AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक; मुंबई दौरा पूर्ण करणार का? महत्वाची अपडेट समोर

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या मुंबई दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक; मुंबई दौरा पूर्ण करणार का? महत्वाची अपडेट समोर
manoj jarangeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 5:42 PM
Share

मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांना प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच त्यांना रुग्णालयात भरती होण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. मागील 24 तासांपासून पाणी न घेतल्याने त्यांची प्रकृती अधिक खालावल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे मुंबईचा दौरा पूर्ण करणार का, याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांना प्रवास टाळण्याबाबत आणि रुग्णालयात भरती होण्याबाबत जालना जिल्हा शल्य चिकित्सकांकडून सल्ला देण्यात आला होता. उपोषणामुळे तीव्र डिहायड्रेशन झालं आहे. त्यामुळे त्यांना मेंदू, यकृत आणि किडनी कायमच्या निकामी होण्याचा मोठा धोका आहे. लघवीच्या अहवालात ‘किटोन’ आढळले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे सद्यस्थितीत प्रवास करणे अत्यंत जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे, असा कालचा अहवाल होता. त्यानंतरही तरीसुद्धा 24 तास कुठलेच पाणी न घेतल्याने प्रकृती अधिक खालावली आहे.

मनोज जरांगेंवर चार तासांपासून उपचार

मनोज जरांगे पाटील यांच्यावर गेल्या चार तासांपासून उपचार सुरू आहे. परंतु अपेक्षित सुधारणा नसल्याने अतिदक्षता विभागात उपचाराची गरज आहे. दौऱ्याच्या ठिकाणी ICU मॉनिटर घेऊन डॉक्टर दाखल झाले आहेत. हृदयाचे ठोके, ऑक्सिजन पातळी, बीपी एकूणच जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टरांची मोठी टीम उपस्थित आहे. गेल्या चार तासांपासून उपचार सुरू असून काहीशी सुधारणा झाल्या आहे. मात्र अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे अतिदक्षता विभागात उपचार देण्याची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयांना दाखल करण्याची शक्यता आहे. त्यांना रूग्णालयात दाखल न केल्यास दौरा हा थेट अहिल्यानगर-पुणे मार्ग खोपोलीत मुक्काम करून आझाद मैदानात करण्याची शक्यता आहे. त्यात मनोज जरांगे पाटील हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधतील. यावेळी काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत