AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : पोलीस ज्याला शोधत होते, तो वाँटेड आरोपी अभिजीत दीपकेंच्या मंचावर?; काय आहेत आरोप? प्रकरण काय?

नीट पेपरफुटीविरोधातील दिल्लीतील आंदोलनाला CJP ने पाठिंबा दिला. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर या आंदोलनाला यश मिळाले. मात्र, या आंदोलनात एक वॉंटेड आरोपी हा CJP संस्थापक अभिजीत दीपकेसोबत दिसल्याने खळबळ उडाली आहे. राजस्थान पोलिसांनी दोन दिवस जंतर-मंतरवर त्याच्यावर नजर ठेवली, पण गर्दीत तो पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. सध्या पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Abhijeet Dipke : पोलीस ज्याला शोधत होते, तो वाँटेड आरोपी अभिजीत दीपकेंच्या मंचावर?; काय आहेत आरोप? प्रकरण काय?
| Updated on: Aug 11, 2026 | 12:04 PM
Share

नीट पेपरफुटीच्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या तरूणाईने, जेन-झीने राजधानी दिल्लीत केलेलं आंदोलन सर्वांनीच पाहिलं. कॉकरोच जनता पार्टीनेही (CJP) तरूणाईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ते आग्रही होते. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि आंदोलनाला माोठं यश मिळालं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनात एक वॉंटेड आरोपी सहभागी झाल्याची आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांच्यासोबत दिसून आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एवढंच नव्हे वाँटेड आरोपी रामचंद्र याला अटक करण्यासाठी राजस्थान पोलिसांचं चार सदस्यीय विशेष पथक दिल्लीतील जंतर-मंतरवर पोहोचलं होतं असंही समोर आलंय. CJPच्या आंदोलनादरम्यान रामचंद्र तिथे उपस्थित असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, गर्दी आणि आंदोलनातील प्रमुख व्यक्तींमध्ये त्याची सतत असलेली उपस्थिती यामुळे पोलिसांना कारवाईची संधीच मिळाली नाही. अखेर तो फरार झाला.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, रामचंद्र जंतर-मंतरवर असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर राजस्थान पोलिसांचे पथक तातडीने दिल्लीला रवाना झालं. पथकाने घटनास्थळी पोहोचून त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली. मात्र, रामचंद्र सतत अभिजीत दीपके आणि इतर प्रमुख व्यक्तींच्या आसपासच वावरत होता. कधी तो मंचाजवळ दिसत होता, तर कधी गर्दीत मिसळत होता. त्यामुळे त्याला इतरांपासून वेगळे करून ताब्यात घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरलं.

17 लाखांच्या फसवणुकीचा आरोप

रामचंद्रविरोधात राजस्थानमधील झुंझुनू येथील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात AVYAAN Automotive Pvt. Ltd.च्या माध्यमातून वाहन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचा उल्लेख त्यामध्ये होता. तक्रारदार साजिद दिवान यांच्या आरोपानुसार, Range Rover Defender 130 गाडी मिळवून देण्याचे आश्वासन देत रामचंद्रने त्यांच्याकडून तब्बल 17 लाख रुपये ॲडव्हान्स घेतले होते. मात्र, पैसे घेतल्यानंतरही ना गाडी देण्यात आली, ना आगाऊ रक्कम परत करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रामचंद्रला चौकशीसाठी हजर राहण्याच्या अनेक नोटिसा बजावल्या. मात्र, तो चौकशीसाठी हजर झाला नसल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे.

जंतर-मंतरवर पोलिसांचा दोन दिवस वॉच

कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी श्रवण कुमार मील यांच्या सांगण्यानुसार, राजस्थान पोलिसांच्या पथकाने जवळपास दोन दिवस जंतर-मंतरवर तळ ठोकला होता. रामचंद्र गर्दीतून किंवा मंचापासून काही क्षणांसाठीही वेगळा झाला असता, तर त्याला तत्काळ ताब्यात घेण्याची पोलिसांची तयारी होती. मात्र, तो सतत लोकांच्या गराड्यातच होता. मंचाजवळ आणि आंदोलनातील प्रमुख व्यक्तींसोबत त्याची सतत ये-जा सुरू होती. त्यामुळे थेट कारवाई केल्यास गर्दीत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती. संभाव्य कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला घटनास्थळी अटक करण्याचा धोका पत्करला नाही.

अभिजीत दीपकेवर शाईफेक झाली, तेव्हाही आरोपी होता घटनास्थळी

CJPच्या आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर शाई फेकण्याची घटना घडली होती. या घटनेच्या वेळीही रामचंद्र घटनास्थळी उपस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो आयोजक आणि इतर प्रमुख व्यक्तींच्या संपर्कात असल्याचेही दिसून आले. विशेष म्हणजे, रामचंद्र सोशल मीडियावरही CJPशी आपला संबंध असल्याचे दाखवलं. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलच्या बायोमध्ये त्याने स्वतःला ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कोअर टीमचा सदस्य असल्याचे नमूद केलं असून, बायोमध्ये ‘CJP Core’ असंही लिहीलं आहे.

पोलिसांचे पथक दोन दिवस जंतर-मंतरवर त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतं. मात्र, गर्दी आणि मंचावरील सततची उपस्थिती यामुळे रामचंद्रला तिथेच अटक करता आली नाही. अखेर पोलिसांना माघार घ्यावी लागली. रामचंद्र सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी राजस्थान पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका