AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Case: केतनने वारंवार नकार दिला पण सिया ऐकलीच नाही, तिच्या प्लान बीने पोलीसही हादरले

Ketan Agarwal Case: सध्या लोणावळा येथील व्यापारी केतन अग्रवालच्या हत्येची जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नापूर्वीच होणाऱ्या पत्नीने त्याची हत्या केली. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ketan Agarwal Case: केतनने वारंवार नकार दिला पण सिया ऐकलीच नाही, तिच्या प्लान बीने पोलीसही हादरले
Ketan Agraval case new updateImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 23, 2026 | 6:05 PM
Share

लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावरुन पडून केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला. आता या मृत्यूप्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हा अपघात असल्याचे बोलले जात होते. पण पोलिसांना शंका आल्यानंतर त्यांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. हा अपघात नसून आखलेला कट असल्याचे समोर आले. तसेच राग, प्रेमविरोध आणि संतापातून हे घडवल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी मिळून ही हत्या केली. लग्न ठरल्यानंतर केतनला लोहगडावर नेऊन ढकलून मारण्याचा कट त्यांनी रचला होता. या हत्येसाठी त्यांनी तब्बल तीन वेळा प्रयत्न केले. मात्र, उंचीची भीती असल्याने केतन प्रत्येक वेळी नकार देत होता. शेवटी सिया गोयलने प्रचंड आग्रह धरल्याने तो लोहगडावर गेला आणि तिथे त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

प्लॅन ‘बी’ देखील तयार होता

पोलिसांना चेतनचे कडक उन्हात हुडी घालून फिरत असलेले सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबान्या यामुळे तपासाची दिशा पूर्णपणे हत्येकडे वळली आहे. केतनच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपींनी लोहगडवर यश न मिळाल्यास महाबळेश्वरला नेऊन खून करण्याचा दुसरा प्लॅनही तयार ठेवला होता. एवढेच नव्हे तर, काही दिवस आधी सिया गोयलने लोहगडावर आणून सापाची भीती दाखवत केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहितीही तपासात उघड झाली आहे.

भव्य लग्नाची तयारी, पण…

केतन आणि सिया यांचे लग्न ठरले होते. यासाठी १४ कोटी रुपयांचा भव्य महाल बुक करण्यात आला होता. मात्र, सियाला हे लग्न मान्य नव्हते. तिचे चेतनशी अनैतिक संबंध असल्याचेही समोर आले आहे. यामुळे तिने केतनला मार्गातून हटवण्याचा निर्धार केला. केतनच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासाचे कौतुक करत आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस दोघांना अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोहगडावरील ही हनीमून-जत्रा न राहता खून-कट बनल्याने पुण्यातील व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह