AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके मोठ्या अडचणीत! POCSO अंतर्गत तक्रार दाखल? इन्फ्लुएन्सरचे चौकशीची मागणी

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता हे नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या सविस्तर...

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके मोठ्या अडचणीत! POCSO अंतर्गत तक्रार दाखल? इन्फ्लुएन्सरचे चौकशीची मागणी
अभिजीत दीपकेImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 9:58 AM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले. वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी या आंदोलनात सीजेपीसोबत सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि यात त्यांना यशही मिळाले. त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? वाचा…

नेमकं प्रकरण काय आहे?

दिल्लीतील आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या उपस्थितीवरून CJP नेते अभिजीत दीपके आणि इतरांविरोधात इंदौर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैझान अंसारी याने चौकशीची मागणी केली आहे. ‘नीट’ (NEET) पेपर फुटीविरोधातील आंदोलनात अल्पवयीन मुलांना आणण्यात आणि सहभागी करून घेण्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

चौकशीची मागणी

तपासात गुन्हा आढळल्यास पोक्सो (POCSO), भारतीय न्याय संहिता (BNS), आयटी ॲक्ट आणि बाल न्याय कायद्यांतर्गत एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. पण अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडीओ आणि सोशल मीडिया सामग्रीचीही चौकशी करण्याची विनंती केली आहे. यावर अभिजीत दीपके यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा अपमान 

तर दुसरीकडे अभिजीत दिपके कॉक्रोच जनता पार्टी संस्थापक यांच्या निवासस्थानी पोलीस संरक्षणादरम्यान ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस संरक्षणादरम्यान एका अनोळखी व्यक्तीला अभिजीत दिपके यांची भेट घेण्यासाठी प्रवेश देण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याची विचारपूस करण्यात येत होती. यावेळी संबंधित व्यक्ती आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. त्याचवेळी अभिजीत दिपके घटनास्थळी आले आणि त्यांनी ड्युटीवरील अधिकाऱ्याला ‘गेट आऊट’ असे शब्द वापरल्याचा आरोप महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केला आहे.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?