पाणी पितोय, सलाईन लावतोय पण उपोषण सोडणार नाही! जरांगे पाटलांची दोन दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. यावेळी उपोषणस्थळी भाजपा आमदार प्रसाद लाड पोहोचले होते. यावेळी त्यांनी विविध मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. पण जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी उपोषण सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे.

पाणी पितोय, सलाईन लावतोय पण उपोषण सोडणार नाही! जरांगे पाटलांची दोन दिवसांची मुदत
| Updated on: Sep 02, 2026 | 9:39 PM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. 29 ऑगस्टपासून मूळ गाव असलेल्या अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या केल्याचं जाहीरपणे सांगितलं. पण असं असूनही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. किमान चार प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचं वाटप सुरू होऊ द्या मग बघू, असं ते स्पष्टपणे म्हणाले. इतकंच काय तर हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचं वाटप मराठवाड्यातून सुरू व्हावं, असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही, यावर मनोज जरांगे पाटील ठाम राहिले. सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असं त्यांनी सर्वांसमोर जाहीर केलं.

उपोषण सोडणार की नाही? काय म्हणाले जरांगे पाटील?

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली. तेव्हा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुमच्या शब्दाचा मान राखतो, पण उपोषण सोडणार नाही. दोन दिवस सलाईन लावणार आणि पाणी पिणार, पण उपोषण सोडणार नाही, असंही ते पुढे म्हणाले. सातारा कोल्हापूर गॅझेटसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांची मुदत दिली आहे. दुसरीकडे, मुंबईत आंदोलन करणार या भूमिकेवरही जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.

‘मराठा आरक्षण श्रेयवादात अडकलं’

मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यासमोर सांगितलं की, मराठा आरक्षण श्रेयवादात अडकलं आहे, श्रेय शिंदेंनी घ्यायचं की फडणवीसांनी यावरून लढाई सुरू आहे. इतकंच काय तर मनोज जरांगे पाटील यांनी मध्यस्थी करणाऱ्या विखे पाटलांचं नाव घेऊ टीकास्त्र सोडलं. विखे पाटलांवर विश्वास ठेवला, पण ते आमची शाळा करत आहे, टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली. विखे पाटील चर्चेसाठी का येत नाहीत, असा प्रश्नही मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. विखे पाटलांकडून शिंदे आणि फडणवीस यांच्यात भांडण लावण्याचं काम सुरू आहे, असंही ते म्हणाले.  12 तारखेपर्यंत सरकार काय करतेय ते बघू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us