सकाळी ऊन, दुपारी अचानक वादळी वारं अन् लगोलग पावसाची हजेरी; महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसाला सुरूवात

| Updated on: Jun 04, 2023 | 1:33 PM

Maharashtra Rain Update Today : वादळी वारं अन् लोकांची दाणादाण!; जळगावसह 'या' भागात मौसमातील पहिल्या पावसाची हजेरी

सकाळी ऊन, दुपारी अचानक वादळी वारं अन् लगोलग पावसाची हजेरी; महाराष्ट्रातील या भागात पावसाला सुरूवात
Follow us on

जळगाव : जून महिना नुकतंच सुरू झालाय. जून उजाडला तसं मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, चाळीसगाव परिसरात मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. रावेर, सावदा, फैजपूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झालीये. नाशिकच्या मालेगाव आणि शहर परिसरात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसंच वाशिममध्ये पाऊस पडला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र सकाळी उन्हाचे चटके लागत होते आणि दुपारी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली.

जळगावात पावसाची हजेरी

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, चाळीसगाव परिसरात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. फैजपूर इथं वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे.चाळीसगाव तालुक्याला देखील वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढलं आहे. झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

जळगावात वादळी वाऱ्यामुळे दाणादाण उडाली आहे. अचानकच्या वादळी वाऱ्यामुळे गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर रावेर, सावदा, फैजपूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. तब्बल अर्धा तासापर्यंत वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर मुक्ताईनगर ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय.

जळगावात आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर दाणादाण उडाली. अचानकच्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

अचानक दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्यांचा प्रचंड वेग असल्यामुळे वाहन चालवणं तसंच रस्त्यावर थांबणं सुद्धा कठीण झाल होतं. या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडाल्याने समोरासमोरील दृश्य दिसेनासे झाले होते. वादळी वाऱ्याबरोबर विजांचाही कडकडाट होत असल्याचं पाहायला मिळालं.

या वादळीवादामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे जळगावमधील वीज पुरवठासुद्धा खंडित झाल्याचं पाहायला मिळालं.

मालेगावात कोसळधार!

नाशिकच्या मालेगाव आणि शहर परिसरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली. वादळी वारा आणि विजाच्या कडकडाटात दमदार पाऊस पडतोय. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पूर्व मान्सून पावसाने उकाड्याने हैराण मालेगावकरांना त्याचा फायदा होईल.

वाशिममध्ये पावसाची हजेरी

वाशिमच्या रिसोड मालेगाव तालुक्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदच वातावरण पाहायला मिळत आहे.