Maharashtra News LIVE : सोलापूर : धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात आंदोलन

टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे, राज्यात मलेरियाचं संकट डोकं वर काढत आहे. अशात देश, विदेशातील, राज्य, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग...

Maharashtra News LIVE : सोलापूर : धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात आंदोलन
| Edited By: | Updated on: May 09, 2026 | 10:04 AM

टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार असून गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतर प्रयत्नाचे निदा खानवर हिच्यावर गंभीर आरोप आहेत. तर दुसरीकडे मेट्रो 5 च्या विस्तारासाठी 18 हजार 130 कोटींच्या निधीला मंजूरी देण्यात आली असून कल्याणपासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरपर्यंत होणार मेट्रोचा विस्तार होणार आहे. तर राज्यात मलेरियाच्या रुग्णांची देखील वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षी मलेरियाच्या एकूण 23 हजार 247 रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी 27 रुग्णांचा मृत्यू झालातर, एकट्या मुंबईत 10 हजार 162 रुग्ण सापडले असून, 7 रुग्ण मृत पावले आहेत… अशात देश, विदेशातील, राज्य, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Apr 2026 06:58 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादनात पाच वर्षांत ४२ टक्क्यांची वाढ

    जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादनात पाच वर्षांत ४२ टक्क्यांची वाढ

    तर जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात सुमारे ३३ टक्क्यांची वाढ

    कृषी विभागाकडून आकडेवारी जाहीर

    परंतु केळीला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज

     

  • 27 Apr 2026 06:45 PM (IST)

    यवतमाळमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

    यवतमाळमध्ये अनपेक्षितपणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. बँकेवर तातडीने प्रशासक नेमण्यात आले आहेत. शासनाच्या या धडक निर्णयामुळे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने प्रलंबित स्थिती निर्माण झाली होती. त्यावर शिक्कामोर्तब करीत शासनाने थेट हस्तक्षेप केला आहे.

  • 27 Apr 2026 06:37 PM (IST)

    वर्धा जिल्ह्यात आज पुन्हा 46. 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    वर्धा जिल्ह्यात आज पुन्हा 46. 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    वर्धा जिल्ह्यात तापमानातील वाढ कायमच

    वाढत्या उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण

    वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना हाय अलर्ट

     

  • 27 Apr 2026 06:15 PM (IST)

    जुन्नर तालुक्यात उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना महिलेचा मृत्यू

    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात उष्णतेचा वाढता तडाखा आता जीवघेणा ठरत असल्याचं समोर आलं आहे. निमगाव सावा येथे शेतात काम करत असताना एका शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • 27 Apr 2026 04:54 PM (IST)

    गडचिरोलीत 42 डिग्री तापमानाची नोंद

    गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला असून सध्या मागील तीन दिवसापासून 42 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर न पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  • 27 Apr 2026 04:40 PM (IST)

    सोलापूर : धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात आंदोलन

    बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात अक्कलकोट काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या चुकीच्या विधानाच्या निषेधार्थ काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.

  • 27 Apr 2026 04:26 PM (IST)

    हातकणंगले लोकसभा निवडणूक मी लढणार : प्रकाश आवाडे

    हातकणंगले लोकसभा मतदार संघातून येणारी लोकसभेची निवडणूक माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी लढवणार असल्याची घोषणा भाजपच्या मेळाव्यात केली आहे. सध्या हातकणगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने निवडून आले आहेत, त्यामुळे येणाऱ्या 2029 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार असे दिसू लागले आहे.

  • 27 Apr 2026 04:16 PM (IST)

    परभणी – पाणी येत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

    जायकवाडी कालव्यात पाणी येत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पाटबंधारे विभागात जाब विचारण्यासाठी गेल्या नंतर दालनात अधिकारी हजर नसल्याने स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी दालनातून खुर्ची बाहेर ओढत आंदोलन करण्यात आलं. जो पर्यंत 1 हजार क्यूसेक पाणी सोडलं जात नाही तो पर्यंत अधिकाऱ्यांची खुर्ची परत करणार नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

  • 27 Apr 2026 03:55 PM (IST)

    परभणीत तीव्र ऊनाचा केळीच्या बागांना फटका

    परभणीत तीव्र ऊनाचा केळीच्या बागांना फटका…परभणीत तापमान 43 अंश पार…उन्हामुळे केळीचे खांब जमिनीवर कोसळत आहेत…शेतकऱ्यांना आर्थिक फटका…

  • 27 Apr 2026 03:45 PM (IST)

    नाशिकमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं सैनिकाची 22 लाखांची फसवणूक

    नाशिकमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं सैनिकाची 22 लाखांची फसवणूक. एसआयपीच्या नावाखाली विश्वास संपादन करून कागदपत्रे घेतली. फिर्यादीच्या नावावर बँकेत कर्ज काढून रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली. जून 2025 मध्ये प्रकार घडला, एप्रिल 2026 मध्ये गुन्हा दाखल. मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा, आरोपीचा शोध सुरू.

  • 27 Apr 2026 03:30 PM (IST)

    रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी

    राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीने लागू करण्याच्या निर्णयावर विविध संघटनांकडून प्रतिक्रिया उमटत असून, या निर्णयाला किमान सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप ट्रान्सपोर्ट सेल आणि नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले आहे.

  • 27 Apr 2026 03:15 PM (IST)

    कोराडीत तुळजाभवानी छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देतानाची मूर्ती बसवण्यात आलीय

    नागपूरच्या कोराडीत तुळजाभवानी छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देतानाची मूर्ती बसवण्यात आली आहे…कोराडीच्या प्रसिद्ध महालक्ष्मी जगदंबा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मूर्ती बसवण्यात आलीये…

  • 27 Apr 2026 02:45 PM (IST)

    रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेबाबत मंत्रालयातील बैठकीत मोठा निर्णय

    राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्रालयातील परिवहन विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी शिकणारच नाही असं चालणार नाही. मुजोरी चालणार नाही. मराठी शिकणार नाही. पण महाराष्ट्रात धंदा करणार हे चालणार नाही. तुम्हाला मराठी शिकावीच लागेल असे म्हटले आहे. आम्ही मुदत द्यायची की नाही याचा उद्या निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

  • 27 Apr 2026 02:25 PM (IST)

    मिरारोडमधील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी दीड तासात तुरुंगात

    मिरारोड पूर्व येथील ‘अस्मिता ग्रँड मेंशन’ या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने जीवघेणा हल्ला झाला. नयानगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या दीड तासात आरोपी जैब जुबेर अन्सारी (वय ३१) याला ताब्यात घेतले आहे. जखमी राजकुमार मिश्रा यांच्यावर वोकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

  • 27 Apr 2026 02:09 PM (IST)

    मराठी भाषा सक्तीबाबत प्रताप सरनाईक यांची आग्रही भूमिका

    मराठी भाषा सक्तीबाबत मंत्रालयात एक तासापासून चर्चा सुरु आहे. मात्र, याप्रकरणावर अद्याप तोडगा निघालेला नाही. मराठी भाषा सक्तीबाबत प्रताप सरनाईक यांची आग्रही भूमिका पाहायला मिळाली.

  • 27 Apr 2026 01:57 PM (IST)

    बागेश्वर बाबाला कोल्हापुरी चप्पलने मारणाऱ्यास १.५१ लाखांचे बक्षीस; धाराशिवमध्ये शिवप्रेमी आक्रमक

    छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता धाराशिवमध्ये उमटले आहेत. शिवप्रेमींनी बागेश्वर बाबा विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जो कोणी बागेश्वर बाबाला कोल्हापुरी चप्पलने मारेल, त्याला १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर आवाहन धाराशिवच्या शिवप्रेमींनी केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत आंदोलकांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे सामुदायिक वाचन केले आणि बागेश्वर बाबाच्या फोटोला जोडे मारून तीव्र निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.

  • 27 Apr 2026 01:47 PM (IST)

    नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

    नाशिकमधील गाजलेल्या TCS प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खान हिच्या अंतरिम जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडत आहे. गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पीडित वकील आणि सरकारी वकिलांना आपली बाजू सविस्तरपणे मांडण्यासाठी वेळ दिला होता. आज याप्रकरणी सरकारी वकील अजय मिसर सरकारची बाजू मांडणार असून, संशयित आरोपीच्या वतीने वकील राहुल कासलीवाल कोर्टात हजर झाले आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय निदा खानला दिलासा देणार की तिचा जामीन अर्ज फेटाळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • 27 Apr 2026 01:37 PM (IST)

    विदर्भात उन्हाचा तडाखा, कुठे किती तापमान?

    विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून, आज २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजेपर्यंतच अनेक शहरांमधील तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४३.८°C तापमानाची नोंद झाली असून, त्यापाठोपाठ अमरावतीमध्ये ४३.४°C आणि अकोल्यात ४२.९°C पारा पोहोचला आहे. दुपारच्या आधीच वाढलेल्या या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून   सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 27 Apr 2026 01:27 PM (IST)

    आमदार नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप; भाईंदरपाडा जमीन बळकावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव

    आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन बळकावल्याचे गंभीर आरोप केले आहेत. भाईंदरपाडा येथील जमीन बेकायदेशीरपणे बळकावल्याचा दावा करत मेहता यांनी थेट कासारवडवली पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. या प्रकरणामुळे महायुतीतील दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला असून, भाईंदरपाडा जमिनीचा हा वाद आता कायदेशीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 27 Apr 2026 01:17 PM (IST)

    जनगणनेच्या कामातून मुख्याध्यापक आणि लिपिकांना वगळा; मुख्याध्यापक संघाची आयुक्तांकडे धाव

    सोलापुरातील खाजगी शाळा आणि महाविद्यालयांमधील मुख्याध्यापक व प्राचार्य मंडळींनी जनगणनेच्या कामातून सूट मिळवण्यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पेपर तपासणे, निकाल तयार करणे आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची महत्त्वाची कामे सुरू आहेत. संपूर्ण स्टाफ जनगणनेच्या कामात गुंतल्यामुळे शैक्षणिक कामांवर परिणाम होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे, महापालिकेतील शिक्षकांना या ड्युटीतून वगळण्यात आले असताना खाजगी शाळांवर मात्र हा भार टाकण्यात आला आहे. त्यामुळे किमान मुख्याध्यापक आणि एका लिपिकाला या कामातून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

  • 27 Apr 2026 01:07 PM (IST)

    लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते आजपासून बेमुदत संपावर

    लासलगावसह येवला, चांदवड, पिंपळगाव बसवंत आणि निफाड परिसरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. रासायनिक खतांची सक्तीची लिंकिंग थांबवावी आणि इतर ९ प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत दुकाने उघडणार नाही असा निर्धार विक्रेत्यांनी व्यक्त केला असून, मागणी पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर विक्रेत्यांनी पुकारलेल्या या संपामुळे शेती कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 27 Apr 2026 01:00 PM (IST)

    राज ठाकरेंनी मांडली पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर पक्षाची भूमिका

    उत्तर भारतीय रिक्षा चालकांकडून होणाऱ्या संपाला मनसे विरोध करणार. मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी मनसे पक्ष उभा राहणार. संप करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार. राज ठाकरेंनी मांडली पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर पक्षाची भूमिका

     

  • 27 Apr 2026 12:39 PM (IST)

    नरेंद्र मेहता यांचा प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप

    मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला असून, आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समर्थकानी भाईंदरपाडा येथील भूमिपुत्रांची सुमारे १२१९ चौरस मीटर जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. ​भाईंदरपाडा येथील भोईर कुटुंबाच्या मालकीच्या एकूण २४३९ चौ.मी. जमिनीपैकी निम्मी जागा हडपल्याचा दावा मेहतांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.

  • 27 Apr 2026 12:21 PM (IST)

    मराठी भाषा सक्तीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

    “जे लोक काल बिहार, यूपी मधून आलेले असतील किंवा इतर राज्यातून आला असेल त्याच्यासाठी निश्चित जरा अवघड आहे. मात्र वर्षानुवर्ष इथे महाराष्ट्रात राहतो. त्याला मराठी बोलता आलं पाहिजे. त्यामुळे मागणी योग्य आहे. काही गोष्टींमध्ये कालावधी मिळाला पाहिजे” असं संजय शिरसाट म्हणाले.

  • 27 Apr 2026 12:12 PM (IST)

    आठवड्यातून एकदा मराठी शिकवण्याचे कॅम्प घ्या – छगन भुजबळ

    “मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे, ज्यांना मराठी येत नाही त्यांना आपण मराठी शिकवू. मुंबईमधील रिक्षा आणि टॅक्सी या बहुतांश मराठी न बोलणाऱ्या लोकांच्या ताब्यात आहे. मात्र संप करणार तर पुन्हा गोंधळ निर्माण होणार. त्यापेक्षा आठवड्यातून एकदा मराठी शिकवण्याचे कॅम्प घेतले गेले पाहिजेत” असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

  • 27 Apr 2026 11:53 AM (IST)

    नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली लिफ्ट, 1 गंभीर जखमी

    नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये अंगावर लिफ्ट पडून मेडिकल कॉलेज मधील महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दैनंदिन काम करत असताना लिफ्ट महिलेच्या अंगावर पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • 27 Apr 2026 11:40 AM (IST)

    जळगावात भाजी पाल्याचे दर कडाडले , लिंबाचे दर 160 रुपये किलो

    जळगावात भाजी पाल्याचे दर कडाडले , लिंबाचे दर 160 रुपये किलो वर पोहोचले.  वाढत्या तापमानाचा भाजीपाल्यावर देखील परिणाम झाला असून भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.

    भेंडी , गवार , फ्लॉवर, पत्ताकोबी , हिरवी मिरची यासह विविध भाज्यांचे भाव 80 रुपये किलोवर पोहोचले तर लिंबू हे 160 रुपये किलो दराने विकले जात आहे.   गेल्या महिन्यात 70 ते 100 रुपये किलो दर असलेल्या लिंबाचे दराने दीडशे रुपये किलोचा आकडा ओलांडला.  गेल्या काळात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचं नुकसान झाल्याने मार्केटमध्ये आवक कमी झाली.

  • 27 Apr 2026 11:33 AM (IST)

    कोल्हापूर – पुरोगामी संघटनांच्या आंदोलनावेळी गोंधळ

    कोल्हापूर – पुरोगामी संघटनांचं सरकारविरोधात आंदोलन, आंदोलनावेळी गोंधळ. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू. आंदोलनस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झाली झटापट.

  • 27 Apr 2026 11:10 AM (IST)

    रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता?

    रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता आहे.  आज परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची 12.30 वाजता विविध संघटनांसोबत मंत्रालयात चौथ्या मजल्यावर होणार बैठक होणार असून या मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे.  या बैठकीत किमान तीन ते सहा महिन्यांचा कालावधी टॅक्सी रिक्षा चालकांना देण्यावर संघटनांचा भर आहे.  शिवसेना नेते संजय निरूपम यांची फोनवरून प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 27 Apr 2026 11:04 AM (IST)

    संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा आज सत्कार

    संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा आज सत्कार होणार,  दादरच्या शिवतीर्थ निवासस्थानी सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार.

    दहिसर मध्ये मराठी सक्ती वरून शिंदेंची शिवसेना आणि मनसे आमने-सामने आली होती, तेव्हा मनसैनिकांनी संजय निरुपम यांची गाडीची हवा काढत ते त्यांना भिडले होते.

  • 27 Apr 2026 10:55 AM (IST)

    ठाण्यात मनसेच्या वतीने गुणरत्न सदावर्तेच्या विरोधात बॅनरबाजी

    ठाण्यात मनसेच्या वतीने गुणरत्न सदावर्तेच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. सदावर्ते यांचं नामकरण करत सदा रडते असं केलंय. मराठी सक्तीचा विरोध करणाऱ्या संघटनेचा मनसेकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. मनसेचे पदाधिकारी स्वप्निल महिंद्रकर यांच्या वतीने ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शन या ठिकाणी बॅनर लावण्यात आला.

  • 27 Apr 2026 10:45 AM (IST)

    मराठी सक्तीवरून परवाना रद्द करण्याच्या निर्णयावर माझा आक्षेप कायम- संजय निरुपम

    मराठी भाषा येत नसल्यास रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा. या भूमिकेवर मी ठाम आहे. परवाना रद्द केल्यास चालकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. राज्यात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. परंतु परवाना रद्द करणारा निर्णय हा दुष्परिणाम निर्माण करणारा आहे. परवाना रद्द करण्याच्या निर्णयावर माझा आक्षेप कायम आहे, असं संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं.

  • 27 Apr 2026 10:35 AM (IST)

    मतं सांभाळा, कारण कुणीच कुणाचं नाहीये. सगळे पैशांसाठी आहेत; राऊतांचा शिंदेंना टोला

    “विधान परिषदेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे भूमिका मांडतील. एकनाथ शिंदे महान आहेत, ते भाजपचीही मतं फोडू शकतात. मतं सांभाळा, कारण कुणीच कुणाचं नाहीये. सगळे पैशांसाठी आहेत,” असं वक्तव्य राऊतांनी केलंय.

  • 27 Apr 2026 10:25 AM (IST)

    4 मे रोजी धारावीकर अदानींच्या कार्यालयावर धडकणार

    सर्व पात्र-अपात्र झोपडपट्टीवासीयांना धारावीतच ५०० चौरस फुटाची घरे देण्यात यावी, कोणत्याही झोपडपट्टीवासीयाचे धारावीबाहेर पुनर्वसन करण्यात येऊ नये आदी प्रमुख मागण्यांसाठी धारावीकर ४ मे रोजी सकाळी ११ वाजता अदानी कंपनीच्या माटुंगा येथील कार्यालयावर धडकणार आहेत.

  • 27 Apr 2026 10:15 AM (IST)

    न्यायमूर्ती स्वर्णा कांतांकडून न्याय मिळण्याची माझी आशा धुळीस मिळाली- केजरीवाल

    अरविंद केजरीवाल यांनी न्यायमूर्ती स्वर्णा कांता यांना पत्र लिहिलं आहे. केजरीवाल प्रत्यक्षपणे किंवा वकिलांमार्फत उपस्थित राहणार नाहीत. “न्यायमूर्ती स्वर्णा कांतांकडून न्याय मिळण्याची माझी आशा धुळीस मिळाली. मी गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्ग अनुसरण्याचं ठरवलंय”, असं केजरीवाल म्हणाले.

  • 27 Apr 2026 10:11 AM (IST)

    इराणमध्ये खामेनींची हत्या झाली, त्याबद्दल मोदींना काहीच चिंता नाही- राऊत

    “अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला होताच आपल्या पंतप्रधानांना हिंसाचाराची चिंता होते. परंतु इराणमध्ये खामेनींची हत्या झाली, त्याबद्दल त्यांना काहीच चिंता नाही. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, मणिपूरमध्ये लोक मारले जात आहेत, त्याबद्दल त्यांना चिंता वाटत नाही. गाझामध्ये हजारो लहान मुलं मारली गेली, त्यावर मोदींनी कधीच शोक व्यक्त केला नाही,” अशी टीका संजय राऊतांनी मोदींवर केली.

  • 27 Apr 2026 10:07 AM (IST)

    जिथे निवडणुका होतात, तिथेच मोदी, अमित शाह जातात- संजय राऊत

    “निवडणूक जिंकण्यासाठी, राजकारण करण्यासाठी, मतदारांवर दबाव आणण्यासाठी तुम्ही राज्यातून सशस्त्र दल, पॅरामिलिट्री फोर्स पश्चिम बंगालला घेऊन जातात. पण जिथे नागरिक मारले जात आहेत, काश्मीरमध्ये, मणिपूरमध्ये तिथे तुम्ही का पाठवत नाहीत? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ पश्चिम बंगालमध्ये फिरत होते. तुम्ही मणिपूरमध्ये जाऊन बघा, तिथे काय होतंय, तिथेही रॅली काढा”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

  • 27 Apr 2026 09:55 AM (IST)

    वाशिमच्या मालेगावमध्ये एका 30 वार्षिय महिलेची हत्या, धक्कादायक घटना

    अकोला फाटा पोस्ट ऑफिससमोर घडली घटना. हत्तेचं कारण अद्याप अस्पष्ट. घटनेनंतर परिसरात खळबळ.. पोलिसांची तत्पर कारवाई. संशयित आरोपी ताब्यात, चौकशी सुरू…

  • 27 Apr 2026 09:50 AM (IST)

    अमरावतीच्या तापमानाचा पारा 46.8° वर

    अमरावतीच्या तापमानाचा पारा 46.8° वर तापमानाने मागील सात वर्षाचा रेकॉर्ड मोडला. वाढलेल्या तापमानामुळे अमरावती जिल्ह्यातील 42 तलाव पडले कोरडे… अनेक मोठ्या जलाशयातील पाणी पातळी झपाट्याने खालावली. तापमानात मोठी वाढ झाल्याने बाष्पीभवन होत आहे त्यामुळे तलावातील पाणी पातळी मध्ये झपाट्याने कमी होत आहे.

  • 27 Apr 2026 09:40 AM (IST)

    जळगाव शहरातील मानराज पार्क चौफुलीवर भरधाव ट्रकने दुचाकीस्वराला चिरडले

    या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ओम सुनील गिरी असे 25 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी मयत तरुणाच्या आईसह बहिणीचा मोठा आक्रोश. अपघातामुळे काही वेळासाठी दुतर्फ वाहतूक काही काळासाठी विस्कळीत. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

     

  • 27 Apr 2026 09:30 AM (IST)

    मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा भागात मनसे कडून अनोखा उपक्रम

    परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मनसे कडून मराठी पुस्तकाचा वाटप. 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणं आणि समजणं यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मराठी सक्ती करण्यात आली आहे.मराठी सक्ती होणार असल्यामुळे काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये भीतीच्या वातावरण पसरला आहे. काही रिक्षा आणि टॅक्सी चालक मुंबई शहरात दहा ते पंधरा वर्षांपासून राहतात मात्र या परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही. अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना शिकण्यासाठी सात दिवसांसाठी मनसे कडून मराठी पुस्तक वाटून अल्टिमेटम देण्यात आला आहे

  • 27 Apr 2026 09:21 AM (IST)

    भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर..

    चार दिवसाची पोलीस कोठडी आज संपणार. संगमनेर पोलीस न्यायालयात हजर करण्याची हि तिसरी वेळ. भोंदू गडगे 9 दिवसांपासून पोलिस कोठडीत. मंत्र तत्राने कॅन्सर तसेच दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गडगे झालाय गजाआड. अंनिसच्या तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड. आज पुन्हा गडगेला न्यायालयात करणार हजर. पोलीस आज आणखी वाढीव कोठडी मागणार. संगमनेर जिल्हा सत्र न्यायालय पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन? याकडे लक्ष…

  • 27 Apr 2026 09:15 AM (IST)

    आजपासून राज्यभरातील कृषी केंद्र चालकांचा बेमुदत बंदला सुरुवात

    राज्यातील सर्व 85 हजार कृषी सेवा केंद्र तर जळगाव जिल्ह्यातील साडे तीन हजार कृषी केंद्र चालक बंद मध्ये सहभागी. जळगावातील मार्केट मधील कृषी केंद्र व बियाण्यांची विक्री करणारे दुकान बंद असल्याचा पाहायला मिळत आहे. अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची विक्री थांबवावी, खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या ‘लिंकिंग’ पद्धती बंद करावी. नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्याच्या जाचक अटी रद्द करावेत या प्रमुख मागण्यांसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी कृषी केंद्र चालक आक्रमक. कृषी केंद्र बेमुदत बंद असल्यामुळे बियाणे तसेच कीटकनाशकांचे विक्री ठप्प होणार असून पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे

  • 27 Apr 2026 08:57 AM (IST)

    नीलम गोऱ्हे यांच्या संभाव्य उमेदवारीला शिवसनेच्या काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध

    स्थानिक स्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणे अधिक योग्य ठरेल. त्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार करण्याची पक्षाकडे मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या विषयावर अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू असून, सर्व मतांचा विचार करून उमेदवारी निश्चित केली जाईल अशी देखील माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षनिष्ठा आणि स्थानिक जनसंपर्क लक्षात घेऊन उमेदवार निवडणे गरजेचे आहे. अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तर दुसरीकडे, नीलम गोऱ्हे यांच्या समर्थकांनी त्यांच्या अनुभवाचा आणि संघटनात्मक कामगिरीचा उल्लेख करत उमेदवारीसाठी त्या योग्य असल्याचा दावा केलाय.

  • 27 Apr 2026 08:45 AM (IST)

    अंबड तालुक्यातल्या कुक्कडगाव येथे गळफास घेऊन 44 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

    जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील कुक्कडगाव येथे ज्ञानेश्वर गायकवाड या 44 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली, सध्या शेतातील ज्वारी काढण्याचा हंगाम सुरू असून घरातील सर्वजण सकाळीच शेतात निघून गेले होते, त्यामुळे घरात कोणी नसल्याचे पाहून ज्ञानेश्वर गायकवाड यांनी घरातल्या अँगलला वायरच्या सहाय्याने गळफास घेतलाय. ज्ञानेश्वर गायकवाड हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना केवळ नव गुंठे जमीन आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि काही खाजगी सावकारांचा देखील कर्ज असल्याची माहिती समोर आली त्यामुळे याच विवंचनेत मागच्या काही दिवसापासून ते नेहमी नैराश्यात आणि चिंतेत असायचे. त्यामुळे याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय, दरम्यान या घटने प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • 27 Apr 2026 08:30 AM (IST)

    नाशिक शहरात उष्णतेचा कहर, तापमान ४१.४ अंशांवर

    नाशिक शहरात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे,  तापमान ४१.४ अंशांवर पोहोचला आहे.  यंदाच्या हंगामातील उच्चांक गाठला असून उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडले असून नागरिकांनी बाहेर पडणे टाळले आहे.  सलग १०-१२ दिवसांपासून तापमान ३९ अंशांच्या पुढे आहे. रात्रीही उकाडा कायम आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 27 Apr 2026 08:25 AM (IST)

    बदनापूर शहरातल्या कॅनरा बँकेतील अपहार प्रकरणी आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार

    जालना जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून बँक घोटाळा प्रकरणाची मालिका सुरू आहे, अशातच बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारत जवळपास सात कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलेला बँक मॅनेजर विजेंद्र पाटणकर आणि सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे या दोघांची आज पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे, बँक अधिकारी संजय डोंगरे हा फरार असल्यामुळे पोलिसांकडून सखोल तपास करण्यासाठी या आरोपींची वाढीव पोलीस कोठडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या अपहर प्रकरणात बदनापूर पोलिसांकडून सध्या चारही बाजूने सखोल तपास करण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 27 Apr 2026 08:25 AM (IST)

    लासलगाव सह परिसरात चोरांचा सुळसुळाट

    कोयता हातात घेऊन चोरीसाठी आलेला चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जायचं की नाही या भीतीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे. गाव भागासह कॉलनीमध्ये पोलीसग्रस्त वाढवण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

  • 27 Apr 2026 08:20 AM (IST)

    गुंतवणुकीच्या आमिषाने सैन्याच्या जवानाची २२ लाखांची फसवणूक

    नाशिक येथे गुंतवणुकीच्या आमिषाने सैन्याच्या जवानाची २२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. एसआयपीच्या नावाखाली आरोपीने विश्वास संपादन करून कागदपत्रे घेतली. फिर्यादीच्या नावावर बँकेत कर्ज काढून रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली आहे. प्रकार जून २०२५ मध्ये घडला असून एप्रिल २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

     

  • 27 Apr 2026 08:15 AM (IST)

    नाशिक विमानतळावरील प्रवासीसंख्येत २४ टक्क्यांची मोठी वाढ

    नाशिक विमानतळावरील प्रवासीसंख्येत २४ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. २०२५-२६ मध्ये ४.२१ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला. कार्गो निर्यातीत तिप्पट वाढ, ४७० टनांपर्यंत झेप घेण्यात आली आहे. मार्च महिन्यातच ४० हजारांहून अधिक प्रवाशांची नोंद करण्यात आली आहे. दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, गोवा, हैदराबादसाठी सेवा उपलब्ध आहेत.

     

  • 27 Apr 2026 08:10 AM (IST)

    बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य यांनी केला मनमुराद डान्स

    बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य यांनी मनमुराद डान्स केला . ‘मै हूं डॉन’ गाण्यावर सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसलेंच्या गाण्यावर त्यांनी ठेका धरला . बार्शीतील भगवंत महोत्सवावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी ठेका धरला. मागील सात दिवसापासून बार्शीचे ग्रामदैवत प्रकटदिनानिमित्त भगवंत महोत्सवात सुरु आहे.

     

  • 27 Apr 2026 08:06 AM (IST)

    मेळघाटात कुपोषणाचे सावट कायम वर्षभरात 92 बालके आणि 5 मातांचा मृत्यू…..

    मेळघाटात कुपोषणाचे सावट कायम असून वर्षभरात 92 बालके आणि 5 मातांचा मृत्यू झाला आहे. मेळघाटात आरोग्य सुविधांचा अभाव कायम असून मेळघाटातील बालमृत्यूवर यापूर्वीच न्यायालयाने ताशेरे ओढले आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या एका वर्षात बालकांच्या मृत्यूची हादरवनारी आकडेवारी समोर आली आहे. एका महिन्याच्या आतील तब्बल साठ बालकांचा मेळघाटात मृत्यू झाला आहे.

Follow Us