AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI वापरणं बंद केल्यास एका वर्षात होईल बचतच बचत; तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

UPI मुळे पैसे खर्च करताना रोख रक्कम हातातून जात असल्याची जाणीव तुलनेने कमी होते. त्यामुळे अनेकदा गरज नसतानाही छोट्या-छोट्या वस्तूंवर पैसे खर्च होतात. उदाहरणार्थ, 10, 20 किंवा 50 रुपयांचे पेमेंट UPIवर सहज करता येते.

UPI वापरणं बंद केल्यास एका वर्षात होईल बचतच बचत; तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
upi useImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 9:58 PM
Share

UPI Transaction : आजच्या डिजिटल युगात UPI हा आपल्या दैनंदिन व्यवहाराचा महत्त्वाचा भाग बनला आहे. भाजीपाला खरेदी करण्यापासून ते मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये बिल भरण्यापर्यंत, काही सेकंदांत पेमेंट होत असल्याने रोख पैसे बाळगण्याची गरजही कमी झाली आहे. मात्र, या सोयीचा एक वेगळा परिणामही आपल्या खर्चाच्या सवयींवर होत असल्याचे काही अहवालांमधून समोर आले आहे. साधारण 81 टक्के लोक आपल्या रोजच्या व्यवहारात यूपीआयचा वापर करतात. सरासरी सांगायची झाल्यास एक व्यक्ती दररोज 200 रुपयांपर्यंतचा व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून करते.

छोट्या-छोट्या वस्तूंवर पैसे खर्च होतात

UPI मुळे पैसे खर्च करताना रोख रक्कम हातातून जात असल्याची जाणीव तुलनेने कमी होते. त्यामुळे अनेकदा गरज नसतानाही छोट्या-छोट्या वस्तूंवर पैसे खर्च होतात. उदाहरणार्थ, 10, 20 किंवा 50 रुपयांचे पेमेंट UPIवर सहज करता येते. रोख पैसे देताना मात्र आपण अशा खर्चाचा विचार थोडा अधिक करू शकतो.

वर्षभरात किती रुपये वाचू शकतात?

समजा एखादी व्यक्ती दररोज सरासरी 200 रुपये UPIद्वारे खर्च करते. महिन्याला ही रक्कम जवळपास 6 हजार रुपये होते. यातील 15 ते 20 टक्के खर्च हा केवळ पेमेंटची सहजता आणि अचानक खरेदी करण्याच्या सवयीमुळे होत असेल, तर महिन्याला सुमारे 900 ते 1,200 रुपये अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो. म्हणजेच वर्षभरात जवळपास 10,800 ते 14,400 रुपयांपर्यंतची रक्कम वाचू शकते.

कुठे यूपीआय पेमेंट टाळायचे?

मात्र, याचा अर्थ UPI पूर्णपणे बंद करणे हाच बचतीचा उपाय आहे, असे नाही. UPIमुळे अनेक व्यवहार सोपे आणि सुरक्षित झाले आहेत. त्यामुळे डिजिटल पेमेंट बंद करण्याऐवजी खर्चावर मर्यादा घालणे अधिक व्यवहार्य ठरू शकते. किराणा, प्रवास आणि इतर आवश्यक खर्चासाठी UPIचा वापर सुरू ठेवता येईल. मात्र ऑनलाइन शॉपिंग, बाहेरचे खाणे किंवा अनावश्यक खरेदीसाठी आठवड्याची किंवा महिन्याची ठराविक मर्यादा निश्चित करता येईल. अशा प्रकारे UPIची सुविधा कायम ठेवूनही अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...