AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपती पदकाने गौरवलेल्या IPS नुपूर प्रसाद कोण ? सुशांत सिंह राजपूत केसच्या तपासात बजावली महत्त्वाची भूमिका

आयपीएस अधिकारी नुपूर प्रसाद यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 'मेरिटोरियस सर्व्हिस मेडल'ने सन्मानित करण्यात आलं. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या CBI तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या त्या दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.

राष्ट्रपती पदकाने गौरवलेल्या IPS नुपूर प्रसाद कोण ? सुशांत सिंह राजपूत केसच्या तपासात बजावली महत्त्वाची भूमिका
IPS नुपूर प्रसादImage Credit source: social media
| Updated on: Aug 15, 2026 | 11:56 AM
Share

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या CBI तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 2007 बॅचच्या AGMUT कॅडरच्या IPS अधिकारी नुपूर प्रसाद (Nupur Prasad) यावर्षी ‘मेरिटोरियस सर्व्हिस मेडल (MSM)’ने सन्मानित करण्यात आलं आहे. नुपूर प्रसाद यांची प्रदीर्घ आणि उल्लेखनीय पोलीस कारकीर्द असून त्यांच्या सेवेला मिळालेला हा महत्त्वाचा सन्मान मानला जात आहे. CBI मधील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर नुपूर प्रसाद या दिल्ली पोलिसांत परतल्या असून, सध्या त्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) संयुक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आर्थिक आणि वित्तीय गुन्ह्यांशी संबंधित महत्त्वाच्या तपासांवर त्या सध्या देखरेख ठेवतात.

देशभरातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचा यावर्षी उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मान करण्यात आला आहे. तपास, गुन्हे प्रतिबंध, जनसेवा, कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासन अशा विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल या पुरस्काराद्वारे घेतली जाते. आपल्या मोठ्या कारकिर्दीत नुपूर प्रसाद यांनी अनेक गुंतागुंतीच्या केसेसच्या तपासाची जबाबदारी सांभाळली आहे, एवढंच नव्हे तर त्यांनी विविध पोलीस उपक्रमांचे नेतृत्वही केलं. दिल्ली पोलीस, CBI, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे विविध पदांवर नुपूर यांनी काम केले आहे. तसेच महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, युवक विकास, सायबर सुरक्षा आणि अमली पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठीच्या उपक्रमांसह अनेक समाजकेंद्रित कार्यक्रमांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सुशांत सिंह राजपूत केसमुळे राष्ट्रीय स्तरावर चर्चा

14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मुंबईतील निवासस्थानी मृत्यू झाला होता. हे प्रकरण प्रचंड चर्चेत होतं. त्यामुळे या केसचा तपासहीसतत प्रसिद्धीझोतात होता. सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर आणि तपासाच्या अधिकारक्षेत्रासंदर्भातील वादानंतर ऑगस्ट 2020 मध्ये हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आलं होतं. याचदरम्यान नुपूर प्रसाद यांनी तपासाच्या महत्त्वाच्या बाबींवर अत्यंत बाकाईने देखरेख ठेवली. साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक पुरावे, वैद्यकीय नोंदी आणि इतर संबंधित पुराव्यांचा तपास करण्यात आला होता.

त्यानंतर 2025 साली CBI ने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूमध्ये गैरप्रकार, आत्महत्येस प्रवृत्त करणं किंवा गुन्हेगारी कटाचा पुरावा आढळला नसल्याचे CBI ने तपासात नमूद केलं होतं.

दिल्ली पोलिसांतील करिअर

CBI मध्ये नियुक्ती होण्.यापूर्वी नुपूर प्रसाद यांनी दिल्ली पोलिसांमध्ये विविध वरिष्ठ पदांवर काम केलं होतं. शाहदरा जिल्ह्याच्या पहिल्या पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून त्यांनी काम केले. शाहदरा जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर तेथील पोलीस यंत्रणा उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अमली पदार्थांच्या तस्करीच्या नेटवर्कविरोधात तसेच बेकायदेशीर जुगाराच्या कारवायांविरोधात मोहीमही त्यांनी राबवली. त्याचबरोबर गुन्हे प्रतिबंधक उपायांवरही त्यांनी भर दिला होता. त्यानंतर उत्तर दिल्लीच्या DCP म्हणून काम करताना त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांसह लाल किल्ल्यावरील सुरक्षा व्यवस्था आणि दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांदरम्यानच्या बंदोबस्ताची जबाबदारीही सांभाळली होती.

इतर महत्त्वाचे तपास

CBI मधील कार्यकाळात नुपूर प्रसाद अनेक महत्त्वाच्या तपासांशी संबंधित होत्या. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, त्या उद्योगपती विजय मल्ल्या तसेच ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर कराराशी संबंधित प्रकरणांच्या तपासातही सहभागी होत्या.  अशा अनेक हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये त्यांच्या सहभागामुळे सक्षम तपास अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली. CBI मधील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर नुपूर प्रसाद यांनी दिल्ली पोलिसांमध्ये पुनरागमन केलं.

Follow Us
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...