Maharashtra Rain Update : पावसाचा जोर कायम, बदलापूरचं बारवी धरण 50 टक्के भरलं…

Maharashtra Rain Update : दमदार पावसामुळे बारवी धरण 50 टक्के भरलं आहे...

Maharashtra Rain Update : पावसाचा जोर कायम, बदलापूरचं बारवी धरण 50 टक्के भरलं...
Image Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 12:27 PM

मुंबई :  गेल्या काही दिवसात बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे बारवी धरण (Barvi Dam) 50 टक्के भरलं आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण लवकर भरण्याची आशा निर्माण झाली आहे. बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि एमआयडीसी, स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा होतो. यंदाच्या पावसाळ्यात (Maharashtra Rain Update) संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली होती. जून महिन्यात बारवी धरणात अवघा 31 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार बॅटिंग सुरू केली असून त्यामुळे बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली होती. जून महिन्यात बारवी धरणात अवघा 31 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार बॅटिंग सुरू केली असून त्यामुळे बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बारवी धरणात सध्या 50 टक्के पाणीसाठा तयार झाला असून गेल्या वर्षी आजच्याच दिवशी हाच पाणीसाठा अवघा 41 टक्के इतका होता. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा बारवी धरण लवकर भरेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

पुढील तीन दिवसही अतिवृष्टीचा इशारा

येत्या तीन दिवसातही राज्यात मुंबई, ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यात पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचाही समावेश आहे. तीन दिवस सुरु असलेल्या पावसाने धरण क्षेत्रातील पाण्याच्या साठ्यात मात्र वाढ होताना दिसते आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व मोठी धरणे ही ठाणे जिल्ह्यात आहेत. ठाणे जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली असून, यातच हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.