
चारकोपमधील एचपी गॅस एजन्सीच्या कार्यालयाची लोकांनी तोडफोड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गॅस सिलिंडर न मिळाल्याने लोक संतप्त झाले आणि त्यांनी तोडफोड केली आहे. सध्या गॅस एजन्सीचे लोक आणि तोडफोड करणारे चारकोप पोलीस ठाण्यात जमले आहेत.
छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑटो एलपीजी गॅस मिळत नसल्याने ऑटो चालकांनी संप पुकारला आहे. संपावर असलेल्या ऑटो रिक्षा चालकांची मुजोरी सुरु आहे. महानगरपालिकेच्या बस व इतर प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सेवनहील परिसरात बस व ऑटो आडवणाऱ्यांना पोलिसांनी पाठलाग करून पळवले.
चिपळूण तालुक्यात सावकार कर्जदारांकडून वाढीव व्याजदराने वसुली करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या पीडित कर्जदारांनी थेट दुय्यम निबंधक कार्यालय गाठत न्यायाची मागणी केली. दरम्यान या घटनेवरून वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद भरण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जोरदार राडा घातला.
“साधू संतांनी समाजाला सत मार्गाला लावण्याचे काम केले आहे. व्यसनापासून दूर केले आहे. संतांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. परंतु अशा पद्धतीने कोणी गैरकृत्य करत असेल अशा व्यक्तीला शिक्षाही झालीच पाहिजे. यात साधुसंतांची बदनामी करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर हे चुकीचे आहे. भोंदूगिरी करणारे लोक हे एक्स्पोज झालेच पाहिजे व त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे” असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.
मिडियाची जशी सूत्र असतात त्या प्रमाणे आमच्या सुद्धा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणाविषयी मला माहिती घ्यावी लागणार आहे. सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. हे माध्यमांमध्ये देखील आले आहे. माझ्या माहितीनुसार ते आज कार्यालयात देखील उपलब्ध होत नाहीत.त्यांना कार्यालय सोडून जायची परवानगी मिळाली आहे. याबाबतची माहिती घेऊन आपल्याला वाटलंच तर प्रतिक्रिया देईन.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे थोरले सुपूत्र पार्थ पवार यांनी आज शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट कोणत्या कारणासाठी घेतली ते अजून अस्पष्ट आहे. त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया ना देता तिथून निघून गेले.
बोदवड पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात सूडबुद्धीने आणि राजकीय दबावाने गुन्हे दाखल करण्यात आले असं एकनाथ खडसे म्हणाले. माझा या व्यवहाराशी संबंध नाही हे सर्व सूडबुद्धीने करण्यात आलं. शासनाची दिशाभूल करून महारवतन सांगून FIR माझ्यावर करण्यात आला. मी खाजगी रीतीने FIR करणार. आता 24 वर्षानंतर आठवण्याचं कारण काय?. मागील काळातही मला काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता असं ते म्हणाले.
धुळे महानगरपालिकेची आज विशेष सभा असून तब्बल तीन महिन्यांनंतर विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. महिला बालकल्याण समिती, स्थायी समिती, स्थायी समिती सदस्य त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकांची आज निवड होणार आहे. स्थायी समिती सदस्यपदी कोणाची निवड होणार याकडे सर्व शहराचं लक्ष लागून आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो चालकांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा काढला आहे. संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर ऑटो चालकांनी घोषणाबाजी केली. ऑटो एलपीजी गॅसवर तोडगा काढण्याची रिक्षा चालकांची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी हा मोर्चा काढला आहे.
सोलापूर महापालिकेत आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सोलापूरकरांवर कोणतीही कर वाढ करण्यास विरोधकांचा तीव्र विरोध आहे. आजच्या बजेटमध्ये कर वाढ केल्यास आम्ही सभागृहात आणि रस्त्यावरची लढाई लढणार, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आणि गटनेते अमोल शिंदे यांनी दिला. महापालिका प्रशासनाने नवीन कर वाढ करण्याचा प्रस्ताव सभागृहाकडे दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात एलपीजी सिलिंडरचा तुटवटा भासत असून अहेरी एटापल्ली भामरागड आणि सिरोंचा या ठिकाणी दहा दिवसांपासून गॅस सिलिंडरची कमतरता भासत होती. सिरोंचा तालुक्यात तर दोन आठवड्यापासून गॅस सिलिंडर उपलब्ध नव्हते. सिरोंचा इथल्या एचपी गॅस एजन्सीसमोर सकाळी आठ वाजल्यापासून ग्राहक प्रतीक्षा करत आहेत.
“अमिर ठाकरे आणि मोहीत कंबोज हे का भेटले, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. या देशात अजूनही लोकशाही, त्यामुळे कोणी कोणाला भेटायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ या दोन वेगळ्या गोष्टी असतात. कुणाच्या तरी लेकीच्या वाढदिवसाला कुणी गेलं, याच्यात गैर काय? आम्ही विरोधकांना कधीच शत्रू मानलं नाही. मनभेद कधीच नसतात, मतभेद असले पाहिजेत” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.
“एलपीजी सिलिंडरबाबत मंत्रिमंडळातील मंत्रीच एकमेकांना पत्र लिहित आहेत. भारत सरकारने वास्तव सांगावं. जगात युद्ध सुरू असल्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणून मागच्या आठवड्यात जेव्हा अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, तेव्हा त्यात आम्ही सहकार्याचीच भूमिका मांडली होती. जर देश अडचणीत असेल तर आम्ही आमचे सर्व मतभेद बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करायला तयार आहोत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अमरावतीमध्ये सध्या अशोक खरात यांच्या कथित दैवी शक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला असून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. खरात यांनी समितीसमोर आपली दैवी शक्ती सिद्ध करून दाखवावी, असे खुले आव्हान ‘अंनिस’ने दिले असून, तसे केल्यास त्यांना ८० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा आंदोलनादरम्यान करण्यात आली. या आंदोलनाद्वारे केवळ खरातच नव्हे, तर त्यांना पाठबळ देणाऱ्या राजकीय नेत्यांवरही कडक कारवाई करण्याची मागणी समितीने लावून धरली आहे. “चमत्कार दाखवा आणि बक्षीस मिळवा” या भूमिकेतून आता अमरावतीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरुद्ध अशोक खरात असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या शिक्षण विभागात शालार्थ आयडी वाटपावरून एकच खळबळ उडाली असून, अशोक खरात यांनी आपले राजकीय वजन वापरून भावासाठी नियमबाह्य काम केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना खरात यांनी मध्यस्थी करत आपले बंधू दिलीप खरात यांना शालार्थ आयडी मिळवून दिला. दिलीप खरात हे सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, शिक्षण विभागात या आयडीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, खरात यांनी अनेक फाईल्स राजकीय दबावापोटी मंजूर करून घेतल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. हा आयडी नेमका खरा की बोगस, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट शिवारात हाय व्होल्टेज टॉवरवरील विजेची तार चोरण्याच्या प्रयत्नात असताना भीषण अपघात होऊन दोन चोरट्यांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून आलेल्या पाच जणांच्या टोळीने शनिवारी रात्री हा चोरीचा प्रयत्न केला, मात्र टॉवर अचानक कोसळल्याने अविनाश पाटोळे आणि आकाश आडे या दोघांचा दबून मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या साथीदारांनी अपघाताचा बनाव रचून मृतदेह कारमधून परभणीला नेले आणि तिथेच सोडून पलायन केले. रुग्णवाहिकेतून मृतदेह रुग्णालयात नेले जात असताना नातेवाईकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला असून, केज परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
येवला तालुक्यातील १७ टंचाईग्रस्त गावांचा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईबाबतचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले होते. या प्रस्तावांची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष बैठक बोलावून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले. या बैठकीनंतर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार आहेरवाडी, ममदापूर, खरवंडी, वाईबोथी, कोळगाव यांसह १७ गावांमधील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना आता टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमचे खासदार अजिबात फुटणार नाही. आमचे ९ खासदार आहेत. शेवटपर्यंत हे ९ खासदार राहतील. ही पुढची निवडणूक होईपर्यंत ते तसेच राहतील. महाराष्ट्रासह देशात पारदर्शक राजकारण राहिलेले नाही. पण शिवसेनेचे खासदार फुटणार, फोडणार, ऑपरेशन टायगर करणार हे करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या खुर्चीखाली सुरुंग लागलेत ते बघा, ते भाजपने लावले आहेत. त्याच्यावर तुम्ही चिंतन केले पाहिजे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
राजकीय शत्रू असला तरी त्याच्याकडे जर एखाद्या मंगल कार्याचे आमंत्रण असेल तर ती आपली संस्कृती आहे की तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून आपण सहभागी व्हाव आणि निघून जावे, असे संजय राऊतांनी म्हटले.
आदित्य ठाकरे हे कंबोज यांच्या घरातील कार्यक्रमाला अगदी थोडाच वेळ उपस्थित होते, ते त्यांच्या घरी शुभ कार्याला गेले त्यात गैर काय ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही विरोधकांच्या कार्यक्रमाला जातो, पण वैचारिक मतभेद कायम आहेत, असंही राऊत यांनी नमूद केलं.
ठाणे जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा बसू शकतात. 106 टक्के पावसानंतरही गावांचा घसा कोरडाच आहे. नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती होणार. जिल्हा प्रशासनासह ठाणे जिल्हा परिषदेने तब्बल 238 गावे आणि 504 पाड्यांना पाणीटंचाईची झळ बसणार असल्याचे निश्चित केलं. त्यासाठी तब्बल 27 कोटी 31 लाखांच्या खर्चाच्या पाणी टंचाई आराखड्यासाठी तरतूद केली आहे.
पुणे विमानतळावर 26 कोटींचा गांजा पकडण्यात आला आहे. थायलंडवरुन आणलेल्या खाद्यापदार्थांमध्ये हा गांजा आढळला. विमानताळवर मोठी कारवाई करत गांजा जप्त करण्यात आला.
नाशिक – भोंदू अशोक खरात याला देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नसल्याची माहिती समोर आली आहे. शस्त्र परवानामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी , एसपी संशयाच्या फेरीत येण्याची शक्यता आहे. भोंदू खरातकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरचा परवाना आहे, मात्र पोलीस रेकॉर्डमध्ये शस्त्र परवाना संबंधित कागदपत्रं उपलब्ध नसल्याची माहिती उघड झाली आहे. खरातने निवडणूक कालावधीत शस्त्र जमा केली नसल्याचे देखील समोर आलंय.
अमरावतीमध्ये अजूनही सिलेंडर साठी ग्राहकांच्या रांगा कायम आहेत. जयस्तंभ चौकातील गॅस सिलेंडर एजन्सीवर सकाळपासून नागरिकांची सिलेंडर साठी गर्दी झाली आहे. आमच्या नावाचे सिलेंडर ब्लॅक मध्ये विकले जात आहेत, असा आरोप ग्राहकांनी केला आहे . भर उन्हात अमरावतीमध्ये सिलेंडर साठी गर्दी झाली आहे.
भोंदू अशोक खरातच्या नाशिक येथील ऑफिसच्या काळ्या काचेची चर्चा सुरू आहे. खरातच्या कॅबीन मध्ये अनेक महिलांचे लैंगिक शोषण झालं. या ऑफिस केबीनला लावलेल्या काचा या रिफलेक्टीव्ह ग्लास असून ती फक्त बाहेरच्या बाजूची प्रतिमा दर्शवते.केबिनच्या आतील व्यक्तीला बाहरेचं दिसतं, पण केबीनच्या आतील लाईट बंद केल्यानंतर आतली हालचाली बाहेरील व्यक्तींना अजिबातच दिसत नाहीत.
छत्रपती संभाजीनगर – गॅसवर चालणाऱ्या ऑटोंचे चालक आज संपावर. ऑटो एलपीजी गॅस मिळत नसल्याने ऑटो रिक्षा चालकांना मोठा फटका बसला आहे. ऑटोच्या प्रतीक्षेत बाबा पेट्रोल पदावर तासंतास प्रवासी ताटकळले. ऑटो एलपीजी गॅस नसल्याने छत्रपती संभाजी नगर मधील 25 ते 30 हजार रिक्षांना फटका.
भुसावळच्या मानपुर येथील मार वतन जमीन साखर कारखान्याच्या नावाखाली कागदपत्रात खुळाखोळ खरेदी केलेल्याचे ह्या प्रकरणा बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात लक्षवेधीत हा प्रश्न उपस्थित केला होता.
29/10/2025 रोजी आरोपी ऋषिकेश वैद्य, पीडितेचा पती आणि आमची वसई चा सदस्य यांच्या एका वसईत झालेल्या बैठकीदरम्यान मारहाणीची घटना घडली असल्याचे समोर आले आहे. यात आरोपी ऋषिकेश वैद्य, पिडीतेचा पती आणि ‘आमची वसई’ संस्थेच्या सदस्यांमध्ये चर्चा सुरू असताना वाद वाढून पिडीतेच्या पतीने आरोपीवर हल्ला केला. मध्यस्थी करणाऱ्या सदस्यालाही मारहाण करण्यात आली असल्याचे समोर आली आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी पिडीतेच्या पतीविरोधात दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी वसई पोलीस ठाण्यात एन.सी. गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळच्या मानपुर येथे खुळाखोळ खरेदी केलेल्या शेती प्रकरणात बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.
तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञा उत्सवाला 2 एप्रिल रोजी प्रारंभ होणार आहे. या याञेतील मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम 3 एप्रिल रोजी पार पडणार असुन यासाठी राज्यभरातुन 15 लाखांहून अधिक भाविक येत असतात. मराठवाड्यातील सर्वात मोठी आणि प्रमुख याञा म्हणुन येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञेकडे पाहीले जाते दरम्यान याञेच्या अनुषंगाने येडेश्वरी मंदीराच्या मुख्य शिखराला रंगरंगोटी करण्यात आली असुन स्वच्छतेसह येणाऱ्या भाविकांना पाण्याची, सावलीची सोय करण्यात आली आहे.
शिक्षण संस्थेच्या मनमानी कारभाराला कंटाळून एका महिला शिक्षिकेने थेट कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितल्याने खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई येथील फातिमा उर्दू माध्यमिक शाळेच्या सहशिक्षिका नाझिया बेग नूरुल हसन यांनी बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा 7 वा दिवस आहे. नियुक्तीसाठी तब्बल 14 लाख रुपये घेतल्याचा आरोप करत सन 2019 मध्ये कोणतेही कारण न देता सेवेतून कमी करण्यात आल्याची त्यांची तक्रार आहे. वारंवार तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने आणि संस्थाचालकाकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे.
जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, दोन ते चार एप्रिल दरम्यान जिल्ह्यात विजयाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात चिंचेचा वातावरण निर्माण झालंय, करण काढणीला आलेला गहू हरभरा मका त्याचबरोबर कांदा पिकाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा नुकसान होण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे.
जालना शहर महानगरपालिकेची सन 2026 27 या आर्थिक वर्षासाठीची अर्थसंकल्पीय विशेष सभा आज दुपारी 3 वाजता पालिकेच्य सभागृहात महापौर वंदना मगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे, मागील चार ते पाच दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सुपूर्द केला आहे. यामध्ये आता सुधारणा केल्या जातील आणि तो शासनाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे सुधारणा केल्यानंतर हा अर्थसंकल्प जवळपास 500 कोटीच्या ही पुढे जाणार आहे. दरम्यान आजच्या सभेमध्ये अर्थसंकल्पासह शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांवर चर्चा होणार आहे, शिवाय नागरी सोयी सुविधा आणि विविध विकास योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय होण्याची देखील शक्यता आहे.
भोंदू अशोक खरात चा आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडावर आहे. सीएकडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवनीका संस्थानच्या आजी माजी सदस्यांसह आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी होणार आहे. शिवनी का ट्रस्टच्या व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, 2018 मध्ये चार लाखांची उलाढाल असलेल्या ट्रस्ट मे 2024 पर्यंत कोटींची झेप घेतल्याचा संशय गडद होत चालला आहे.
आज विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात सर्वत्र एकच नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे भोंदू बाबा अशोक घरात… त्यांच्याबद्दल आता नवीन अपडेट समोर आली आहे. भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे. यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. भोंदू अशोक खरात सोबत निगडित व्यक्ती आणि त्याच्या संस्थांच्या सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातील खवणेपिंपरीमध्ये रुही इंडियन गॅस एजन्सी मधून 56 गॅस सिलेंडर चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे. कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरली आहे. महिला महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूरच्या वेदीका ससाणे विरुद्ध अमृता पुजारी यांच्यात लढत झाली होती. कोल्हापूरच्याच वेदिका ससाणेचा पराभव केला. यासोबतच जाणून घ्या राज्यातील ठळक बातम्यांची अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा.