AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मराठा अभ्यासकात चर्चा सुरु, जरांगे आता काय निर्णय घेणार ?

| Edited By: | Updated on: Sep 03, 2026 | 7:25 PM
Share

Maharashtra News LIVE : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. शहरातील विविध स्मशानभूमीं मधील नादुरुस्त विद्युत दाहिन्यांचा मुद्दा मोरे यांनी सभेत उपस्थित केला.

Maharashtra News LIVE : मराठा अभ्यासकात चर्चा सुरु, जरांगे आता काय निर्णय घेणार ?
Breaking news

LIVE NEWS & UPDATES

  • 03 Sep 2026 07:54 PM (IST)

    कोयना धरण 105 टीएमसी भरले, दरवाजे तिसऱ्यांदा उघडणार

    कोयना धरण 105 टीएमसी भरले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रात्री नऊ वाजता कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुट उघडून कोयना धरणातून 3182 कयुसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धरण व्यवस्थापनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

  • 03 Sep 2026 07:40 PM (IST)

    बीड : धुळे-सोलापूर महामार्गावरील गेवराई बायपासवर रास्ता रोको आंदोलन

    मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीडच्या गेवराई बायपासवर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केले. जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. या दरम्यान बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती, यानंतर पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली.

  • 03 Sep 2026 07:27 PM (IST)

    भंडारा : परिणय फुके आणि नरेंद्र भोंडेकर यांच्या समर्थकांमध्ये जुंपली

    भंडाऱ्यात भाजपचे परिणय फुके आणि शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांच्या समर्थकांमध्ये जुंपल्याचे पहायला मिळाले होते. भाजपकडून आमदार भोंडेकरांच्या शिक्षण संस्थेवर नियमबाह्य कामांचे गंभीर आक्षेप घेण्यात आल्याने वाद झाल्याचे समोर आले आहे.

  • 03 Sep 2026 07:14 PM (IST)

    नाशिक – आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिजीत दिपके यांनी दिली भेट

    नाशिक मध्ये गेल्या 17 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांची सीजीपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आज सकाळी आदित्य ठाकरे तर काल राहुल गांधी यांनीही या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती.

  • 03 Sep 2026 06:43 PM (IST)

    मराठा अभ्यासकात चर्चा सुरु, जरांगे आता काय निर्णय घेणार ?

    अंतरवाली सराटीत दीड तास मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड आणि मराठा आरक्षण अभ्यासात चर्चा सुरु आहे. चर्चेनंतर अभ्यासक मनोज जरांगे पाटील यांना निर्णय सांगितला जाणार आहे. मनोज जरांगे यांच्या होकारानंतर ते उपोषण सोडणार की नाही यावर निर्णय होणार आहे.

  • 03 Sep 2026 06:17 PM (IST)

    नेपाळमध्ये अडकून पडलेले 54 भारतीय आज मुंबईत दाखल होणार

    नेपाळमध्ये अडकून पडलेले 54 भारतीय आज मुंबईत दाखल होत आहेत.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सक्रीय असलेल्या ‘शिवसेना मदत कक्षा’ च्या माध्यमातून, या 54 जणांना भारतात परतण्यासाठी शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. आज, मुंबई विमानतळावर सायंकाळी या भारतीयांचे स्वागत करण्यात येणार आहे.

  • 03 Sep 2026 04:56 PM (IST)

    सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणावरील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलली

    सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाशी संबंधित खटल्याची सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या विनंतीवरून सुनावणी पुढे ढकलली.

  • 03 Sep 2026 04:52 PM (IST)

    रियासीमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

    भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. महोरे परिसरात शोध मोहिमेदरम्यान लष्कराने मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एके-47 च्या 140 गोळ्या, पि9 मिमी पिस्तुलाच्या 25 गोळ्या, एक ग्रेनेड, 6 कॅसेट, एक एके मॅगझिन आणि एक पिस्तूल यांचा समावेश आहे.

  • 03 Sep 2026 04:49 PM (IST)

    भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या घरासमोर ठिय्या

    भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या शिंगोली येथील घरासमोर मराठा बांधवांचे ठिय्या आंदोलन केलं. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा बांधवांनी समर्थन देत घोषणाबाजी केली.

  • 03 Sep 2026 04:35 PM (IST)

    कोल्हापुरात राजेश क्षीरसागर, राजू शेट्टी समर्थक आमनेसामने

    कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टी समर्थक आमनेसामने आले आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गावर हा वाद झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तणावाचं वातावरण आहे.

  • 03 Sep 2026 04:32 PM (IST)

    अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्याविरोधात नागपुरातील झाशी राणी चौकात आंदोलन

    अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी जौहर केलेल्या वीर महिलांबाबत ‘कायर’ हा शब्द वापरल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून आंदोलन केलं जातं आहे. नागपुरातील झाशी राणी चौकात आंदोलन केल जात आहे.

  • 03 Sep 2026 03:56 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडमधील अनेक भागांत आज पाणीपुरवठा बंद

    पिंपरी-चिंचवडमधील अनेक भागांत आज पाणीपुरवठा बंद. उच्चदाब वीज जोडणीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद. उद्या सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार

  • 03 Sep 2026 03:46 PM (IST)

    इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावरुन नितीन गडकरींबाबत आक्षेपार्ह मजकूर

    इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावरुन नितीन गडकरींबाबत आक्षेपार्ह मजकूर. आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे उच्च न्यायालयाने आदेश. ‘एक्स’सह अन्य समाजमाध्यमांना आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश

  • 03 Sep 2026 03:36 PM (IST)

    साताऱ्यात वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थीनीने जीवन संपवलं

    साताऱ्यात वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थीनीने जीवन संपवलं. आक्षेपार्ह मजकूर लिहल्याच्या कारणातून विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल. टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात विद्यार्थिनी शिकत होती

  • 03 Sep 2026 03:27 PM (IST)

    CSMT ते सावंतवाडी रेल्वे सेवेच्या उद्धाटनापूर्वी ठाकरे सेना आक्रमक

    CSMT ते सावंतवाडी रेल्वे सेवेच्या उद्धाटनापूर्वी ठाकरे सेना आक्रमक. CSMT रेल्वे स्थानकावर ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक. कार्यक्रमातून अरविंद सावंतांचं नाव वगळल्याने शिवसैनिक आक्रमक. खासदार अरविंद सावंतांमुळे रेल्वे सुरु झाल्याचा ठाकरे सेनेचा दावा

  • 03 Sep 2026 03:19 PM (IST)

    विद्यानंद बापटांवर हल्ला, उद्या आरोपीला कोर्टात हजर करणार-पोलीस आयुक्त

    विद्यानंद बापटांवर हल्ला झाल्यानंतर त्यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिंना ताब्यात घेतलं असून उद्या त्याच्या कोठडीसाठी कोर्टात आम्ही मागणी करणार असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. त्यासोबत त्यांनी सर्वांनी नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचे देखील सांगितले आहे.

  • 03 Sep 2026 03:17 PM (IST)

    विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा संतोष चव्हाण अटकेत

    विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा संतोष चव्हाण अटकेत. हल्लेखोर चव्हाण प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष

  • 03 Sep 2026 03:07 PM (IST)

    विद्यानंद बापट यांना फरासखाना पोलीस स्टेशनला आणलं

    विद्यानंद बापट यांना फरासखाना पोलीस स्टेशनला आणलं. पुणे पोलीस आयुक्तही फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल

  • 03 Sep 2026 03:00 PM (IST)

    आंबिवली स्टेशनवर प्रवाशांचा संताप; लोकलच्या विलंबावरून स्टेशन मास्टर कार्यालयात गोंधळ

    टिटवाळा स्टेशनदरम्यान सुरू असलेल्या कामामुळे अनेक लोकल ट्रेन रद्द आणि उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा संताप दिसून आला. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या अर्धा ते एक तास उशिराने धावत असल्याचा प्रवाशांचा आरोप करण्यात आला. लोकल गाड्या रद्द होत असल्याने संतप्त प्रवाशांनी आंबिवली स्टेशनवरील स्टेशन मास्टर यांच्या केबिनमध्ये जाऊन जाब विचारला.”लोकल उशिराने असेल तर तिकीट काउंटरही बंद करा किंवा प्रवाशांना आधी माहिती द्या,” अशी मागणी करत प्रवाशांनी गोंधळ घातला.

  • 03 Sep 2026 02:50 PM (IST)

    नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थी आंदोलकाची तब्येत खालावली

    नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थी आंदोलकाची तब्येत खालावली. नाशिकच्या ईदगाह मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान उपोषण करणाऱ्या आंदोलकाची तब्येत खालावली. रुग्णवाहिकेमध्ये आंदोलकावर उपचार सुरू आहे. आदित्य ठाकरे भेटीसाठी आलेले असतानाच आंदोलकाची तब्येत खालावली

  • 03 Sep 2026 02:40 PM (IST)

    NCMC कार्डच्या तांत्रिक अडचणींमुळे महिला-ज्येष्ठ नागरिकांचा मनस्ताप

    बस स्थानकावर महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC कार्डच्या सुविधेला तांत्रिक अडचणींचा फटका बसताना दिसतोय. गेल्या तीन महिन्यांपासून कार्डचं रजिस्ट्रेशन आणि वितरण सुरू असलं, तरी सर्व्हर आणि सॉफ्टवेअरमधील अडचणींमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शिर्डी , राहाता आणि श्रीरामपुर बस स्थानकांचा आढावा घेतला असता सर्वत्र सर्वर डाऊनची समस्या भेडसावत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय

  • 03 Sep 2026 02:30 PM (IST)

    अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम

    वडीगोद्री वरून अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले आहे. पार्किंग देखील फुलं झाले आहे. मोठ्या संख्येने समाज बांधव दुचाकी आणि चारचाकी वाहन येत असल्याने ट्राफिक जाम होत आहे. वाहन जात नसल्याने मराठा बांधव वडीगोद्रीवरून पायी चालत अंतरवाली सराटी गाठत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या ठिकाणावरून बाईक रॅली त्याचबरोबर समाज बांधव भेट देण्यासाठी येत असल्याने वाहनांची गर्दी वाढली आहे.

  • 03 Sep 2026 02:20 PM (IST)

    जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर-पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे

    बोदवड जामठी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका आरोपीने अत्याचार केल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला आली त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. जमावामुळे आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं व त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक देखील केली आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर करणार आहोत . मुलगी अल्पवयीन नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष होता. मात्र पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले व आरोपीला ताब्यात घेऊन ग्रामस्थांना शांत केले . संशयीताची गुन्हेगारी पार्श्वभूमी हे पोलिसांकडे रेकॉर्डवर नसून मात्र अजूनही अशी काही प्रकार घडले असतील तर गोपनीय रित्या तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. जमाव संतप्त झाला होता मात्र पोलीस वेळीच पोहोचले. या घटनेत दगडफेक देखील झाली असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर देखील करण्यात आला होता.

  • 03 Sep 2026 02:10 PM (IST)

    जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ गेवराई शहर देखील कडकडीत बंद

    जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर गेवराई शहर देखील कडकडीत बंद दिसून आले. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई शहरातून अंतरवालीकडे बाईक रॅली काढण्यात आली. जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत गेवराई शहर देखील आज कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे.

  • 03 Sep 2026 02:00 PM (IST)

    बीड जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर गेवराई शहर देखील कडकडीत बंद

    बीड- मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर गेवराई शहर देखील कडकडीत बंद पाळण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई शहरातून अंतरवालीकडे बाईक रॅली काढण्यात आली. जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत गेवराई शहर देखील आज कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे.

  • 03 Sep 2026 02:00 PM (IST)

    सरकारचे शिष्टमंडळ अंतरवालीत जाण्याची शक्यता

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पुन्हा सरकारचे शिष्टमंडळ व अधिकाऱ्यात बैठक सुरू आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामान मंत्री मकरंद आबा पाटील आमदार प्रसाद लाड, खासदार संदिपान भुमरे व विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यात बैठक सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासंदर्भात बैठकीत चर्चा सुरू आहे. तीन दिवसांमध्ये शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांमधील ही चौथी बैठक सुरू आहे.बैठकीनंतर अधिकारी किंवा स्वतः शिष्ट मंडळ बैठकीत झालेले निर्णय घेऊन आंतरवलीला जाण्याची शक्यता आहे.

  • 03 Sep 2026 01:51 PM (IST)

    विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून सुरू

    सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. हल्लेखोर संतोष चव्हाण कोथरुडच्या राऊतवाडी परिसरात राहतो. हल्लेखोर संतोष चव्हाण प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष आहे.

  • 03 Sep 2026 01:41 PM (IST)

    बीड- मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ केज शहरात कडकडीत बंद

    बीड- मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ केज शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आल्यानंतर बीडसह जिल्ह्यातील सर्व शहरं आणि ग्रामीण भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. केज शहरात देखील सर्व आस्थापना बंद ठेवून जरांगे पाटलांचा समर्थन देण्यात आलं.

  • 03 Sep 2026 01:28 PM (IST)

    अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबई-पुणे बूलेट ट्रेनची घोषणा

    अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबई-पुणे बूलेट ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. “300 पेक्षा अधिक स्पेशल ट्रेन गणपतीत सुरू करण्याचे आश्वासन मी निवडणूक दरम्यान केले होते. यंदा आम्ही ३५० स्पेशल ट्रेन सुरू करतोय. गरज लागल्यास आणखी २० ट्रेन सोडण्यात येतील. मुंबईसह परिसरात रेल्वेची १८ हजार कोटींची कामे सुरू आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

  • 03 Sep 2026 01:20 PM (IST)

    विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण लांच्छनास्पद- निलम गोऱ्हे

    विद्यानंद बापट यांना मारहाण झाली ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई व्हावी. मी त्यांना फोन करून विचारपूस करणार आहे, त्यांची भेटही घेणार आहे. बापट यांच्या डीजेच्या भूमिकेशी मी सहमत आहे, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.

  • 03 Sep 2026 01:10 PM (IST)

    विद्यानंद बापट यांनी मोठा विषय हाती घेतला आहे. ही तर आता सुरुवात- असीम सरोदे

    “विद्यानंद हे समाजाला जागवण्याचं काम करत आहेत. आतापर्यंत समाजाला जागवण्याचं काम करणाऱ्यांना पुण्यात शेळाचे गोळे खावे लागले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले.. यांचं उदाहरण माहितच आहे. आता ट्रोलिंगद्वारे शिव्या खाव्या लागत आहेत, कधीकधी मारसुद्धा खावा लागतोय. विद्यानंद बापट यांनी मोठा विषय हाती घेतला आहे. ही तर आता सुरुवात आहे,” अशी प्रतिक्रिया असीम सरोदेंनी दिली.

  • 03 Sep 2026 01:00 PM (IST)

    विद्यानंद बापट यांना मारहाणप्रकरणी कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांची प्रतिक्रिया

    “पुणे ही जशी चांगुलपणाची प्रयोगशाळा आहे तशी काहीजणांसाठी वाईटपणाचीही प्रयोगशाळा झाली आहे, हे दुर्दैवाने मान्य करावं लागेल. ज्या कट्टरवादी शक्ती पुण्यात वाढत आहेत, पुण्यातून प्लॅनिंग करून सगळीकडे जात आहेत, त्यापैकी कोणीतरी एक भामटा आहे, त्यानेच विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला आहे. माझं बापट यांच्याशी बोलणं झालं असून ते सुखरुप आहेत. परंतु मुळात आपल्यापेक्षा वेगळं मत काही जणांचं असेल तर ते मान्यच करायचं नाही, अशी ही प्रवृत्ती आहे,” अशी प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी दिली.

  • 03 Sep 2026 12:47 PM (IST)

    घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्मा.. मारहाण होताच विद्यानंद बापटची प्रतिक्रिया

    विद्यानंद बापट हे टीव्ही ९ मराठीशी बोलत असताना अचानक त्यांना हाणलं. त्यानंतर त्यांनी, तुम्ही पाहात होतात. त्याने का केला कारण मी सशस्त्र नव्हतो हे पाहून त्यांनी हल्ला केला. किंवा आजूबाजूला पोलीस नव्हते हे पाहून त्याने हल्ला केला. जर पोलीस असते तर ते सशस्त्र. टेकनिकली पोलीस इथे आहेत पण त्यांच्याकडे रिव्हॉलवरच नाहीये. हे बघून ते करतायेत. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्. त्याला फक्त चीप पब्लिसिटी पाहिजे होती असे म्हटले.

  • 03 Sep 2026 12:30 PM (IST)

    फडणवीसांनी गुंड आवरावेत- सुप्रिया सुळे

    पुण्यातील टिळक रोड येथे विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आली. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी, लोकशाही पद्धतीने भूमिका मांडणाऱ्यावर माध्यमांशी बोलताना मारण्याची हिम्मत कशी होते? ही गुंडगिरी करणाऱ्याच्या पाठिशी कोण? याचं गृहमंत्री फडणवीसांना उत्तर द्यावं लागेल.  महाराष्ट्राची बदनामी होतेय, फडणवीसांनी गुंड आवरावेत असे म्हटले आहे.

  • 03 Sep 2026 12:20 PM (IST)

    सत्ताधारी मंडळींच्या पाठिंब्याने मजल थेट मारहाणीपर्यंत- प्रशांत जगताप

    “सत्ताधारी मंडळींच्या पाठिंब्याने काहींची मजल थेट मारहाणीपर्यंत पोहोचली.. पुण्यात भाजपची दादागिरी कशी वाढली, हे याचं उदाहरण….” विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीवर प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया.

  • 03 Sep 2026 12:10 PM (IST)

    टीव्ही ९ मराठीशी बोलताना विद्यानंद बाप यांना मारहाण

    विद्यानंद बापट हे टीव्ही ९ मराठीशी बोलत गणेशोत्सवातील डीजेबाबत स्वत:ची भूमिका मांडत होते. त्यावेळी एक तरुण अचानक आला आणि त्याने विद्यानंद बापट यांना मारहाण केली.

  • 03 Sep 2026 11:58 AM (IST)

    पनवेल सायन मार्गावर भीषण अपघात

    पनवेल सायन मार्गावर भीषण अपघात. आयशर टेंपो थेट डिव्हायडरला धडकल्याने झाला अपघात. चालक गंभीर जखमी, वेळेचे भान राखत अग्निशमन दलाच्या जवानांनी चालकाला नेले रुग्णालयात. गाडीचे मोठे,नुकसान तर काही काळ वाहतूक कोंडी

  • 03 Sep 2026 11:54 AM (IST)

    धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येडशी आणि सरमकुंडी येथे रस्ता रोको आंदोलन

    धाराशिव जिल्ह्यातील येडशी आणि सरमकुंडी फाटा येथे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा बांधवांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन केलं.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी धाराशिव जिल्हा आज कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे तर राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्यामुळे काही काळ सोलापूर धुळे महामार्गावर ती वाहतूक ठप्प झाली होती

  • 03 Sep 2026 11:51 AM (IST)

    येवला-नांदगावच्या मराठा समाज बांधवांची कोटमगाव येथे बैठक

    अंतरवेली सराटी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बैठकीचे आयोजन…मुंबईत गनिमी काव्याने प्रवेश करण्याच्या नियोजनावर चर्चा…येवला-नांदगावमधून मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवेली सराटीकडे नेण्याचा निर्धार…मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकीत सविस्तर चर्चा… आंदोलनाच्या पुढील रणनीतीबाबतही बैठकीत खलबत…

  • 03 Sep 2026 11:45 AM (IST)

    कोल्हापूर सायबर पोलिसांची कारवाई

    कोल्हापूर सायबर पोलिसांची कारवाई, १ कोटींचे ४१० मोबाईल हस्तगत, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मोबाईल मालकांना परत दिले.

  • 03 Sep 2026 11:41 AM (IST)

    बामणी फाटा मार्केट कडकडीत बंद,बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत, नांदेडच्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने बामणी फाटा येथील मार्केट कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. या बंदला व्यापारी वर्गाने सर्व दुकाने बंद ठेवून मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिलाय. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय.

  • 03 Sep 2026 11:38 AM (IST)

     सीजीपीचे अभिजीत दिपके आज आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देणार

    सीजीपीचे अभिजीत दिपके आज आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देणार. गेल्या 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर नाशिकमध्ये आंदोलन सुरू. संध्याकाळी उपोषणस्थळी जाऊन अभिजीत दिपके विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि प्रश्नांवर करणार चर्चा. आदित्य ठाकरे देखील आज आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी करणार चर्चा. काल राहुल गांधी यांनीही आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांची घेतली होती भेट

  • 03 Sep 2026 11:35 AM (IST)

    परभणीच्या चुडावा येथे मराठा तरुणाचं टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन

    परभणीच्या चुडावा येथे मराठा तरुणाचं टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनातं शोले स्टाईल आंदोलन. सरकारने आजच्या आज जारांगे पाटील यांच्या मागण्या माण्य नं केल्यास टॉवर वरून उडी घेत आत्महत्या करणार असल्याचा तरुणाचा सरकार ला इशारा. नागनाथ गुंडाळे असं आंदोलन करणाऱ्या तरुणांच नाव

  • 03 Sep 2026 11:32 AM (IST)

    कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी

    सीएसएमटी–सावंतवाडी रोड रेल्वेगाडी लवकरच पुन्हा प्रवाशांच्या सेवेत. आज, ३ सप्टेंबरपासून रेल्वेगाडी मार्गस्थ होणार. मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा ठरणार महत्त्वाची. चाकरमानी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी प्रवासाची अतिरिक्त सुविधा उपलब्ध. मुंबईहून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या प्रवाशांना फायदा. सणासुदीच्या काळातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन सेवा सुरू. कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीचा पर्याय मिळणार. गाडीचे वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती तपासण्याचे आवाहन. प्रवाशांनी तिकीट उपलब्धता पाहून प्रवासाचे नियोजन करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

  • 03 Sep 2026 11:29 AM (IST)

    सावंतवाडी रेल्वे सेवेचं उद्धाटन होण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गट सीएमएमटी स्थानकावर आक्रमक

    सावंतवाडी रेल्वे सेवेचं ऊद्घाटम होण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गट सीएमएमटी स्थानकावर आक्रमक. शिवसेना विभाग प्रमुख संतोष शिंदे कार्यकर्त्यांसोबत पोहोचले सीएसएमटी स्थानकावर. खासदार अरविंद सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे सुरू झाल्याचा शिवसैनिकांचा दावा. त्याचं नाव रेल्वे प्रशासनाने कार्यक्रमातून वगळल्याने शिवसैनिक आक्रमक

  • 03 Sep 2026 11:25 AM (IST)

    जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बीड जिल्हा कडकडीत बंद

    छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मराठा आंदोलकांनी बाईक रॅलीला सुरुवात केली असून गेल्या एका तासापासून बाईक रॅली सुरूच‌ आहे. बाईक रॅली सोबत पोलिसांचा तगडा बंदोबस्त. रॅलीत जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत सुरू असलेला आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन.

  • 03 Sep 2026 11:21 AM (IST)

    बोदवड परिसरात तणावपूर्ण शांतता

    बोदवड परिसरात खाजगी क्लास चालकाकडून मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. संशयताच्या मूळ गावी त्याची 1 चार चाकी 2 मोटरसायकली जाळण्यात आल्या. संतप्त जमावाकडून त्याच्या घराची दगडफेक करत तोडफोड करून दुसऱ्या वाहनांची मोठी तोडफोड करण्यात आली या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी शांतता असून कुठलीही अफवा पसरू नाही असा आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने केला जात आह. संशयित हा पोलिसांच्या ताब्यात आहे.

  • 03 Sep 2026 11:19 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ माजलगाव कडकडीत बंद

    मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ माजलगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकासह दोन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला यावेळी काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.

  • 03 Sep 2026 11:15 AM (IST)

    जालना -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मराठा आंदोलकांनी केला रास्ता रोको

    जालना -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मराठा आंदोलकांनी केला रास्ता रोको. शेलगाव परिसरात मराठा समाज बांधव एकवटले,जोरदार घोषणाबाजी करत केला सरकारचा निषेध व्यक्त. मनोज जरांगे यांच्या समर्थनात मराठा समाज बांधव रस्त्यावर,रस्ता रोको आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग पाहायला मिळतोय. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6 वा दिवस असून सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका होत नसल्याचं म्हणणं.

  • 03 Sep 2026 11:11 AM (IST)

    नांदेड – जिल्ह्यात आज ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन

    नांदेड – जिल्ह्यात आज ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन. महादेव पिंपळगाव पाटीवर महामार्ग आडवील्यानंतर आता शहरातील भवानी चौकात रास्ता रोको आंदोलन. निळा मार्गे वसमत हिंगोली आणि पूर्णा मार्गे परभणी महामार्ग आंदोलकांनी अडवला. जरांगे पाटलांच्या मागण्याला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच रास्ता रोको आंदोलन.

  • 03 Sep 2026 11:07 AM (IST)

    परभणी मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाच्या समर्थनात मराठा समाजाचा मोर्चा

    परभणी मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाच्या समर्थनात मराठा समाजाचा मोर्चा. छत्रपती शिवाजी महाराज उद्या परिसरातून मोर्चाला सुरुवात. मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलकं सहभागी. आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठा च्या घोषणा.

  • 03 Sep 2026 11:03 AM (IST)

    शिवसेना पक्षप्रमुखांची निवड लोकशाही पद्धतीने – संजय राऊत

    संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या वकिलाच्या युक्तिवादावर भाष्य केलं.  ‘शिवसेना पक्षप्रमुखांची निवड लोकशाही पद्धतीने झाली. लोकशाही नाही म्हणणाऱ्या शिंदेंची निवड देखील लोकशाही पद्धतीने झाली. पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं का नाही, हे बोला, असा सवाल संजय राऊतांनी केला.

  • 03 Sep 2026 10:53 AM (IST)

    नवी मुंबईत मुदत संपलेली सलाईन दिलेल्या व्यक्तीचा रात्री मृत्यू

    नवी मुंबईतील वाशी रुग्णालयात काल एक्सपायरी सलाईन दिलेल्या व्यक्तीचा रात्री मृत्यू झाला आहे.  ३१ ऑगस्ट रोजी ताप आल्याने संबंधित व्यक्तीला उपचारासाठी वाशीमधील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते.  उपचार सुरू असताना त्यांना एक्सपायरी झालेली सलाईन लावली असल्याचे मुलाच्या लक्षात येताच त्यांनी डॉक्टरांच्या निदर्शनात आणून दिले. त्यानंतर त्यांना अंगाला खाज आणि खोकला त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • 03 Sep 2026 10:49 AM (IST)

    सरकारचं शिष्टमंडळ पु्न्हा मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार

    मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.  सरकारचे शिष्टमंडळ तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाण मांडून आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंदआबा पाटील , आमदार प्रसाद लाड संभाजीनगरमध्येच आहे. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये शिष्टमंडळाची बैठक होईल.  त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे.

  • 03 Sep 2026 10:43 AM (IST)

    मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी लातूरमध्ये कडकडीत बंद

    लातूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बाजारपेठ आणि शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. मराठा आंदोलकांनी रस्त्यावर उतरत बंद पाळण्याचे आवाहन केलेले आहे. त्यामुळे लातूरच्या सर्वच रस्त्यांवरील दुकाने बंद असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी लातूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

  • 03 Sep 2026 10:35 AM (IST)

    MHT-CET 2026 परीक्षेच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप

    – MHT-CET 2026 परीक्षेच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.  4 लाख 59 हजार 493 विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.  Response Sheet मध्ये फेरफार, परीक्षा केंद्र मॅनेज केल्याचेही आरोप आहे.  तक्रारदार नारायण शिंगारे आज आझाद मैदान पोलिसांत निवेदन देणार आहे. तसेच FIR दाखल करून सखोल फौजदारी चौकशीची मागणी करणार आहेत.

  • 03 Sep 2026 10:14 AM (IST)

    मराठा आंदोलक पेटले, नांदेड-नागपूर महामार्गावर रास्तारोको

    नांदेड नागपूर महामार्गावरील महादेव पिंपळगाव पाटीवर रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आज नांदेड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली.  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला सकल मराठा समाजाने पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यावरून सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.

  • 03 Sep 2026 10:07 AM (IST)

    मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये माजरांचा मुक्त संचार

    मुंबई  कॅन्टीनमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. BMC मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये मांजरांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे.  जेवणाच्या प्लेटमधील अन्न मांजर खात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.  काही दिवसांपूर्वी ताकात माशी, भजीमध्ये प्लास्टिक आढळले होते. तक्रारीनंतर FDAने कारवाई करूनही कॅन्टीनची दुरवस्था कायम असल्याचे दिसत आहे.

  • 03 Sep 2026 09:42 AM (IST)

    न्यायदेवतेने सरकारला कडक शब्दात सल्ला दिलाय – शरद पवार

    “सरकारने स्वीकारलेलं धोरणं कसं चुकीचं आहे? हे न्याय देवतेने स्पष्टपणे सांगितल. न्यायदेवतेने सरकारला कडक शब्दात सल्ला दिला आहे, तुम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेतले नाहीत, तर आम्हाला निर्णय घ्यावे लागतील” असं शरद पवार म्हणाले.

  • 03 Sep 2026 09:20 AM (IST)

    कामं सुरू होण्याआधीच कंत्राटदारांना मोबदला देण्याची घाई

    मुंबई महापालिकेत कामे सुरू होण्याआधीच कंत्राटदारांना मोबदला देण्याची घाई. कमी खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी स्थायी समितीत प्रशासनाची धावपळ. ४० प्रस्तावांपैकी २१ प्रस्ताव स्थायी समितीने सभेत राखून ठेवले. कामे पूर्ण झाल्यानंतरच पैसे देण्याऐवजी काम सुरू होण्यापूर्वीच मोबदला देण्यावरून आक्षेप.

  • 03 Sep 2026 09:18 AM (IST)

    धाराशिव मध्ये आज कडेकोट बंद

    जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याच्या मराठा बांधवांच्या अहवानाला प्रतिसाद देत धाराशिव मध्ये आज कडेकोट बंद पाळण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा बांधवांकडून आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

  • 03 Sep 2026 09:17 AM (IST)

    बंदला परभणीकरांकडून कसा प्रतिसाद?

    मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला परभणीकरांकडून प्रतिसाद.अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळी आस्थापने दुकाने बंद.शहरातील रस्त्यांवर देखील शुकशुकाट.

  • 03 Sep 2026 09:16 AM (IST)

    गडचिरोली-सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप

    गडचिरोली-सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप. अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही हानी नाही. नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगावी असं जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचं आवाहन. गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून त्याचे केंद्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील राखीव. वन

  • 03 Sep 2026 09:14 AM (IST)

    चंद्रकांत पाटील यांच्यावरीलअश्लील टीका संतोष पंडितला भोवली

    मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील अश्लील टीका संतोष पंडित यांना भोवली. संतोष पंडित यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल. कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये काल तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी संतोष पंडित यांना केली अटक. कोथरूड पोलिसांनी केली अटक. गेल्या आठवड्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर संतोष पंडीत यांनी रील्स बनवून खालच्या शब्दात केली होती टीका. या प्रकरणी काल एका महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केली अटक. संतोष पंडितच्या अडचणीत वाढ.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा आज सहावादिवस आहे. आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याचे मराठा बांधवांचे आवाहन. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचं मराठा आंदोलकांकडून आवाहन करण्यात आलं आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज दिली जिल्हा बंदची हाक.गडचिरोली -सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप. अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही हानी नाही नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगावी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचं आवाहन.गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

Published On - Sep 03,2026 9:13 AM

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच