मार्केट यार्डातच जुळलं, एक वर्षापासून… केतन अग्रवाल प्रकरणात सियाबाबतची धक्कादायक माहिती समोर

केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावर मोठा अपघात झाला आणि तो मोठ्या दरीत कोसळला, असे सांगण्यात आले. मात्र, पोलिस तपासात जे काही पुढे आले, ते चक्रावणारे होते, ज्याने सर्वांचीच झोप उडाली. हा अपघात नाही तर घातपात असल्याचे स्पष्ट झाले.

मार्केट यार्डातच जुळलं, एक वर्षापासून... केतन अग्रवाल प्रकरणात सियाबाबतची धक्कादायक माहिती समोर
Ketan Agarwal case
| Updated on: Jun 24, 2026 | 11:32 AM

पुण्यातील केतन अग्रवाल याचा 400 फूट दरीत कोसळून मृत्यू झाला. सेल्फी घेत असताना केतन दरीत कोसळला, असा बनाव त्याच्या होणाऱ्या पत्नीने केला. केतन अग्रवाल याच्यासोबतचे लग्न इच्छेविरोधात होत असल्याने सिया गोयल हिने थेट होणारा पती केतन अग्रवाल याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. प्रियकराच्या मदतीने तिने केतनला दरीत ढकलून दिले. सुरूवातीला सिया हिच्याकडून हा फक्त अपघात असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, पोलिसांना संशय येताच धक्कादायक सत्य उघड झाले, ज्याचा साधा विचारही कोणी केला नव्हता. चेतन चाैधरी आणि सिया गोयल यांचे 1 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याची माहिती तिच्या कुटुंबियांना देखील होती. मात्र, तरीही तिच्या कुटुंबियांनी तिचे विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन याच्यासोबत लग्न जुळवले. दोघांचा साखरपुडा झाला होता.

उदयपूरच्या महालमध्ये यांच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नात नातेवाईकांना नेण्यासाठी थेट दोन विमानेही बुक केली होती. विशाल अग्रवाल यांना आपल्या लेकाचे लग्न धुमधडाक्यात करायचे होते. कोट्यावधी रूपये यासाठी खर्च करण्यात आले. इंडोनेशियाच्या बेटावर प्री वेडिंग शूट होते. मात्र, सिया हिला इंडोनेशियाला जायचे नसल्याने तिने थेट केतन याचा पासपोर्ट लपून ठेवला होता.

सियाने आपले बीबीएचे शिक्षण अर्धवट सोडले. तिचा प्रियकर चेतन चाैधरी यानेही आपले बीबीएसचे शिक्षण अर्धवट सोडले. सियाने पुण्यात बेकरी व्यवसाय सुरू केला. तिथेच तिची ओळख चेतन याच्यासोबत झाली. सियाचे वडील पुण्यातील ड्रायफ्रूट्स आणि मसाल्याचे मोठे व्यावसायिक आहेत. चेनतचेही वडील ड्रायफ्रूट्सचे प्रसिद्ध व्यावसायिक होते. बेकरीच्या व्यवसायात दोघांची ओळख झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

सियाच्या घरच्यांना हे नाते मंजूर नव्हते. चेतन आणि सिया यांनी संसार थाटण्याचेही स्वप्न बघितले होते. मात्र, त्यांच्यामध्ये केतन आल्याने त्याला रस्त्यातून काढण्यासाठी सुनियोजित प्लान त्यांनी तयार केला. थेट त्याला 400 फूट दरीत ढकलून दिले. मात्र, त्यांचा हा कट पोलिसांपासून फार काही जास्त वेळ लपून राहू शकला नाही. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत.

Follow Us