AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन अग्रवालला लोहगडावर जायचेच नव्हते, थेट सियाने आणला त्याच्या आईवर दबाव, खळबळजनक खुलासा..

पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली. सुरूवातीला हा अपघात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यानंतर धक्कादायक खुलासे झाले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

केतन अग्रवालला लोहगडावर जायचेच नव्हते, थेट सियाने आणला त्याच्या आईवर दबाव, खळबळजनक खुलासा..
Ketan Agarwal case
| Updated on: Jun 24, 2026 | 8:04 AM
Share

लोणावळा येथील लोहगड किल्ल्याहून पडून केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला. होणाऱ्या पत्नीसोबत केतन अग्रवाल हा लोहगड किल्ल्यावर गेला होता. तिथे सेल्फी घेत असताना खोल दरीत तो कोसळला, असे सांगण्यात आले. मात्र, पोलिस तपासात जे काही पुढे आले, ज्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांना थोडी शंका आली, त्यांनी सखोल चाैकशी केली असता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सुरूवातीला हा फक्त अपघात दाखवण्यात आला. मात्र, हा अपघात नसून शांत डोक्याने कट रचला होता. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला आपल्या रस्त्यातून काढण्यासाठी हे सर्वकाही रचले होते. केतनसोबतच्या लग्नाला सिया हिचा विरोध होता. मात्र, कुटुंबाने सिया आणि चेतन यांचे नाते माहिती असतानाही केतन याच्यासोबत तिचे लग्न जमवले.

हे लग्न असे तसे नसून उदयपूरच्या महालमध्ये ठेवण्यात आले होते. नातेवाईकांना पुण्याहून उदयपूरला जाण्याकरिता दोन विमानाने बुक करण्यात आली होती. या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. सिया हिने केतनला मारण्यासाठी सर्व नियोजन केले होते. केतन अग्रवाल याला लोहगडावर जायचे नव्हते. मात्र, याकरिता सिया त्याच्यावर दबाव टाकत होती. केतनला अगोदरच सियाच्या काही गोष्टींवर संशय येत होता.

कारण ज्या दिवशी केतनची लोहगडावर हत्या झाली, त्यादिवशी त्याल तिथे जायचे नव्हते. सिया लोहगडावर जाण्यासाठी हट्ट करत होती. केतनने तिला अनेकदा नकार दिला. मुळात म्हणजे केतन हा ट्रेकर होता, तरीही तिला लोहगडावर जाण्यासाठी नकार देत होता. केतन याने लोहगडावर जाण्यास नकार दिल्यानंतर सियाने थेट त्याच्या आईवर दबाव आणला. तिने त्याच्या आईला इमोशनल केले.

केतनच्या वडिलांनीच याबाबत खुलासा केला. केतनने लोहगडावर जाण्यास नकार दिल्यानंतर तिने त्याच्या आईला फोन केला. लोहगडावर केतनला चला म्हणून सांगा याकरिता ती त्यांना फोर्स करत होती. शेवटी सुनेचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी लोहगडावर जाण्यासाठी केतनला सांगितले, त्यानंतर तो सियाला घेऊन लोहगडावर केला आणि तिथेच त्याच्यासोबत मोठा घात झाला.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी