कोकणात धुमशान… नितेश राणेंनी गेम फिरवला… उद्धव ठाकरेंना जबर धक्का, थेट उमेदवारच…

विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक राहिलेले असतानाच कोकणात मोठा ट्विस्ट आला आहे. कोकणातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला आहे. विशेष म्हणजे ते अर्ज मागे घेत असताना महायुतीचे नेते आणि मंत्री नितेश राणे उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोकणात धुमशान... नितेश राणेंनी गेम फिरवला... उद्धव ठाकरेंना जबर धक्का, थेट उमेदवारच...
| Updated on: Jun 04, 2026 | 1:24 PM

कोकणातील विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या निवडणुकीत मोठा गेम फिरवला आहे. नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराशी संवाद साधला आणि सर्व चक्रे फिरली. अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्जच मागे घेतला आहे. स्वत: नितेश राणे महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर, नितेश राणे यांच्या राजकीय चातुर्याची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीचे उमदेवार म्हणून उद्धव ठाकरे गटाचे सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी अर्ज भरला होता. त्यामुळे कोकणातील निवडणुकीत मोठी रंगत येणार असल्याचे संकेत मिळत होते. पण त्यापूर्वीच मंत्री नितेश राणे यांनी गेम फिरवला आहे. नितेश राणे यांनी बाळ माने यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर सूत्रे फिरली. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नितेश राणे हे बाळ मानेंना घेऊन रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तिथे माने यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे कोकणातील महायुतीची जागा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मविआची साथ मिळाली नाही

यावेळी बाळ माने यांनी मीडियाशी संवाद साधला. सूचक म्हणून माझ्या अर्जावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सह्या मिळाल्या नाहीत. मविआतील घटक पक्षाकडून मला कोणतीही साथ मिळाली नाही. त्यामुळे नाईलाजाने मला निर्णय घ्यावा लागला, असं सांगतानाच मला घोडे बाजार टाळायचा होता. त्यामुळेही मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे, असं बाळ माने म्हणाले. तीर्थयात्रेला काही मंडळी गेले आहेत. मला मतदार भेटत नाहीये. मी काय करू? असा सवाल माने यांनी केला.

आमच्या शब्दाचा मान ठेवला

मी महायुतीचा प्रतिनिधी आणि कार्यकर्ता म्हणून आलो आहे. मी त्यांना आणलं नाही. या गोष्टी होत असतात. मी प्रतिनिधी आहे. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करत आहेत, आज सबकुछ देवाभाऊ अशी परिस्थिती आहे. राज्याला पुढे न्यायचे असेल किंवा भविष्य घडवायचे असेल तर फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही हे सर्वांना कळून चुकलं आहे. बाळ माने माजी आमदार आहेत. त्यांना बरं वाईट सर्व कळतं. त्यामुळेच त्यांनी माघार घेतली आहे. महायुतीचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्यासोबत आलो आहे. त्यांनी आमच्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवला आणि त्यांना जी परिस्थिती दिसली. त्यावरून त्यांनी निर्णय घेतला आहे, असं नितेश राणे म्हणाले.

Follow Us