AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दिवाळीनंतर राज्यात खांदेपालट होणार, महायुतीतून महत्त्वाची अपडेट समोर!

Bachchu Kadu News: दिवाळीत किंवा दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खांदेपालट होणार असल्याचे बच्चू कडूंनी वक्तव्य केले आहे. बच्चू कडूंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.

मोठी बातमी! दिवाळीनंतर राज्यात खांदेपालट होणार, महायुतीतून महत्त्वाची अपडेट समोर!
| Updated on: Sep 24, 2026 | 3:27 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच उलथापालथ दिसून येणार असल्याचे संकेत दिसत आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बच्चू कडूंच्या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

दिवाळीत किंवा दिवाळीनंतर राज्यात खांदेपालट होणार, असे बच्चू कडू म्हणाले आहेत. बच्चू कडूंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच जळगावातून आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावे, अशी ठाम भूमिकाही बच्चू कडूंनी मांडली आहे. गरज पडली तर किशोर पाटलांसाठी जोर लावू, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठपुराव्याचे बच्चू कडू यांनी वक्तव्य केले आहे.

आमदार आमदार बच्चू म्हणाले की,दिवाळीत किंवा दिवाळीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि मोठा खांदेपालट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्‍यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिला होता. याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली आहे. यामुळे आता बच्चू कडूंनी केलेला दावा नेमका कोणत्या मुद्द्याच्या अनुषंगाने आहे, याची चर्चा आता होत आहे.

आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावं म्हणून बच्चू कडूंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ते सध्या जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच एक मोठी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातून किशोर पाटलांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं. पाहीजे असल्यास जळवाग जिल्ह्यात दोन मंत्रि‍पदे द्या, पण किशोर पाटलांना मंत्री करा, अशी ठाम भूमिका बच्चू कडूंनी मांडली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, किशोर पाटील यांनी सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. ते तीन टर्म आमदार आहेत. यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या मतदारसंघातील जनतेची इच्छा आहे. यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यात यावे, असे कडू म्हणाले आहेत.

Follow Us
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती