Maharashtra News LIVE : संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर टीकेचा बाण
Maharashtra News LIVE : संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदींना पक्षातील लोकांकडून घेरल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केला आहे. . यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन, राजकारणातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES
-
ईडीने भोंदू अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर
ईडीच्या म्हणण्यानुसार, साधारण 1 हजार किंमतीच्या पुष्कराज व डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी भक्तांना ₹2.62 लाखांना विकण्यात आली. या अंगठ्यांमुळे आर्थिक संकट दूर होईल, व्यवसायात भरभराट होईल आणि दैवी शक्ती लाभेल, असे दावे करण्यात आल्याचा आरोप आहे. तपासात चिंचेच्या बिया सुमारे 100 प्रति किलो दराने खरेदी करून त्या 10 हजार ते 1 लाखांपर्यंत विकल्याचे समोर आले आहे. तसेच 300 ते 500 प्रति लिटर किंमतीचा मध “दैवी मध” म्हणून तब्बल 7 लाख प्रति लिटर दराने विकल्याचा दावा ईडीने केला आहे.
-
धाराशिवमध्ये भाजपच्या अंतर्गत गटबाजीचे दर्शन
सत्काराच्या कार्यक्रमातून आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याचे आयोजक व्यंकटराव गुंड यांची माहिती. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या पत्रिकेत आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांची पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांचे नाव नसल्याने चर्चा. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व्यंकटराव गुंड यांच्या रूपामाता परिवाराच्या वतीने आमदार बसवराज पाटील यांच्या सत्काराचे आयोजन
-
-
रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांनी पाच नागरिकांचा बळी घेतल्यानंतर नाशिक महापालिकेला जाग
नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यास महापालिकेकडून सुरुवात. शहरातील खड्डे बुजवण्यासह रस्त्यांच्या कामांना देखील वेग. कुंभ मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून धारेवर धरल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग
-
पंतप्रधान मोदींना 12 वर्षांत एका मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला- संजय राऊत
‘देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. पंतप्रधान मोदींना १२ वर्षांत एका मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. विद्यार्थी शिक्षणखात्याच्या विरोधात आंदोलन करू लागला. शिक्षण खाते हे तरुणांची पिढी घडवणारं भक्कम खाते असते. कोट्यवधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं. त्याच खात्याला वाळवी लागली. मोदींना माघार घ्यावी लागली. तरुणांनी मोदींचा पराभव केला.
-
इगतपुरी नगर परिषद रोडवर जुन्या इमारतीची भिंत
पहाटेच्या सुमारास भिंत कोसळली. पहाटे रहदारी नसल्याने व आज सुट्टीचा दिवस असल्याने रहदारी नव्हती. सुदैवाने मोठी हानी टळली. इमारतीत कोणी राहत नसल्याने जीवित व वित्त हानी झाली नाही
-
-
गडचिरोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती
गडचिरोली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली तरी जिल्ह्यातील सर्वात मोठा मेडिगट्टा धरणातून ९ लाख ७१ हजार ८८० क्युसेक पाण्याचा विसर्ग. प्राणहिता गोदावरी इंद्रावती नदीला पूर परिस्थिती कायम. तेलंगाना राज्यातील श्री पद्म यल्लमपल्ली धरणातून मोठ्या पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. मेडिगट्टा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग खालच्या स्तरावर होत असल्यामुळे खालच्या स्तरावर असलेले गावे_ गुमलकोंडा मुतापूर, मुकिळीगुट्टा सोमनपल्ली. असरअली क्षेत्रातील छोटी गावे पुराच्या धोक्यात. गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नदीची रुंदी तीन किलोमीटर झालेली आहे. जिल्ह्यातील गोदावरी इंद्रावती प्राणहिता या नद्यांना पूर परिस्थिती कायम असून मेडीगट्टा लक्ष्मी धरणातून याच्या आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मोहम्मद इरफान यांनी
-
साई मंदिराजवळील दोन स्वतंत्र मंदिरे उभारणार
साई मंदिराजवळील लेंडी बागेत श्रीराम आणिर श्रीकृष्णासाठी स्वतंत्र मंदिरे उभारण्यात येणार आहे. साईबाबांच्या काळातील ऐतिहासिक मूर्तींना स्थायी स्थान मिळणार आहे. 108 वर्षांचा ‘वनवास’ अखेर संपणार आहे. भाविक आणि मुर्ती भेट देणा-या नागपुर येथील बुटी परिवाराची इच्छा पूर्ण होणार आहे.
-
Sangli : कृष्णाची पातळी पोहोचली 29. 5 इंच फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना आणि वारणा धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामध्ये कमालीची वाढ होतेय. सांगलीची कृष्णा नदीची पातळी 29.5 फुटांवरती पोहोचलंय. त्याचबरोबर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलंय
-
सोलापुरातील अनगरमध्ये संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध
सोलापूरच्या अनगरमध्ये खासदार संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध करण्यात आला आहे. भाजप पदाधिकारी अजिंक्यराणा पाटलांकडून निषेध करत पुतळ्याचे दहन करण्यात आलं आहे. मंत्री जयकुमार गोरेंवर संजय राऊत यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती. त्याविरोधात अनगरमध्ये भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले.
-
Dhule : धुळ्यातील नकाणे तलाव तुडुंब, पाणीपुरवठ्याची चिंता मिटली
धुळे शहराला दिलासा मिळाला आहे. नकाणे तलाव तुडुंब भरला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे.
धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नाकाणे तलाव १०० टक्के भरून वाहू लागला आहे. गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे अवघ्या चार दिवसांत तलावातील पाणीसाठा ६२ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावरून अद्याप आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल राज ठाकरेंनी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर टीका केली. विरोधकांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर पंजप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालावे अशी सूचना केली. मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन तरुणांशी संवाद साधत आहे. तर काल त्यांनी आंदोलकांनाही माफ केलं. त्यानंतर अभिजीत दीपकेंनी अधिकृतरित्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. विरोधकांकडून मोदींवर टीका होत असताना आज संजय राऊत यांनीही पक्षाच्या मुखपत्रातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच राजकारणातील उलटसुलट चर्चांवरही भाष्य केलं. यासह राज्यातील सर्व घटनांचे अपडेट्स जाणून घ्या