नर्तकी कला केंद्रात, माजी उपसरपंचाने जीव देण्याआधी घेतली ‘या’ व्यक्तीची भेट, गाैप्यस्फोट, पुढे गाडीत जावून थेट..

Beed Crime : माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. फक्त नर्तकीच नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबियांवर आता गंभीर आरोप होताना दिसत आहेत. गोविंदने जीवन संपवण्याच्या शेवटच्या क्षणी काय घडले याबद्दल खुलासा झालाय.

नर्तकी कला केंद्रात, माजी उपसरपंचाने जीव देण्याआधी घेतली या व्यक्तीची भेट, गाैप्यस्फोट, पुढे गाडीत जावून थेट..
Govind Barge case
| Updated on: Sep 12, 2025 | 12:38 PM

माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये काही गंभीर आरोप करण्यात आली. गोविंद बर्गे हा मागील काही दिवसांपासून तणावात होता. कला केंद्रातील नर्तकी त्याला पैसा, जमीन आणि घरासाठी दबाव आणत होती. गोविंदने आपल्या मित्राला याबद्दल सांगितले. कला केंद्रात गोविंद आणि नर्तकी पूजा गायकवाड यांची ओळख झाली. पूजा आणि गोविंद यांचे प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर गोविंदने प्लॉट, शेतजमीन, आयफोन, महागडे दागिने, बुलेट असे सर्वकाही पूजाला दिले. मात्र, पूजाच्या अपेक्षा वाढत होत्या.

गोविंदने गेवराईत आलिशान बंगला बांधला. त्या बंगल्यात गोविंद याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडील राहत. मात्र, गोविंदच्या या बंगल्यात पूजा दोन दिवस मुक्कामी गेली. तो बंगला तिला इतका जास्त आवडला की, बंगला माझ्या नावे कर म्हणून नर्तकीने तगादा लावला. दुसरा असचा बंगला देतो असे गोविंदने सांगूनही पूजा काही ऐकण्यास तयार नव्हती. नर्तकीने गोविंदसोबतचा संपर्क तोडला. पूजा बोलत नसल्याने गोविंद अधिक तणावात आला.

गोविंदने पूजाला बोलण्यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. पूजा काम करत असलेल्या कला केंद्रात तो पोहोचला. मात्र, तिथे तिची भेट होऊ शकली नाही. तिच्या मैत्रिणीला संपर्क करून त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला पूजाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पूजाने आपल्याला बोलावे याकरिता तो प्रत्येक प्रयत्न करत होता. शेवटी गोविंद बर्गे हा थेट पूजाच्या घरी तिच्या आईला भेटण्यासाठी पोहोचला.

यावेळी पूजाला समजावा ती माझ्याशी बोलत नाही…असे त्याने पूजाच्या आईला सांगितले. मात्र, पूजाच्या आईकडूनही त्याला काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. गोविंदला माहिती होते की, पूजा ही कला केंद्रात आहे…तिला समजून सांगूनही ती ऐकत नाही. किमान तिच्या आईला बोलल्यावर काही मार्ग निघेल. याकरिता तो प्रयत्न करत होता. मात्र, पूजाच्या आईकडूनही काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याने थेट पूजाच्या घराबाहेर पडत चारकाची लॉक करून स्वत:वर गोळी झाडली.