AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही ओबीसीत गेलो नाहीत, ओबीसी आमच्यात आलाय…मनोज जरांगे पाटील यांचा आतापर्यंतचा अत्यंत मोठा दावा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन मुंबईत केले. त्यानंतर थेट सरकारने आरक्षणासंदर्भात जीआर काढला. मात्र, सरकारने ओबीसींवर अन्याय केल्याची भावना लोकांमध्ये बघायला मिळत आहे.

आम्ही ओबीसीत गेलो नाहीत, ओबीसी आमच्यात आलाय...मनोज जरांगे पाटील यांचा आतापर्यंतचा अत्यंत मोठा दावा
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 05, 2025 | 12:11 PM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणानंतर सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जीआर काढला आहे. मात्र, यानंतर ओबीसी नेते आक्रमक होताना दिसत आहेत. मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती देखील सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात केली आहे. मात्र, सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. आता त्यावर बोलताना जरांगे पाटील हे दिसले आहेत. छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करताना मनोज जरांगे पाटील हे दिसले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, आमचा हक्क आम्हाला मिळाला आहे, बाकी मराठा नेते माझ्या विरोधात का जातात हे मला माहिती नाहीये. आमचा हक्क आहे आणि मी तो मिळवलाय. मराठे हे सर्वच आरक्षणात गेली आहेत. आपल्या लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपण कोणासाठी आणि कशासाठी झुंजतोय. माझे पोरं करोडोंनी मुंबईला गेले आणि विजय घेऊन आले. हे आता काय लेखी नाहीये. याला जीआर म्हणतात.

तो पुन्हा संविधानात घालण्यासाठी पारीत केला आहे. ओबीसी आमच्यात आलाय. आम्ही ओबीसीत गेलो नाहीत. आमचे मन मोठे होते, आमच्या पुर्वजांचे. आम्ही 1881 ते आतापर्यंत आरक्षणात होतो. आम्ही अगोदरचेच आहोत. आता आमच्या एक गोष्ट लक्षात आली की, आजकाल आपल्या लेकरांना उंचीवर न्यायचे असेल आणि समाज प्रगतीकडे न्यायचा असेल तर आपल्याला आरक्षण घ्यावे लागणार आहे आणि आम्ही ते टप्प्यात टप्यात मिळवले आहे.

जीआर अगोदरच निघाला आहे, आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. छगन भुजबळ यांना जीआर चांगला कळतो आणि त्यांनी एक दोन मोठे पक्ष हाताळले आहेत. बहुमताच्या सत्ता हाताळल्या आहेत, कॅबिनेट देखील यामुळे जीआरचा चांगला अभ्यास छगन भुजबळ यांना असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. ओबीसीमधून मराठा समाजाल आरक्षण देण्यात आल्याने ओबीसी समाज आणि त्यांचे नेते हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.

Follow Us
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो