AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुटुंबाच्या जबाबदारीमुळे 12 व्या वर्षी केला डान्स, एका रात्रीत बनली स्टार, आज संपूर्ण बॉलिवूड तिच्या गाण्यावर थिरकतो, ओळखलं का?

12 व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी, एका डान्सने बदललं नशीब. एका रात्रीत झाली स्टार पण इंडस्ट्रीतने केलं दुलर्क्ष. आज 45 वर्षानंतर आवडत्या गाण्यावर असा केला डान्स की सर्वांनी केलं कौतुक.

कुटुंबाच्या जबाबदारीमुळे 12 व्या वर्षी केला डान्स, एका रात्रीत बनली स्टार, आज संपूर्ण बॉलिवूड तिच्या गाण्यावर थिरकतो, ओळखलं का?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 02, 2026 | 12:23 PM
Share

Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी खूपच कमी चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ज्यामध्ये काही अभिनेत्री त्यांच्या चित्रपटामुळे तर काही अभिनेत्री फ्लॉप चित्रपट देऊन त्यामधील गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आल्या. अशीच एक अभिनेत्री 1980 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयाने आणि वेगळ्या शैलीमुळे प्रचंड चर्चेत आली होती. जिचं नाव कल्पना अय्यर.

‘हरी ओम’, ‘जब छाए मेरा जादू’ आणि ‘रम्भा हो’ यांसारख्या सुपरहिट आणि आयकॉनिक गाण्यांमुळे कल्पना अय्यर त्या काळात खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या आवडत्या ठरल्या. अनेक वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर असतानाही त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. अलीकडेच त्यांचा एक नवीन डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावरूनच हे सिद्ध होते की काही कलाकारांची चमक कधीच मावळत नाही.

मात्र या यशामागे एक कटू वास्तवही दडलेले आहे. करिअरच्या शिखरावर असताना देखील कल्पना अय्यर यांना अपेक्षित काम मिळत नव्हते. यशस्वी अभिनेत्री असूनही इंडस्ट्रीकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे नाराज होऊन त्यांनी केवळ चित्रपटसृष्टीच नाही तर देशालाही अलविदा केला. कल्पना अय्यर यांची कहाणी त्यांच्या जन्मापासूनच चित्रपटांशी जोडलेली होती. त्यांचे आई-वडील चित्रपटप्रेमी होते आणि देव आनंद यांचे कट्टर चाहते होते. देव आनंद यांच्या ‘कल्पना’ या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘कल्पना’ ठेवले आणि पुढे हेच नाव तिला इंडस्ट्रीपर्यंत घेऊन गेले.

अवघ्या 12व्या वर्षी कल्पनांवर कुटुंबाच्या खर्चाची जबाबदारी आली. कोणतेही औपचारिक नृत्यप्रशिक्षण नसताना त्यांनी गरजेपोटी गाण्यांमध्ये नृत्य करायला सुरुवात केली. शालेय जीवनात त्यांच्या नृत्याने प्रभावित झालेल्या मुकेश शर्मा या पाहुण्याने त्यांना आपल्या शोमध्ये संधी दिली. येथूनच कल्पनांचा प्रवास आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचला.

पुन्हा एकदा जुन्या डान्सची चर्चा

स्टेज परफॉर्मन्स करत असतानाच त्यांनी एका सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला. उधारचे कपडे, साधे बूट आणि लांब केस यांशिवाय त्यांच्या जवळ काहीच नव्हते. तरीही 1975 साली त्या ‘नेव्ही क्वीन’ स्पर्धेत उपविजेत्या ठरल्या. दुसऱ्याच दिवशी त्यांना ‘फेमिना’कडून मॉडेलिंगची ऑफर मिळाली आणि येथूनच त्यांच्या ग्लॅमर करिअरची सुरुवात झाली.

आज अनेक वर्षांनंतर एका व्हायरल डान्स व्हिडीओमुळे कल्पना अय्यर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या या पुनरागमनाने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून 80च्या दशकातील ही आयकॉनिक डान्सर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना