राज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा, जनगणनेसाठी ओबीसींचा राज्यभर एल्गार

| Updated on: Jan 24, 2021 | 3:40 PM

या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, नंतर मोर्चा काढण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. | OBC Morcha

राज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा, जनगणनेसाठी ओबीसींचा राज्यभर एल्गार
Follow us on

जालना: ओबीसी समाजाची (OBC Marcha) स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात अनेक प्रमुख ओबीसी नेते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ असे बॅनर्स झळकावले. तसेच आगामी काळात या मुद्द्यावरुन आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला. (OBC Morcha in Jalna)

या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, नंतर मोर्चा काढण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. या मोर्चासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जालन्यात आले आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळेच पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावाल तर सगळा ओबीसी समाज एकत्र आहे, असा इशारा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिला.

‘हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, फक्त आमच्या हक्कासाठी’

हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही. हा मोर्चा आमच्या हक्कासाठी काढला आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार केले. तुम्ही निवेदन दिलं मी हे प्रश्न सातत्याने मांडत आहे. मी पक्ष धर्म जात पात सोडून मी फक्त ओबीसी म्हणून लढत आहे. ही प्रेरणा गोपीनाथ मुंढे यांच्याकडून मिळाली ते आज हयात नाहीत, त्यांनी केलेल्या संघर्षाला सलाम केलं पाहिजे, भुजबळ यांनीही धुरा हाती घेतली ते ही लढत राहिले हे ओबीसींच्या हक्कसाठी लढणारे नेते आहेत, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

ओबीसीची स्वतंत्र जनगणना होत नसेल तर मी मुख्यमंत्री आणि मोदी साहेब यांना विनंती करू. विधानसभेत स्वतंत्र जनगननेचा प्रस्ताव मी मांडणार आहे. पक्षाच्या पलीकडे लढाई जात नाही तोपर्यंत यश मिळणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

आम्हीही याच देशाचे, आमचीही गणती करा, पंकजा मुंडेंची मागणी, गोपीनाथरावांचा व्हिडीओ ट्विट

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी रविवारी एक ट्विट करून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लोकसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीसोबत पंकज मुंडे यांनी ‘आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा… ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे’, अशी कॅप्शन लिहली आहे. त्यामुळे आगामी काळात ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक होण्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या:

आम्हीही याच देशाचे, आमचीही गणती करा, पंकजा मुंडेंची मागणी, गोपीनाथरावांचा व्हिडीओ ट्विट

ओबीसी जनगणनेबाबात एकमत, महाराष्ट्र विधानसभेत कोण काय म्हणाले?

(OBC Morcha in Jalna)