Maharashtra Weather Alert | राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता

| Updated on: May 01, 2021 | 4:16 PM

राज्यात 1 ते 2 मे पर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गरपीटसुद्धा होऊ शकते. (maharashtra weather forecast rain)

Maharashtra Weather Alert | राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता
weather-alert
Follow us on

मुंबई : राज्यात उन्हाता तडाखा वाढलेला असताना मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. कालपासून (30 एप्रिल) राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. पुढील दोन दिवस राज्यामध्ये असेच वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 1 ते 2 मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गरपीटसुद्धा होऊ शकते. तसा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विशेषत्वाने मध्य माहाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather forecast rain possibility of thunderstorm in state hailstorm at isol places on Saturday Sunday)

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट

हवानाम तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी राज्याच्या हवामानाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या रविवारपर्यंत (2 मे) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते.

पुढील 3 ते 4 तासांत बीड, सातारा, नंदुरबारमध्ये पाऊस

आजसुद्धा राज्यात दमट वातावरणासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बीड, नंदुरबार आणि साताऱ्यात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच याच भागात तुरळ ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते. असा अंदाज मुंबईच्या हवामान खात्यानं वर्तविला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा

मागील काही दिवसांपासून राज्यात हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसतोय. 30 एप्रिल रोजी राज्यात अनेक ठिकाणी कडक ऊन पडलेले असताना पाऊस बरसला. उन्हाच्या कडाक्यात धुळे शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. येथे काही ठिकाणी वादळीवारासुद्धा सुटला होता. नाशिकमध्येसुद्धा विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुटले होते. येथील मनमाडसह नांदगाव तालुक्यात हलका पाऊस झाला. या ठिकाणी काही प्रमाणात शेतकऱ्यांनी काढलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आज आणि रविवारी काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या पिकांना सुरक्षित ठिकणी ठेवावे. तसेच काढणीला आलेल्या पिकांची लवकरात लवकर काढणी करावी असेसुद्धा हवामान विभागाने सांगितले आहे.

इतर बातम्या :

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड सुरुच,अवकाळी पावसानं हातातला घास मातीमोल होण्याचं संकट

पुण्याच्या संस्थेकडून सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती, एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल उत्पादन मिळणार

हापूस आंबा ओळखण्यासाठी आता खास GI टॅग, देवगडच्या शेतकऱ्यांचा खास उपक्रम

(Maharashtra Weather forecast rain possibility of thunderstorm in state hailstorm at isol places on Saturday Sunday)