Explainer : जरांगेंचे आता मुंबईत उपोषण, थेट घोषणा, आतापर्यंत किती मागण्या मान्य? मराठ्यांना काय मिळालं? वाचा A टू Z

58 लाख कुणबी नोंदींवरुन 58 लाख जातप्रमाणपत्र द्या. जात वैधता समितीने रद्द केलेल्या 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी जातप्रमाणपत्र वैध करा. हैदराबाद गॅझेटप्रमाणे, सातारा कोल्हापूर इतर संस्थानांचे गॅझेट लागू करण्याचा जीआर काढा, अशा नव्या मागण्या जरांगे यांनी केलेल्या आहे.

Explainer : जरांगेंचे आता मुंबईत उपोषण, थेट घोषणा, आतापर्यंत किती मागण्या मान्य? मराठ्यांना काय मिळालं? वाचा A टू Z
manoj jarange patil and maratha reservation protest
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 2:53 PM

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा चांगलाच पेटला आहे. जरांगे यांनी येत्या मंगळवारपासून मुंबईला कूच करण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन सोमवारी आहे. असे असताना मंगळवारीच जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. म्हणजेच ऐन गणपतीतच जरांगे आंदोलकांना घेऊन मुंबईत येणार आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार? सरकार काही तोडगा काढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे यांचा मुक्काम नेमका कुठे असेल? जालन्याच्या अंतरवाली सराटीपासून ते मुंबईतलं आझाद मैदान असा 4 दिवसांचा जरांगे यांचा प्रवास असणार आहे. त्यांचा 15 सप्टेंबरला पहिला मुक्काम पाटोद्यात असेल. 16 सप्टेंबरला श्रीगोंद्यात आंदोलक थांबतील. 17 सप्टेंबरला पुण्याच्या हडपसरमध्येही एक मुक्काम असेल. त्यानंतर जरांगे आणि मराठा आंदोलक 18 सप्टेंबरला खोपोली येथे रात्रीची विश्रांती घेतील. 19 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होऊन जरांगे उपोषणाला सुरुवात करतील. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us