परळी टोळीच्या नादाला लागू नका, आम्ही… मनोज जरांगे पाटील यांचा बावनकुळे यांना थेट इशारा..
मनोज जरांगे पाटील यांनी बावनकुळे त्यांच्या टीकेने भावूक झाले, यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी पुन्हा एकदा बावनकुळे यांच्यावर हल्ला चढवला. एक वेळी तुम्हाला माफ करू पण परळीच्या टोळीला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. मराठ्यांचे जात प्रमाणपत्र अवैद्य ठरवण्याचे आदेश बीडमध्ये त्यांनीच दिल्याचा दावा केला. हेच नाही तर जरांगे यांनी थेट बाहुबली सिनेमातील कल्की स्टाईलने खिल्ली उडवली आहे. बाहुबलीतील संवाद भरसभेत बोलून दाखवला आणि बावनकुळेंचा गंभीर इशारा दिला. आआथातू अरअरअर… अरअरअर पा पा पा पपप पा तिरर्रे… असा कलकीची डायलॉगबाजी मनोज जरांगे यांनी केली. जरांगे यांच्या या डायलॉगवर सर्वांनाच धक्का बसला. हेच नाही तर वैयक्तिक टीका झाल्याने बावनकुळे भावूक झाले. बावनुकळे भावूक झाल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, बावनकुळे भावूक झाल्याचे मी बघितले. मराठा समाजाच्या आड कुणीही आला तरी त्याला गुडघे टेकायला लावतो. मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणूंन तुम्ही रडकुंडीला आलात, पुन्हा त्यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही परळीच्या टोळीच्या नादेला लागलात म्हणून तुमच्यावर ही वेळ आली, असेही जरांगे यांनी म्हटले.
पुढे मनोज जरांगे यांनी म्हटले की, तुम्ही त्यांचं ऐकून मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं. एकवेळ तुम्हाला माफ करतो, यापुढे तुमचं व्यंग करणार नही, पण परळीची टोळी तुमच्याजवळ दिसली नाही पाहिजे. 28 ऑगस्टच्या आत तुम्ही पत्र दिलेली चूक दुरुस्त करून द्या, रद्द केलेले प्रमाणपत्र वैध करून द्या. एक वेळ तुम्हाला माफ करतो पण परळीची टोळी तुमच्या जवळ दिसायला नको,यापुढे तुमचं व्यंग करणार नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात जरांगे यांनी बावनकुळे यांना टार्गेट करत त्यांच्यावर संपूर्ण दौऱ्यात हल्ला चढवला. त्यांनंतर जरांगे यांच्या टिकेवर उत्तर देताना बावनकुळे भावूक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान बावणकुळे भावूक झालेले आपण पाहिले असून एकवेळ तुम्हाला माफ करतो. मात्र तुम्ही केलेली चूक 28 ऑगस्टच्या आत दुरुस्त करा आणि रद्द केलेले प्रमाणपत्र वैध करा अशी मागणी जरांगे यांनी केलीय.