Maharashtra SSC board Exam Date 2027: इयत्ता 10 वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, या दिवशी पहिला पेपर, तयारीला लागा!
SSC 10 th Class Exam Timetable : चांगले गुण मिळावेत म्हणून इयत्ता दहावीचे विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करत आहेत. परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे. दरम्यान, आता इयत्ता दहावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

SSC 10 th Class Exam Timetable : इयत्ता दहावीचे वर्ष हे खूपच महत्त्वाचे मानले जाते. या परीक्षेत चांगले गुण मिळाले की नंतर तुम्हाला इयत्ता अकरावीसाठी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे ठरवणे सोपे जाते. विशेष म्हणजे इयत्ता दहावीत जेवढे जास्त गुणे तेवढेच तुम्हाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये चांगला अभ्यास करावा असे पालक, शिक्षक सांगत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. आमची परीक्षा नेमकी कधी होणार, असे या विद्यार्थ्यांकडून विचारले जात होते. आता याच परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.
परीक्षा नेमकी कधीपासून सुरू होणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेची तारीख सोबतच जाहीर केली आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी रोजीपासून सुरू होईल. ही परीक्षा नंतर 11 मार्चपर्यंत चालेल. या तारखा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षेचे नियोजन कसे करावे?
दरम्यान, इयत्ता दहावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने विद्यार्थी पूर्ण वर्षभर अभ्यास करतात. त्यामुळे आपल्याला चांगले गुण मिळतील का? अशी बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते. परंतु शंका, चिंतेमध्ये न पडता विद्यार्थ्यांनी अभ्यास करत राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपला राहिलेल्या विषयांचा अभ्यास लवकर संपवून सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. असे केल्याने विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची असलेली भीती संपते. परिणामी प्रत्यक्ष परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपन कमी होते. अभ्यासाचे योग्य नियोजन हेदेखील चांगले गुण मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. दडपण, तणाव येत असेल तर विद्यार्थ्यांनी योगा, प्राणायाम, ध्यान करणेही फायदेशीर ठरते. परीक्षेच्या ओझ्यामध्ये दबून न जाता खुल्या मनाने अभ्यास करून तेवढ्याच खुलेपणाने पेपर दिल्यास चांगले गुण मिळू शकतात.