माळेगाव साखर कारखाना मतमोजणीचा पहिला कल हाती, काका की पुतण्या कोणाची बाजी ?

बारामतीच्या राजकारणात महत्वाच्या असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची (Malegaon Karkhana Election) मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या निवडणूकीला प्रतिष्ठेचे मानत स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे.

माळेगाव साखर कारखाना मतमोजणीचा पहिला कल हाती, काका की पुतण्या कोणाची बाजी ?
| Updated on: Jun 24, 2025 | 10:27 PM

बारामतीत काका आणि पुतण्या यांच्यात रंगलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निवडणूकीचा पहिला कल हाती आला आहे. या निवडणूकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या पॅनलमध्ये विजयी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महत्वाच्या साखर कारखान्यावर शरद पवार गटाचे की अजितदादांचे वर्चस्व राहणार याची उत्सुकता दाटली असतानाच पहिला कल अजितदादांच्या पॅनलचा आला आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये गट क्रमांक एक माळेगाव सर्वसाधारण ऊस उत्पादक गटामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. माळेगाव या साखर कारखान्यात विजय मिळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार तसेच शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचं आणि शेतकरी संघटनांचं अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात उतरलेली आहेत. या कारखान्याचे 19,000 हून अधिक मतदार असून 88.48 टक्के मतदान झालेले आहे. तर निवडणूक लढणाऱ्या नव्वद उमेदवारांमधून 21 संचालकांची निवड मतदार आज करणार आहेत.

माळेगाव पहिली फेरी निहाय….मोजलेली मते 8517

नीलकंठेश्वर पॅनल

बाळासाहेब तावरे : 3880

शिवराज जाधवराव : 4380

राजेंद्र बुरुंगले: 3754

सहकार बचाव शेतकरी पॅनल

रंजन कुमार तावरे : 3614

संग्राम काटे : 3446

रमेश गोफणे : 3003

श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार

तानाजी काका – ८६९

योगेश जगताप – ९९२

स्वप्नील जगताप – ९३८

सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार

रोहन कोकरे – ७५४

रणजीत जगताप – ७३९

सत्यजीत जगताप – ७९८