मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, 12 तारखेला बैठक, त्यानंतर मुंबईकडे..
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. नुकताच जरांगे यांनी मोठी घोषणा केली. दिल्लीला जाण्याबद्दल त्यांनी भाष्य केले. हेच नाही तर महत्वाची बैठक अगोदर होणार आहे. 12 तारखेला महत्वाची बैठक होईल.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यादरम्यान मोठी घोषणा केली. जरांगे पाटील मुंबईला कधी जायचे, यावर बोलताना जरांगे पाटील दिसले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, सरकारच्या हलगर्जीपणामुळे रोष वाढतोय. मुंबईकडे येतील तेव्हा पोलिसांकडून हल्ला घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. उपोषणाची वेळ येणार नाही, मंत्री म्हणाले होते. हल्ला करायचा म्हणजे सीएम बदनाम होतील, शिंदेंचे मंत्री बोलत होते. सरकारच्या हलगर्जीपणामुळे रोष वाढत आहे. मराठा समाजाने आता समजून घेणे फार गरजेचे आहे. मुंबईकडे येतील तेव्हा हल्ला करायचा, शिंदेंचे मंत्री बोलत होते. शिंदे फडणवीसांची मिलीभगत आम्हाला फसवतायत. शिंदेंच्या मंत्र्यांकडून आणि प्रवक्तांकडून प्रयत्न केली जात आहेत.
12 सप्टेंबरला मुंबईकडे जायचे आहे. आताच कोणी इकडे गर्दी करू नका. 12 तारखेला कोणी कुचराई करू नका. 12 तारीख ठरली आहे, आपल्याला मुंबईला 12 तारखेला जायचे आहे. पोलिसांचा दोष नाही सर्व दोष शिंदे आणि फडणवीसचा आहे. पोलिसांनी हल्ला केला तर पळू नका, चेंगराचेंगरी होईल. 12 तारखेला सर्व मराठ्यांनी अंतरावलीत बैठकीसाठी यायचे आहे.