
एमआरव्हीसीकडून तब्बल 2 हजार 856 वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांच्या खरेदीसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. 12, 15 आणि 18 डब्यांच्या रचनेत नवी लोकल सुरु होणार असल्यमुळे प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होईल. आधुनिक सोयींनी सुसज्ज – स्वयंचलित दरवाजे, मऊ आसनं, मोबाइल चार्जिंग पॉइंट्स देखील ट्रेनमध्ये असणार आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली एकाच गावात 50 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मात्र उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकांमुळे गावातील 50 नोंदी पैकी 5 जणालाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले. हैदराबाद गॅझेट संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरमधून आम्हाला न्याय मिळावा अशी चिंचोली ग्रामस्थांनी अशा व्यक्त केली. भाषांतरामुळे वंशावळीची अडचण असल्याने चिंचोली गावातील 45 वारस कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित आहेत…मुंबई-ठाण्यानंतर आता कल्याणमध्येही झळकले ‘देवाभाऊ’चे बॅनर! छत्रपतींना नमन करतानाचा फडणवीसांचा फोटो – बॅनर लावतंय कोण? मराठा आरक्षणावर तीन जीआरनंतर भाजपचे कॅम्पेन? अशात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
एनडीए खासदारांसाठी रात्रीचे जेवण रद्द करण्याबाबत पंतप्रधान म्हणाले की, पंजाब आणि इतर भागांमध्ये आलेल्या पूर आणि लोकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन त्यांनी हे केले. पंतप्रधान म्हणाले की, देशातील लोक अडचणीत असताना मी रात्रीचे जेवण कसे आयोजित करू शकतो.
काहींना वाटलं माझी राख झाली, इतक्यात भरारी घेतली, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतिलं. फिनिक्स या शब्दावरून फडणवीस यांनी विरोधकांना हा टोला लगावला. मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना फिनिक्स सन्मान पुरस्कार देण्यात आला.
-मराठवाड्याने आपल्याला खासदार आणि 12 आमदार निवडून दिले त्याबद्दल आभार मानायला आलोय, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. – निवडणूक कधीही लागतील त्यामुळे तयारीला लागा, असंही त्यांनी सांगितलं. नेत्यांची निवडणूक संपली आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. – बाळासाहेब सांगायचे की शिवसेनेत शिवसैनिक महत्वाचा आहे. कार्यकर्ता महत्वाचा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे नंतर आहेत प्रथम कार्यकर्ता आहे, असंही ते पुढे म्हणाले..
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आधार हा 12वा दस्तऐवज म्हणून स्वीकारला पाहिजे. जर काही शंका असेल तर आयोगाने चौकशी करावी. आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, परंतु नियमांमध्ये, निवडणूक प्रक्रियेच्या कागदपत्रांमध्ये आधारचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आयोगाने ते 12वे दस्तऐवज म्हणून स्वीकारले पाहिजे.
काठमांडूमध्ये जेंजी निदर्शनांदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. रुग्णालयाने पुष्टी केली आहे की, एकट्या ट्रॉमा सेंटरमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे एव्हरेस्ट रुग्णालयात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलेल्या 3 निदर्शकांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये, बीएसएफ साउथ बंगाल फ्रंटियरच्या 194व्या बटालियनच्या सैनिकांनी नादिया जिल्ह्यातील सुंदर सीमा चौकीजवळ एका भारतीय तस्कराला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे, बीएसएफच्या जवानांनी संशयिताला अडवले आणि त्याच्या कमरेत लपवलेले 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 35 सोन्याची बिस्किटे जप्त केली.
आम्ही गरिबांसाठी आरक्षण आणलं. मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणात जाणार. आरक्षण मिळाल नाही तर मुंबईला जाणारा भाजीपाळा बंद करु, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
वारंवार लढावं लागलं तरी लढणार, समाज मोठा करणार. जितका अपमान करतील तितक्या ताकदीने लढणार. आरक्षण दिल नाही तर नेत्यांना फिरु देणार नाही, असं म्हणत मनोज जरांगेंना सरकारला इशारा दिलाय.
मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत एनडीए खासदारांच्या बैठकीला पोहचले आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत संसदेतील बालयोगी सभागृहात बैठक होणार आहे.उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. पंतप्रधान या बैठकीत दोन्ही सभागृहातील खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मी सर्वात जास्त जवळून सिंचन घोटाळा बघितला आहे. अजित पवारांचं सगळं पाप लपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी तर या पापाला पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे, यात तीळ मात्र शंका नाही”, असं म्हणत पांढरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदीदार आक्रमक
महाराष्ट्र कांदा खरेदी महासंघाने केले आंदोलन
3 वर्ष होवून देखील केंद्राकडून पैसे मिळत नसल्याने खरेदीदार अडचणीत
नाफेड आणि NCCF विरोधात घोषणाबाजी करत जिल्ह्यात आंदोलन
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींच्या वॅक्सीनची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे, त्यांच्याकडून ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही टोळी दुसऱ्या चोरीच्या तयारीत होती अशी माहिती समोर येत आहे.
नंदुरबार शहर आणि परिसरात चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं आहे, जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे विरचक धरणाचा पाणीसाठा सत्तर टक्क्यांवर पोहोचला आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी गावात दुर्दैवी घटना घडली आहे. कौटुंबिक कारणातून हीम्मत महादेव धोंगडे (४१) यांनी आपल्या पत्नी कल्पना धोंगडे (३५) यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर हीम्मत धोंगडे यांनी स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुहेरी घटनेमुळे कोठारी गावात खळबळ उडाली आहे.
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींच्या वॅक्सीन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुसऱ्या चोरीच्या तयारीत असताना आरोपींना अटक झाली आहे.
दिवा परिसरातील ५ लाख नागरिकांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवून पालिकेने ‘आपला दवाखाना’ बंद केल्याचा आरोप दिव्यातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला आहे. कृतीमुळे भारतीय दंड संहिता कलम 166, 269, 336 आणि 304A अंतर्गत जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक चिपळूणमधील धबल प्लाझा हॉलमध्ये सुरू आहे.रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे.
सन 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिल्या आलेल्या पुण्याच्या खेड तालुक्यातील पाळू गावच्या अश्विनी केदारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हिटरचे गरम पाणी अंगावर पडल्याने अश्विनी केदारी भाजल्या होत्या. त्यांच्यावर गेल्या दहा दिवसांपासून पिंपरी- चिंचवड येथील डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते.
नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र कांदा खरेदी महासंघाने आंदोलन केले आहे. 3 वर्ष होवून देखील केंद्राकडून पैसे मिळत नसल्याने खरेदीदार अडचणीत आले आहेत. नाफेड आणि NCCF विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे.
गणेश उत्सवानंतर नवरात्री उत्सवाची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते. त्यात ठाण्यातील नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. याच नवरात्री उत्सवाचे टेंबी नाका येथे मंडप बांधणीचे काम सुरु करण्यात आले आहे.. या वर्षी चारधाम मंदिराचे डेकोरेशन करण्यात येणार असून जवळपास 50 हुन अधीक उंचीचे हे डेकोरेशन करण्यात येणार आहे..
मनसे विभागप्रमुख दिनेश साळवी यांनी, ‘कांदिवलीतील लालजी पाडा संजय नगर परिसर यूपी बिहार झाला आहे. हे लोक कांदिवलीमध्ये गोळीबार, ड्रग्ज आणि मारामारीसारख्या घटना घडवतात आणि पोलिस त्याकडे लक्ष देत नाहीत. सर्व आरोपींचे रेकॉर्ड आहेत, आरोपींना हद्दपार करावे’ असे म्हटले आहे.
मुंबईमध्ये मराठा आरक्षण आंदोलन केल्यानंतर जरांगे पाटील यांनी तब्येत बरी नसल्याने चार दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेतले. आता मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे. त्यावेळी ते म्हणाले अंतरवाली सराटीने महाराष्ट्राला आदर्श दिला.
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे जनावरांचेही मोठे नुकसान, 14 पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. अनेक घरे वाहून गेली आहेत. 38 लाख 19 हजारांचा मदतनिधी बाधितांना वाटप करण्यात आला.
मुंबईमध्ये मराठा आरक्षण आंदोलन केल्यानंतर जरांगे पाटील यांनी तब्येत बरी नसल्याने चार दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेतले. आता ते अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले असून त्याठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
पंजाबमधील पुराबाबत अभिनेता सोनू सूद म्हणाला, “आपल्याला पंजाबला पुन्हा त्याच्या पायावर उभं करायचं आहे. आम्ही जनावरांसाठी चारा, महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स, गाद्या, ताडपत्री या सर्व गोष्टींचं वाटप करत आहोत. मी पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो की ते पंजाबला येत आहेत.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहेत. विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंटचं सादरीकरण होणार आहे. दुपारी 2 वाजता वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाचं सादरीकरण होणार आहे. तर दुपारी 2.45 वाजता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधीकरण आणि एनबीसीसी, हुडको यांचा सामंजस्य करार होणार आहे.
अहिल्यानगर – मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात दशक्रिया मोर्चा काढण्यात आला. मागील ८ दिवसांत महामार्गावर वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, ठेकेदार तसेच संचालकावर गुन्हा दाखल व्हावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री प्राजक्त तनपुरेसुद्धा सहभागी होते.
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू.
ओबीसींचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय फडणवीसांनी घेतलेला नाही. तायवाडे काय बोलतात ते विजय वडेट्टीवारांनी समजून घ्यावं असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
विजय वडेट्टीवारांनी आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडेल.
माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरूम उपसा प्रकरणातला आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. गावकरी आणि डीवायएसपी अंजना कृष्णा तसेच तहसीलदार यांच्यातील आणखी एक संवाद समोर आला. महसूल विभागाने संरक्षण देण्याची मागणी केलेली नसताना डीवायएसपी अंजना कृष्णा इथे कशा आल्या याबाबत गावकरी जाब विचारत आहेत. जर आम्ही बेकायदेशीर म्हणून उपसा केला असेल तर आमचं काम बंद करू मात्र पोलीस अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून आले ते स्पष्ट करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
दोन गटांमधील विट, बॅट, हॉकी काठ्या वापर करून होणारी लढाई मुंबईसारख्या शहरातही पाहायला मिळाली आहे. या लढाईत काठ्यांव्यतिरिक्त विट, हॉकी आणि दगडांचाही वापर करण्यात आला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. कांदिवली लालजी पाडा पोलीस चौकीपासून काही अंतरावर यादव आणि चौहान दोन गटांमधील काठ्या आणि रॉडने मारामारीचा व्हिडिओ समोर आला आहे.
“ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. कारण आम्ही ओबीसी आहोत. यांचा एव्हडा तरफडा चालू आहे, मराठ्यांनी हुशार झाले पाहिजे. मला कुणबीतून आरक्षण पाहिजे. वेळ आल्यावर जशाच तसे बघू” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“कुणाचे एकूण आमची हेळसांड होऊ देऊ नका. मराठ्यांच्या मुलांनी जीआर काढला, मराठ्यांच्या मुलांना कुणबी प्रमाणपत्र द्या. मराठवाडा 100 टक्के आरक्षणामध्ये जाणार. आनंद झाला पण थोडा धीर धरावा. गॅझेटची तात्काळ भूमिका जाहीर नाही केली तर आम्हाला दसरा मेळाव्यात निर्णय घ्यावा लागेल” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
“गॅझेटची तात्काळ भूमिका जाहीर नाही केली तर आम्हाला दसरा मेळाव्यात निर्णय घ्यावा लागेल. आता मराठ्यांचा अपमान करू नका. आपला विजय झाला, पण खूप जणांना पचत नाही. आम्हाला व्हॅलीडीटी सहित प्रमाणपत्र पाहिजे. नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबाद गॅझेट नोंदी नुसार प्रमाणपत्र द्या” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“17 सप्टेंबरच्या आत गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र द्या. मंगळावर किंवा बुधावारी कॅबिनेट घ्या. सरकारने कुठलाही बदल करू नये. गावागावातील समिती कामाला लावा. 17 सप्टेंबरच्या आत निर्णय घ्यावा, अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
बॅनरवर धनंजय मुंडे यांचाही फोटो. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये लावलेल्या बॅनर्सवर झळकला होता फोटो… वाद निर्माण झाल्याने हटविले होते बॅनर. वादग्रस्त बॅनर लावण्यावर पोलिसांनी दिला होता कारवाई करण्याचा इशारा
मुंबईच्या कुर्ला सीएसटी रोडवर मोठी वाहतुकीची कोंडी. चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा. घाटकोपर पासून ते कुर्ला एलबीएस आणि पुढे कलींना युनिव्हर्सिटी पर्यंत ट्रॅफिक जाम.
चांदवड कडून मालेगावकडे जात असलेला एक कंटेनर दुभाजकाला धडकून रस्त्यावर उलटला. या दुर्घटनेमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. मंगरूळ येथील सोमाटोल कंपनीच्या नाक्यावरील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले..
मुंबईचा टिळकनगर सध्या हाॅटस्पाॅट बनलाय, इथे एकाच इमारतीत सात जणांना डेंग्यूची लागण झालीये… नागरीक दहशतीत आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलंय. पावसासोबत डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. डेंगीच्या रुग्णसंख्येत तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ झाली असून मलेरियाचे रुग्ण १७ टक्क्यांनी वाढले आहेत.
आज किंवा उद्या मराठा आरक्षण संदर्भातील निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले जाणार… मराठा आरक्षणाच्या निर्णयावर भुजबळ नाराज… ओबीसीतून आरक्षण देण्याला भुजबळांनी सुरुवातीपासूनच केला होता विरोध… राज्य सरकारने विश्वासात न घेता निर्णय घेतल्याची भावना… मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात छगन भुजबळ पुन्हा मैदानात…. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या हक्कांना धक्का लागू देणार नाही…
देवस्थान विश्वस्त मंडळाने शनिदेवाचा अभिषेक करण्यासाठी मानधन तत्त्वावर पाच पुरोहितांची केली नेमणूक… भाविकांना देवस्थानकडे शंभर रुपयांची अभिषेक पावती करून पुरोहितांकडून अभिषेक करता येणार… अभिषेकासाठी पुरोहितांना स्वतंत्र दक्षिणा देण्याची आता गरज नाही… तर एक हजारांची पावती करणाऱ्या भाविकांना अभिषेकाची शंभर रुपयांची पावती करण्याची गरज नाही…
कल्याण-डोंबिवलीत उद्या पाणीपुरवठा राहणार बंद – तर दुसऱ्या दिवशी ही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार… महावितरणच्या कांबा उपकेंद्रात देखभाल-दुरुस्तीचं कामा साठी राहणार पाणी पुरवठा बंद… कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण भाग आणि टिटवाळा परिसरालाही फटक… “घरोघरी पाणी साठवा” – पालिकेचं नागरिकांना आवाहन
लाखो लिटर पाणी वाया – नागरिकांमध्ये संताप… रात्री उशिरा फुटलेल्या पाईपलाईनची तक्रार नागरिकांकडून पालिकेला… युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू – पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता…
हैदराबाद गॅझेट संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआर मधून आम्हाला न्याय मिळावा अशी चिंचोली ग्रामस्थांची मागणी… धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली एकाच गावात सापडल्या 50 कुणबी नोंदी मात्र उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकांमुळे गावातील 50 नोंदी पैकी 5 जणालाच मिळाले आहे कुणबी प्रमाणपत्र… स्पष्ट भाषांतर नसल्याने आणि वंशावळीची अडचण असल्याने चिंचोली गावातील 45 वारस कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित… तहसीलदारांनी गावात येऊन स्पॉट पंचनामे व घरटी चौकशी करावी,अशी ग्रामस्थांची मागणी