Maharashtra Cold Wave : महाराष्ट्र गारठला, पारा गोठला; नागपूर धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद, थंडीमुळं हुडहडी भरली

| Updated on: Dec 20, 2021 | 10:05 AM

उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासून थेट थंड वारे (Cold Wave) महाराष्ट्राच्या (Maharashtra) दिशेने वाहत असल्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील पारा कमी झालाय.

Maharashtra Cold Wave : महाराष्ट्र गारठला, पारा गोठला; नागपूर धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद, थंडीमुळं हुडहडी भरली
नववर्षाचा पहिला आठवडा थंडीचा
Follow us on

मुंबई: उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासून थेट थंड वारे (Cold Wave) महाराष्ट्राच्या (Maharashtra) दिशेने वाहत असल्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील पारा कमी झालाय. आजची सर्वात कमी तापमानाची नोंद नागपूरमध्ये झाली आहे. ज्येष्ठ हवामानतज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितानुसार आज सकाळी नागपूरमध्ये 7.4 अंश तापमानाची नोंद झाली. तर, मुंबईत 19.2 अंश तापमान नोंदवलं गेलं आहे.

महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस थंडीचे

उत्तर भारतात थंडीचं प्रमाण वाढलं असून उत्तरेतून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेनं वाहत आहेत. यामकारणामुळं राज्यातील थंडी वाढली आहे. मुंबई आणि ठाण्यासह कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आलीय. उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासून थेट थंड वारे दक्षिण भारताच्या दिशेनं वाहत आहेत.

आजची तापमानाची नोंद

मुंबईत 19.2, नागपूरमध्ये 7.4, परभणी कृषी विद्यापीठ 9.5, चिखलठाणा 10.6, जालना 10.8, जेऊर 11, बारामती 11.2, पुणे 11.2 , उस्मानाबाद 11.3, धुळे 7, नाशिक 11.4 , परभणीत 11.5, पुण्यातील शिरुरमध्ये 9.1, नाशिकच्या निफाडमध्ये 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

नागपूरमध्ये यावर्षीच्या कमी तापमानाची नोंद

राज्याची राजधानी नागपूरमध्ये पारा घसरला असून तापमान 7.4 अंशावर आलं आहे. ही या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद आहे. विदर्भातील इतर शहरातील तापमान 10 अंशाच्या आसपास आहे. विदर्भात नागपूरमधील वातावरण सर्वात थंड असून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भात थंडीची लाट निर्माण झालीय. 24 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

नाशिकच्या निफाडमध्ये 8.5 तापमानाची नोंद

उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने थंड वाऱ्यामुलं निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तर उपदार कपडे परिधान करुन गरम पदार्थ सेवन केले जाते या कडाक्याच्या थंडीचा मानवी जीवना बरोबर शेती पिकांवरही चांगला-वाईट परिणाम होताना दिसतोय. थंडीचा गहू हरभरा या पिकांना फायदा होतो तो तर द्राक्षांवर याचा परिणाम होतो तर या कडाक्याच्या थंडीमुळे गहू व हरभरा पिकाला फायदा होतो.

उत्तर भारतात थंडीची लाट

राजधानी नवी दिल्लीतील तापमान 4 अंशावर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाब, उत्तर प्रदेश हरियाणा सह अनेक राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढलीय. नवी दिल्लीतील चोवीस तासातील सर्वात कमी तापमान पाच डिग्रीवर पोहोचलंय. उत्तराखंड हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

इतर बातम्या:

Nashik | …मधाचं बोट कुणी चाखवा, मला लागलाय खोकला; निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर!

Weather Forecast : मुंबईतील तापमान कमी होण्यास सुरुवात, पुण्यात कडाक्याची थंडी, नंदुरबारमध्ये पारा 11 अंशावर

Maharashtra Weather Forecast Cold wave in North India Maharashtra temperature reach at seven