
मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावरील उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये ते मोठ्या संख्येने जमले आहेत. आंदोलकांच्या गाड्यांमुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी बघायला मिळाली. कोर्टाने यावर भाष्य केल्यानंतर रात्री आंदोलकांनी रस्त्यावरील गाड्या हलवल्या. नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा देत म्हटले की, आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावणे सरकारला महागात पडेल. शिंदे समितीने मनोज जरांगे यांची भेट घेतलीये.
मनोज जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना दिसले आहेत. सरकारने भीती दाखवली तरीही आम्ही मागे हटणार नाहीत. मी तर मेलो तरीही या आझाद मैदानातून हटत नाही, काय व्हायचे ते होऊद्या. याचे दुश्मपरिणाम तुम्ही (देवेंद्र फडणवीस) जाणे आणि मराठे जाणे. मराठे काय असतात ते पुन्हा साडेतीनसे वर्षांनी बघायचे असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. सरकारला नासकी सवय लागल्याचेही त्यांनी म्हटले.
पुढे जरांगे पाटील यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे कुटील डाव खेळू लागले आहेत. देवेंद्र फडणवीस हे न्यायदेवतेला खोटी माहिती देतात. आमची सरकारसोबत चर्चा करायची तयारी आहे. 30 ते 35 मंत्री या नाही तर दोघे या आमची चर्चा करण्याची तयारी आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांचा आम्ही सन्मान करू. कबड्डी खेळायच्या आधी खो द्यायच्या नसतो, असे म्हणत त्यांनी थेट सरकारला मोठा इशारा दिला आहे.
कितीही आडवे तरीही तुम्हाला मराठ्यांची पोरं मुंबईत शनिवार रविवारच्यानंतर दिसतील. देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीमुळे हे आंदोलन सुरू आहे. मराठे मुंबईत येणार, त्यांना कोणीही अडवू शकत नाही, ते मुंबईत येणार. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात अजूनही काही नाही. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिलाय. त्यांनी आम्हाला परवानग्या दिल्या नाहीत, भाकरी दिल्या नाहीत, पाणी दिले नाही, असे म्हणताना जरांगे पाटील हे दिसले आहेत. सध्या मराठा उपसमितीचे बैठक देखील सुरू आहे.