40 डिग्रीच्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु; सरकारकडून मनधरणी सुरू..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. भर उन्हात ते उपोषणाला बसले आहेत. 40 अंश सेल्सिअस तापमानात त्यांचे उपोषण सुरू आहे. सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचले आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत उपोषणाला बसले. यावेळी ना मंडप ना कुलर.. थेट आंतरवाली सराटीच्या शेतशिवारात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मे महिना सुरू अजून कडाक्याचे उन्ह पडले आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. उष्णघाताची समस्या अधिक आहे. सध्या आंतरवाली सराटीत 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान आहे. 40 अंश सेल्सिअसच्या पुढील तापमानात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या काही मागण्यांकरिता जरांगे पाटील उपोषणाला बसले. सरकारच्या शिष्टमंडळाने कालच जरांगे पाटील पाटील यांची भेट घेतली. मात्र, काही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले. जरांगे यांनी उपोषणाला सुरूवात केली.
दुसरीकडे मराठा समाज आक्रमक होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अन्य काही लोकही शेतशिवारात उपोषणाला बसली आहेत. छत्रपती संभाजीनगरहून जरांगे पाटील यांची समजूत काढण्याकरिता सरकारचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटी दाखल झाले . काल शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यादरम्यान महत्वाची चर्चा झाली.
विखे पाटील मनोज जरांगे यांची समजूत काढण्याकरिता आंतरवाली सराटीकडे आले. कडक उन्हात जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली. हेच नाही तर जरांगे पाटील यांनी मोठा इशारा देत म्हटले की, सरकारला आता इथेच चर्चा करण्याकरिता यावे लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये जरांगे यांचे उपोषण थांबावे, याकरिता सरकारकडून प्रयत्न केली जात आहेत. मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया हलगर्जी केल्याप्रकरणी कन्नडच्या उपविभागी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलीये.
काल मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. विभागीय आयुक्त सोबत झालेल्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेतली. प्रमाणपत्र वाटप दिरंगाई केल्याचे पुढे, चौकशी सुरु केली. मनोज जरांगे यांनी बाजेवर बसून उपोषणाला सुरूवात केली. सरकारला जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवण्यात यश मिळते का? हे पाहण्यासारखे ठरेल.