Maharashtra News LIVE : महात्मा फुलेंच्या गावी पहिली आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा

Maharashtra News LIVE Updates: एप्रिलच्या सुरुवातीलाच गोंदिया ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली असून नळांवर रांगा लागल्या असून नागरिक त्रस्त झालेत. यासह देश विदेश, महाराष्ट्र, क्रीड, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : महात्मा फुलेंच्या गावी पहिली आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा
| Edited By: | Updated on: Apr 11, 2026 | 3:13 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 11 Apr 2026 03:11 PM (IST)

    बीड : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीची तोडफोड

    बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या भटके विमुक्त सेलच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. पारगाव येथून धुळे-सोलापूर हायवे वरून बीडच्या दिशेने येताना पाठीमागून गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष संजय लकडे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • 11 Apr 2026 02:55 PM (IST)

    पुरोगामी विचार मांडले पाहिजे, प्रतिगामी नाही- सावंत

    पुरोगामी विचार मांडले पाहिजे, प्रतिगामी नाही… शरद पवारांनी मांडलेल्या विचाराची दखल घेऊन सुधारणा करणं आवश्यक… ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांची भूमिका…

  • 11 Apr 2026 02:45 PM (IST)

    शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटतो, तुषार भोसलेचं वक्तव्य

    शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटतो, तुषार भोसलेचं वक्तव्य… तुषार भोसलेंकडून शरद पवारांचा मौलाना असा उल्लेख… वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न पवारांनी केला, तुषार भोसलेंची टीका…

  • 11 Apr 2026 02:30 PM (IST)

    पुण्यातील खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार

    पुण्यातील खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार. कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयने स्टोअर रूममध्ये नेऊन केला लैंगिक छळ. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हा कोचिंग क्लास आहे. ऑफिस बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. विकास गायकवाड असं 35 वर्षीय ऑफिस बॉयच नाव आहे. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही काढले. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता.

  • 11 Apr 2026 02:15 PM (IST)

    किशोरी पेडणेकर सायन रुग्णालयात दाखल

    किशोरी पेडणेकर सायन रुग्णालयात दाखल , रुग्णालयाच्या अग्नीशामक ऊपकरणाची केली पाहणी. मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय (सायन हॉस्पिटल) म्हणजेच सायन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईकरांसाठी जीवनदान देणारे हे रुग्णालय आता मृत्यूचा सापळा ठरत आहे का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या मंगळवारी दुपारी सायन रुग्णालयाच्या एक्स-रे विभागात एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर करण्यात आलेल्या तपासणीत रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेची गंभीर बेपर्वाई उघडकीस आली आहे.

  • 11 Apr 2026 02:00 PM (IST)

    बीडमध्ये टोलनाक्याची तोडफोड, सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद

    बीडच्या सेलुअंबा येथील अंबाजोगाई-लातुर महामार्गावरील टोलनाक्यावर काल रात्री 1.20 वाजता बालाजी चाटे सह इतर 3 जणांनी आमच्याकडून कधीच टोल घ्यायचा नाही, अन्यथा परिणाम वाईट होतील असे म्हणत हॉकीस्टिक आणि धारदार शस्त्राने टोलनाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आणि कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली. तर त्यांच्यातीलच एका व्यक्तीने व्हिडिओ काढत कर्मचाऱ्यांना धमकावले आणि टोल नाक्यावर बराच वेळ दहशत माजवली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी टोल नाक्याकडुन पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तोडफोडीचे फुटेज समोर आले आहे.

  • 11 Apr 2026 01:50 PM (IST)

    बांगलादेशींविरोधात मनसे आक्रमक

    मिरा-भाईंदरच्या आगीनंतर मनसे आक्रमक झाली असून मनसे शहर प्रमुख संदीप राणे यांनी थेट ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आगीच्या घटनेला जबाबदार असलेल्या जागा मालकांवर आणि भूमाफियांवर मनुष्यवधाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल करावा. या झोपडपट्ट्यांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर राहत असून तिथे मँग्रोव्हजची (कांदळवन) कत्तल करण्यात आली आहे. हे घुसखोर भविष्यात शहरासाठी मोठा धोका ठरणार असून प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र लढा देऊ. या संदर्भात सोमवारी महानगरपालिका आयुक्त आणि डीसीपी यांची भेट घेऊन कठोर कारवाईचा पाठपुरावा करणार असल्याचा इशारा राणे यांनी दिला आहे.

  • 11 Apr 2026 01:40 PM (IST)

    मोबाईलच्या किंमती 40 टक्क्यांनी वाढल्या

    आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम मोबाईलच्या किमतींवर देखील झाला असून तब्बल 40 टक्क्यांनी मोबाईलच्या किमती वाढल्या आहेत. जगभराबरोबरच देशात, राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यात देखील मोबाईलच्या किमती वाढल्याचा पाहायला मिळत आहे . जागतिक स्तरावर वाढलेला भू-राजकीय तणाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि विशेषतः मेमरी चिप्सच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे मोबाईलच्या किमतीत वाढ झाली आहे. Samsung, Xiaomi, Vivo, Oppo आणि Realme यांसारख्या आघाडीच्या कंपन्याच्या स्मार्टफोनच्या मॉडेल्समध्ये किंमतीत तब्बल 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

  • 11 Apr 2026 01:30 PM (IST)

    श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांचं जेलभरो आंदोलन

    श्रीरामपूर येथे अकारी पडीत शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पोलिस ठाण्यासमोरच चूल मांडली.पोलिस ठाण्याच्या आवारात आंदोलक महिलांकडून स्वयंपाक करण्यात आला. पोलिस ठाण्यासमोर शेकडो आंदोलकांचा ठिय्या सुरू आहे. श्रीरामपूर तालुक्यात अकारी पडीत जमिनींच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक दिसले.

  • 11 Apr 2026 01:20 PM (IST)

    अंजली दमानिया यांची चाकणकरांवर टीका

    भोंदू खरात प्रकरणात शिजूका नॉडी या एका नावाचे असंख्य फोन कॉल्स आले आहेत, चाकणकरांचे १७७ कॉल्स आहेत ज्यांची माहिती दिली त्यांना समन्स दिलं गेलं नाही. रुपाली चाकणकर यांनी एवढे कॉल्स का केले ? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.

  • 11 Apr 2026 01:10 PM (IST)

    अजितदादांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय सीबीएसई जिल्हा परिषद शाळा

    अजितदादांच्या पुढाकारामुळे महात्मा फुले यांच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय सीबीएसई जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

  • 11 Apr 2026 01:00 PM (IST)

    विश्व वारकरी सेनेकडून शरद पवारांच्या वक्तव्याला विरोध

    लव्ह जिहादसारख्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी एखादा राजकीय पक्ष पुढाकार घेऊन जर सहकार्य करत असेल तर,आम्ही कीर्तनकार मंडळी सुद्धा जाहीरपणे त्या पक्षाचे समर्थन करणार ,अशी भूमिका घेत विश्व वारकरी सेनेकडून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाला विरोध करण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नाही असं म्हणतं वारकरी संप्रदाय सध्या चांगल्या मार्गाने चालू आहे. हा सनातन धर्म आहे आणि चालत राहील.अस मत विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांनी म्हटलं आहे.

  • 11 Apr 2026 12:59 PM (IST)

    विश्व वारकरी सेनेकडून शरद पवार यांच्या विधानाला विरोध

    लव्ह जिहादसारख्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी एखादा राजकीय पक्ष पुढाकार घेऊन जर सहकार्य करत असेल तर,आम्ही कीर्तनकार मंडळी सुद्धा जाहीरपणे त्या पक्षाचे समर्थन करणार,अशी भूमिका घेत विश्व वारकरी सेनेकडून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाला विरोध करण्यात आलाय.

  • 11 Apr 2026 12:48 PM (IST)

    अल्पवयीन मुलीवर चुलत काकाची बळजबरी

    बीडच्या केज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत काकाने बळजबरीने बलात्कार केला. ही घटना सहन न झाल्याने पीडितेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोन दिवस छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. काल तिचा मृत्यू झाला.

     

  • 11 Apr 2026 12:26 PM (IST)

    शरद पवारांचा वारकरी संप्रदायाचा अभ्यास कमी – ह भ प ज्ञानेश्वर महाराज जोगदंड

    शरद पवारांचा वारकरी संप्रदायाचा अभ्यास कमी आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाचा सर्वांगीण अभ्यास करून वक्तव्य करावे असे विधान वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह भ प ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी केले. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी आणि पुरोगामी हा विषयच येत नाही.

  • 11 Apr 2026 12:14 PM (IST)

    ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना मातोश्रीवर बोलावलं

    ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर अरविंद सावंत यांना मातोश्रीवर बोलावलं. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत.

  • 11 Apr 2026 12:12 PM (IST)

    अकारी पीडीत जमिनींच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक

    अकारी पडीत शेतक-यांचा मोर्चा श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यावर धडकला. हा लढा निर्णायक. जेलभरोची आंदोलक शेतकऱ्यांची तयारी. पोलिस ठाण्यासमोर आंदोलकांचा ठिय्या. श्रीरामपूर तालुक्यात अकारी पीडीत जमिनींच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक. शेकडो शेतकरी रस्त्यावर, भव्य मोर्चा आणि जेलभरो आंदोलन. सरकारच्या दिरंगाई विरोधात संताप उफाळला.

  • 11 Apr 2026 11:45 AM (IST)

    ओशिवारा येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालकांनी गोंधळ घातला

    मनसेचे संदेश देसाई म्हणाले की काल सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक व कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे ओरिजनल लिव्हिंग सर्टिफिकेट, रिझल्ट तसेच 2026 चा निकाल देण्यास टाळाटाळ केली जात होती. विद्यार्थ्यांचे भविष्य अडवण्याचा हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नव्हता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई व शाखा अध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेत “मनसेचा दणका” दाखवत संबंधित शाळा प्रशासनाला जाब विचारला आणि मनसेच्या दबावामुळे शाळेला झुकावे लागले आणि विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मंजूर करून त्वरित कागदपत्रे देण्यात आली.

  • 11 Apr 2026 11:30 AM (IST)

    जळगावच्या चोपडा तालुक्यात मजूर मिळत नसल्याने शेतकरी यंत्रांच्या साह्याने करतायेत शेती…

    बैल जोडी वागणं शक्य नसल्याने तर दुसरीकडे मजुरांची टंचाई यामुळे शेतकऱ्याकडून यंत्रांचा वापर होत आहे. मजूर व बैलजोडीवर अवलंबून न राहता पिकांच्या लागवडीनंतर शेतकरी यंत्रणाच्या साह्याने कामे करताना दिसून येत आहे. एका यंत्रणाच्या साह्याने शेतातील वखरणी, रोटावेटर, रोपांना माती लावणे, टिलर असे एकाच वेळी चार कामे पूर्ण होत असल्याने वेळेची बचत होत आहे. यंत्रणाच्या साह्याने शेतीचे काम करताना वेळेचे बचत व पैशाची बचत होते आणि काम दर्जेदार होत असल्याचे शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे.

  • 11 Apr 2026 11:12 AM (IST)

    युद्ध थांबले मात्र गॅस वितरणाचा गोंधळ थांबेना, धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर रांगा

    मुबलक गॅस साठा असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तरी देखील एजन्सी बाहेर लोक ताटकळत उभे आहेत. गॅस कधी मिळेल सांगत नाही, जेवायलाही जाता येत नाही म्हणून डबे घेऊन आलो… गॅस साठीच्या रांगेतील महिलेने असे वक्तव्य केले आहे. दोन-तीन दिवसापासून गॅस साठी फेरा मारतोय गॅस मिळेना… यासाठी लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

     

  • 11 Apr 2026 10:56 AM (IST)

    कंडारी खुर्द येथे पाणीटंचाईवर मनसेकडून गांभीर्याने दखल

    जालना जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढत चालल्याने आतापासूनच ग्रामीण भागातल्या नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली. बदनापूर तालुक्यातल्या कंडारी खुर्द येथे भीषण पाणीटंचाईचा प्रश्न उभा ठाकल्यानंतर TV9 मराठी या वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी या समस्येची वास्तव परिस्थिती जनतेसमोर मांडली होती. या बातमीचा थेट परिणाम पाहायला मिळाला असून मनसेने याची गांभीर्याने दखल घेत तातडीने गावकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केलाय.

  • 11 Apr 2026 10:45 AM (IST)

    प्रत्येक it कंपनीत चौकशी करावी; नाशिक प्रकरणानंतर पडकळकरांची मागणी

    आता कॉर्पोरेट जिहाद समोर आलंय. नाशिकमध्ये जे घडलं गंभीर आहे. उच्चशिक्षित मुलींना देखील जाळ्यात ओढण्यात आले. उच्च पदावर बसून अमिश दाखवण्यात आले. एका मुलीला तिघांनी टार्गेट केले. आम्ही जेव्हा हा विषय मांडतो तेव्हा विचारवंत आमच्यावर टीका करतात. प्रेमप्रकरण असले की असे विषय मांडतात. व्हिडीओ काढणे हे काय प्रेम आहे का? प्रत्येक it कंपनीत चौकशी करावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

  • 11 Apr 2026 10:30 AM (IST)

    मुंबईतील मिठी नदीत जलपर्णीचं साम्राज्य

    मुंबईतील मिठी नदीत जलपर्णीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे पूर आणि आरोग्याचा धोका वाढला आहे. मिठी नदीत सध्या जलपर्णी (वॉटर हायसिंथ) मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदीचे पात्र अक्षरशः जलपर्णीच्या विळख्यात अडकले आहे. विशेषतः कुर्ला, साकीनाका, धारावी आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात नदीच्या पृष्ठभागावर दाट जलपर्णीचे थर साचले असून पाण्याचा प्रवाह मंदावला आहे.

  • 11 Apr 2026 10:15 AM (IST)

    पोलिसांची बदनामी करणाऱ्या दोन युट्युबरवर गुन्हा दाखल

    स्त्याच्या मध्यभागी उभा असणाऱ्या रिक्षा वर कारवाही करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर रिक्षाचालकाची दादागिरी. रिक्षाचालकासह व्हायरल व्हिडीओ आपल्या युट्युब चॅनल वर चालवून, पोलिसांची बदनामी करणाऱ्या दोन युट्युब चॅनल वर वसई च्या माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 11 Apr 2026 09:54 AM (IST)

    वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी – शरद पवार

    वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी, शरद पवार यांनी हे विधान केलं आहे. वारकरी संप्रदायात 60 टक्के लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचं पवार म्हणाले. म्हणून आम्ही यादी काढायला सुरूवात केली. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर महिला कुठे नाही, असंही ते म्हणाले.

  • 11 Apr 2026 09:33 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर – गो गँस पंपावर ऑटो एलपीजी गॅसचे दर 25 रुपयांनी कमी

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचे दर गो गँस पंपावर 25 रुपयांनी कमी झाले.  125 रुपये लिटर वरून आता ऑटो एलपीजी गॅस 100 रुपये लिटर इतका झाला आहे.  मात्र इतर पंपावर 125 रुपये लिटर प्रमाणेच ऑटो एलपीजी गॅस मिळतोय . छत्रपती संभाजी नगर मध्ये सगळ्याच पंपावर ऑटो एलपीजी गॅसचा पुरवठा, मात्र रांगा कायम आहेत.

  • 11 Apr 2026 09:23 AM (IST)

    ठाणे – उष्णतेचा कहर रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

    ठाणे – उष्णतेचा कहर रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे.  ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर हिट ॲक्शनप्लान राबवण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. प्रत्येक आयुष्यमान आरोग्य मंदिरात हिट स्ट्रोक व्यवस्थापन युनिट तयार ठेवण्याचे तसेच आरोग्य केंद्रात औषधे ,ओआरएस आणि आवश्यक द्रव्यांचा पुरेसा साठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 11 Apr 2026 09:09 AM (IST)

    नांदेड, परभणी, हिंगोलीतील अनेक गावांत भूकंपाचे धक्के

    नांदेड, परभणी, हिंगोलीतील अनेक गावांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी जमीन हादरल्याने नागरिक भयभीत झाले.  यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेबाळपिंपरी भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले.  नांदेड शहर आणि परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, भूगर्भातून आला आवाज.

  • 11 Apr 2026 09:06 AM (IST)

    पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

    पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.  मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर रविवार सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 दरम्यान मेगाब्लॉक असेल.

नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता आहे. NIA, ATS सोबतच CBI कडून लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाची चौकशी होऊ शकते. SIT कडून प्रकरणाची महत्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली. भोंदू अशोक खरात प्रकरणी ED कडून कारवाई, अशोक खरातची तीन खाती ईडी कडून सील करण्यात आली आहे. त्याच्या पत्नीच्या खात्याचाही समावेश आहे. न्यायाधीश परीक्षेत मुलांच्या गटात सोलापूरचे प्रथमेश शिंदे राज्यात प्रथम आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या जेएमएफसी पदा साठीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाले. राज्यात येत्या काही दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने(IMD) दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 43 दरम्यान जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे.  यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी या ब्लॉगमध्ये वाचा.

Follow Us