
आज दिनांक 23 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास महापालिकेने शिंदे गट आणि शिवसेना दोघांनाही परवानगी नाकारली आहे. आता याविरोधात शिवसेनेनं न्यायालयात धाव घेतली असून, या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार तसेच शिवसेना शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर येत आहे. खाद्यतेलाच्या दरास घसरण झाली आहे. तेलाच्या 15 लिटर डब्याचे भाव 300 ते 600 रुपयांनी कमी झाले आहेत. ऐन दसरा, दिवाळी अशा मोठ्या सणांच्या तोंडावर खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.