Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंना ‘गेट आऊट’ हे दोन शब्द भोवणार का? वातावरण पेटणार का?

अभिजीत दीपके यांच्या विरोधात पोलीस बॉइज संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. याच संघटनेने दीपकेंच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंना गेट आऊट हे दोन शब्द भोवणार का? वातावरण पेटणार का?
| Updated on: Aug 13, 2026 | 8:39 AM

कोक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आता सरकारी शाळा सुधारण्याचा मुद्दा हाती घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील दीपके यांचं नाव देशभरातील घराघरात पोहोचलं आहे. त्यामुळे अभिजीत दीपके यांच्या भेटीसाठी शेकडो लोक छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत. यामुळे दीपके यांच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. याचदरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याला अभिजीत दीपके यांनी चुकीची वर्तवणूक दिल्याचा आरोप केला जात आहे. यावरून पोलीस बॉईज संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दीपके यांच्या विरोधात पोलीस बॉईज संघटनेने महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे मूक आंदोलन केलं होतं. स्वत:च्या वयापेक्षा मोठे असलेल्या अधिकाऱ्याला चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करत संघटनेने आंदोलन केले होते. अभिजीत दीपके यांचं गृह खात्यानं दिलेले संरक्षण काढून घ्यावे, अशी मागणी संघटनेनेकडून केली जात आहे. अभिजीत दीपके यांनी पोलिसांशी संयमाने वागलं पाहिजे, असं संघटनेचं म्हणणं आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे विदर्भ अध्यक्षा आरती जंगळे यांनीही दीपकेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

अभिजीत दीपके यांनी पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे .पोलीस संरक्षणादरम्यान अनोळखी व्यक्तीला दीपके यांच्या घराच्या आवारात प्रवेश देण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांकडून विचारपूस करण्यात येत होती. यावेळी संबंधित व्यक्ती आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. त्याचवेळी अभिजीत दीपकेंची एन्ट्री झाली. त्यावेळी मला कोणाला भेटायचं, हे मी ठरवणार असे दीपकेंनी सांगितले होते. याचवेळी झालेल्या वादावरून पोलीस बॉइज संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अभिजीत दिपके यांनी ड्युटीवरील अधिकाऱ्याला ‘गेट आऊट’ असे शब्द वापरल्याचा आरोप महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केलाय. या प्रकाराचा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने निषेध केला आहे. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विदर्भ अध्यक्षा आरती जांगळे यांनी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र आणि विदर्भभर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us