AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हसत खेळत पिकनिकसाठी निघाले, पण वाटेत घडलं असं काही… दमाहे कुटुंबावर काळाचा घाला

महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे सत्र सुरूच असून दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांची माहिती समोर आली आहे. कान्हा केसली येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या गोंदियातील दमाहे कुटुंबाच्या कारला बसने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला.

हसत खेळत पिकनिकसाठी निघाले, पण वाटेत घडलं असं काही... दमाहे कुटुंबावर काळाचा घाला
gondia accident
| Updated on: Jun 03, 2026 | 12:25 PM
Share

महाराष्ट्रात सध्या रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच राज्यात दोन भीषण रस्ते अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील पहिल्या घटनेत मध्य प्रदेशातील कान्हा केसली येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या गोंदियातील दमाहे कुटुंबावर काळाने झडप घातली. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सने ट्रकला मागून धडक दिल्याने चालक-क्लीनरसह १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

दमाहे कुटुंबावर घाला

पर्यटनासाठी निघालेल्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील दमाहे कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला आहे. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कान्हा केसली राष्ट्रीय उद्यानाकडे जात असताना बालाघाट-बैहर मार्गावरील लोंगूर घाटीत कार आणि प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने कारला दिलेल्या जोरदार धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. यात तिचे पती आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत.

दुर्गा निमेश दमाहे (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. आमगाव शहरातील पेंट व्यावसायिक निमेश दमाहे हे आपली पत्नी दुर्गा, मुलगा यश आणि मुलगी रुची यांच्यासह कारने कान्हा केसली येथे पर्यटनासाठी निघाले होते. दरम्यान, लौगर घाटात समोरून येणाऱ्या वेगवान बसने त्यांच्या कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत दुर्गा दमाहे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर निमेश, यश आणि रुची गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने बालाघाट येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; १५ प्रवासी जखमी

तर दुसरी दुर्घटना वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर घडली आहे. महामार्गावरील मुंबई लेनवर, मालेगाव तालुक्यातील चॅनल क्रमांक २२३ जवळ एका चालत्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक आणि क्लीनर यांच्यासह १५ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून जात असताना समोरील ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक बसली. अपघाताची माहिती मिळताच मदत पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने वाहनातून बाहेर काढले. सर्व जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी वाशिम आणि अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Follow Us
मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा; राऊतांनी कुणाला दिल निमंत्रण?
मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा; राऊतांनी कुणाला दिल निमंत्रण?.
सिद्धिवनायक मंदिरात भाविकांची गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला
सिद्धिवनायक मंदिरात भाविकांची गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला.
शिंदे गटच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, संजय राऊत कडाडले
शिंदे गटच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, संजय राऊत कडाडले.
अखेर प्रकरण पेटलंच! नवी मुंबईत विरोधकांचं तीव्र आंदोलन, रोहित पवारांसह
अखेर प्रकरण पेटलंच! नवी मुंबईत विरोधकांचं तीव्र आंदोलन, रोहित पवारांसह.
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर.
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर...
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर....
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात..
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात...
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी.
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,.
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला.