AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Narvekar : आशाताईंच्या निधनाचा शोकप्रस्ताव वाचताना इतक्या चूका कशा झाल्या? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की..

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल सभागृहात दिवंगत गायिका आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव मांडला. त्यावेळी वाचनात त्यांच्याकडून बऱ्याच चूका झाल्या. मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव असं राज ठाकरेंनी म्हटलं. त्यावर राहुल नार्वेकर यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे.

Rahul Narvekar : आशाताईंच्या निधनाचा शोकप्रस्ताव वाचताना इतक्या चूका कशा झाल्या? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की..
Rahul Narvekar
| Updated on: Jun 24, 2026 | 12:46 PM
Share

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काल सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत गायिका आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर बोलताना राहुल नार्वेकर यांच्याकडून वाचनात चुका झाल्या. त्यावरुन राहुल नार्वेकर वादात सापडले आहेत. नार्वेकरांना त्यांच्या मराठी उच्चारणावरुन ट्रोल करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगेच विधानसभा अध्यक्षांच्या वाचनाची दखल घेतली व त्यांच्यावर टीका केली. आज विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर हा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं. “सर्वांसारखा मराठीचा अभिमान मलाही आहे. वाचन करताना माझ्याकडून चूक घडली. घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करतो” असं राहुल नार्वेकर म्हणाले.

“सभागृहाची कार्य पद्धती मराठीतून हाताळली आहे. प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्ट लहान होता” असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी वाचनात झालेल्या चुकांबद्दल दिलं. “आपली प्रतिमा मलिन होईल अशी चुकीचा वाक्योचार असलेली प्रिंट देणारे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या सभागृहाची प्रतिमा मलिन होता कामा नये”अशी मागणी शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांनी केली.

राहुल नार्वेकर काय म्हणाले?

“शोक प्रस्तावाचं वाचन करत असताना जे लिहून देण्यात आलं होतं, त्यात काही चुका होत्या. त्या तशाच वाचल्या गेल्या. मला मराठी भाषेचा अभिमान आहे. आशा ताईचा अवमान राज्यातील जनता करू शकत नाही. जे घडलं ते एका चुकीमुळे घडलं आहे. ज्याच्या भावना दुखावल्या असतील दिलगिरी व्यक्त करतो” असं राहुल नार्वेकर म्हणाले. “बारा शोक प्रस्ताव होते. मला जी प्रिंट मिळाले ती अस्पष्ट होती. काही तांत्रिक चुका होत्या.वाचन करताना एक चूक झाली. चार वर्ष मी अध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी अनेक भाषणं मराठीत केली आहेत. शोक प्रस्ताव मराठीत केले आहेत. नियम असतील,सभागृह कार्यपद्धती मराठी भाषेतून हाताळली आहे” असं राहुल नार्वेकर म्हणाले.

जे घडलं ते एका चुकीमुळे झालं

“मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाला आहे. त्यापेक्षा अधिक मला मराठी भाषेबद्दल अभिमान आहे. स्वर्गीय आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही कोणतीही व्यक्ती करू शकत नाही.विधान सभा अध्यक्ष करू शकत नाही. जे घडलं ते एका चुकीमुळे झालं. त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. राज्यातील लोकांचे, सभागृहातील सदस्यांचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो” असं राहुल नार्वेकर बोलले.

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण