बसणार

गेल्या वर्षी पार पडलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेसाठी सुमारे २ लाख २८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील ज्या १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी आपली ‘स्व-प्रमाणपत्रे’ (Self-Certification) पूर्ण केली आहेत. त्यांना या भरती प्रक्रियेत प्राधान्याने सहभागी करून घेतले जाणार आहे.

ही संपूर्ण भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे वशिलेबाजीला चाप बसणार आहे. तसेच सर्व शाळा व्यवस्थापनांना त्यांच्याकडील आरक्षणानुसार (Rooster) बिंदुनामावली तपासूनच जाहिरात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर जून महिन्यात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार शाळांचे पसंतीक्रम नोंदवता येतील.

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागा मुलाखतीशिवाय (केवळ गुणांच्या आधारे) भरल्या जातील. तर खासगी संस्थांना १ जागेसाठी १० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार असेल. उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पात्रतेनुसार विविध शाळांचे पसंतीक्रम ऑनलाईन निवडता येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शाळांमधील शिक्षकांचा तुटवडा दूर होऊन शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर