Maharashtra News LIVE : पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 33 जणांना अटक
Maharashtra News LIVE : अमरावती शहर वगळता अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 22 जून पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडून तीन महिने परवाना रद्द केला जाणार. अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढलेले अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
शालेय साहित्य महागले, नव्या शैक्षणिक वर्षात पालकांचे बजेट कोलमडणार
१५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच विद्यार्थी आणि पालकांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. यंदा शालेय पुस्तके आणि साहित्याच्या किमतींमध्ये तब्बल 10% ते 15% वाढ झाली आहे, तर दुसरीकडे अभ्यासक्रमाची अनेक महत्त्वाची पुस्तके बाजारात अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. त्यातच, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी मिळणाऱ्या शासकीय अनुदानात कपात करण्यात आली असून, यंदा प्रति विद्यार्थी ३०० रुपयांऐवजी केवळ २४० रुपये दिले जाणार आहेत. बाजारात शालेय साहित्याचे भाव गगनाला भिडलेले असताना, सरकारच्या या निर्णयामुळे एवढ्या तुटपुंज्या रक्कमेत गणवेश कसा खरेदी करायचा, असा गंभीर प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे.
-
नाशिक विधान परिषद निवडणूक: गोकुळ गीतेंचे बंड थंडावणार? गिरीश महाजन-उदय सामंत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची पत्रकार परिषद
नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजप नेते गणेश गिते यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेला महायुतीचे प्रमुख नेते आणि मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी वाढवणारे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचे बंड शमवण्यासाठी या बैठकीत यशस्वी मध्यस्थी झाल्याची चर्चा आहे. गोकुळ गिते आपले बंड मागे घेण्याची शक्यता असल्याने, आता नरेंद्र दराडे यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
-
-
अधिक ज्येष्ठ कमला एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी लाखो भाविक दाखल
श्री विठ्ठल दर्शन रांग तब्बल 4 किलोमीटरपर्यंत लांबली. विठ्ठल दर्शनासाठी 12 ते 15 तासांची प्रतीक्षा. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल. प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट आणि मंदिर परिसर भाविकांनी फुलला. कमला एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा अखंड जयघोष…….
-
मोदींच्या कार्यकाळाच्या विक्रमासाठी मनसेची सिद्धिविनायक मंदिरात ऊपरोधिक पुजा
मनसे नेते संदिप देशपांडे, विभाग अध्यक्ष स्वाती खोपकर यांच्यासह अनेक मनसे नेते सोबत करत आहेत पुजा. भाजपकडून काल मोदीछ्या १२ व्या वर्षपुर्ती विक्रमासाठी पूजा करण्यात आली होती मात्र संदीप देशपांडे यांच्याकडून मनसेच्या वतीने मोदींनी अधिक विक्रम केलेले आहेत त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात पूजा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविण्याच्या विक्रमावर मनसेने कालच सोशल मीडियातून उपरोधिक टीका केली आहे.
-
मुंबईत गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र रेडी रेकनर दर
मुंबईतील मालमत्तांच्या मूल्यांकनात मोठा बदल होणार असून गगनचुंबी टॉवर, उच्चभ्रू गृहनिर्माण संकुले, चाळी आणि झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र रेडी रेकनर दर निश्चित केले जाणार आहेत. राज्य सरकारने ‘मायक्रो झोनिंग’ पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. परिसरातील विकास, सुविधा आणि मालमत्तेचे स्वरूप लक्षात घेऊन नवीन दर ठरवले जातील.
-
-
विधान परिषदेच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप नगरसेवकांना दिला कानमंत्र
सोलापूर विधान परिषदेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंची भाजप नगरसेवकांसोबत डिनर डिप्लोमसी. विधान परिषदेला सोलापूर महापालिकेतील 111 मतांपैकी एक दोन मतं सोडली तर सर्व मतं भाजप उमेदवाराला पडतील. आम्ही एकजुटीने मतदान करुन महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणू
-
कुदळवाडीत पोलिसांवर दगडफेक करणार्या 33 जणांना अटक
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीतील कुदळवाडी परिसरात अनधिकृत धार्मिकस्थळांच्या बांधकामांवर मंगळवारी मध्यरात्री कारवाई केली जात असताना जमावाने कारवाईला विरोध करीत पोलिसांवर दगडफेक केली होती. ह्या दगडफेकी प्रकरणात आतापर्यंत ३३ जणांना अटक करण्यात आली आहे, तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. महापालिकेने मंगळवारी पहाटे चिखली-कुदळवाडी आणि पवार वस्ती परिसरातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर अतिक्रमण कारवाई सुरू केली.
-
एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी लाखो भाविक दाखल
अधिक ज्येष्ठ कमला एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी लाखो भाविक दाखल. श्री विठ्ठल दर्शन रांग तब्बल 4 किलोमीटरपर्यंत लांबली. विठ्ठल दर्शनासाठी 12 ते 15 तासांची प्रतीक्षा. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल. प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट आणि मंदिर परिसर भाविकांनी फुलला.
-
अमरावतीमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे मॅनेज झाले असल्याचा आरोप असताना आज अमरावतीमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार. गेल्या तीन ते चार दिवसापासून काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे जिल्हाध्यक्ष व इतर जिल्ह्यातील कोणत्याच नेत्याच्या संपर्कात नसल्याने हर्षजित देशमुख यांच्यावर विविध आरोप होत आहेत.
-
शेत जमिनीच्या वादातून दांडक्याने मारहाण
शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे शेतजमिनीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नव्याने खरेदी केलेल्या शेतात काम सुरू असताना चुलत भावाने मिरचीपूड फेकून लाकडी दांडक्याने तिघांना मारहाण करून जखमी केलं आहे. या घटनेत पती, पत्नी आणि वडील जखमी झाले असून त्यांच्यावर शिरूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शिरूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
मुंबईत गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र रेडी रेकनर दर
मुंबईत गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र रेडी रेकनर दर लागू होणार. मुंबईतील मालमत्तांच्या मूल्यांकनात मोठा बदल होणार असून गगनचुंबी टॉवर, उच्चभ्रू गृहनिर्माण संकुले, चाळी आणि झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र रेडी रेकनर दर निश्चित केले जाणार आहेत. राज्य सरकारने ‘मायक्रो झोनिंग’ पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे.
-
नाशिक विधान परिषद निवडणुकीत पुन्हा मोठा ट्विस्ट
भाजप बंडखोर गोकुळ गीतेंचे बंड थंड होण्याच्या मार्गावर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गोकुळ गीतेंची महत्त्वपूर्ण बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर घडामोडींना वेग. गोकुळ गीते आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा देणार की फक्त प्रचार थांबवणार? याकडे लक्ष.
-
मान्सूनच्या पावसाबाबत चांगली बातमी
मुंबई शहरात अद्याप पावसाची इंट्री झाली नाहीय. प्रचंड उकाडा आणि हवेतील आर्द्रता वाढल्याने मुंबईकरांचे पुरते हाल झालेत. आज उपनगरांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती आणि आसपासच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील 3-4 दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
नाशिक विधान परिषद निवडणुकीत पुन्हा मोठा ट्विस्ट आला आहे. भाजप बंडखोर गोकुळ गीतेंचे बंड थंड होण्याच्या मार्गावर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गोकुळ गीतेंची महत्त्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर घडामोडींना वेग आला आहे. गोकुळ गीते आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा देणार की फक्त प्रचार थांबवणार? याकडे लक्ष आहे. गिरीश महाजन आणि उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये दाखल होणार. प्रसाद हिरे यांच्यानंतर गोकुळ गीतेंची भूमिकाही महायुतीसाठी निर्णायक ठरणार. बिनविरोध होऊ शकणारी निवडणूक गोकुळ गीतेंच्या बंडामुळे राज्यभर चर्चेत आली. गोकुळ गीते अखेर तलवार म्यान करणार का, याचा फैसला आज होऊ शकतो. त्र्यंबकेश्वर नंतर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आज रामकुंड येथे सिंहस्थ ध्वजस्तंभाचे शिलान्यास पूजन. गंगा-गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.