मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, तत्काळ रुग्णालयात दाखल

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. ते आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अचानकपणे त्यांच्या पोटात दुखायला लागले. परिणामी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, तत्काळ रुग्णालयात दाखल
manoj jarange patil
| Updated on: Aug 15, 2025 | 3:40 PM

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा शड्ड ठोकला आहे. त्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी सरकारला अल्टिमेटम दिले आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते राज्यभरातील मराठा समाजाच्या लोकांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत. हा मोर्चा एकदा मुंबईत आला तर काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराच जरांगे यांनी सरकारला दिलाय. दरम्यान, एकीकडे ते या मोर्चाची तयारी करत असाताना दुसरीकडे नांदेडमध्ये त्यांची प्रकृती अचानकपणे खालावली आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. ते आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अचानकपणे त्यांच्या पोटात दुखायला लागले. परिणामी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना त्रास होत असल्याचे समोर येताच डॉक्टरांनी त्यांची तत्काळ तपासणी केली. नांदेडच्या शासकीय विश्रामगरात डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जात आहे.

जरांगेंच्या बैठकीत चोर शिरला

दुसरीकडे नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील एक बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाभरातून मराठा बांधव आले होते. मात्र यावेळीच या बैठकीत चोरटे शिरल्याचे समोर आले. चोरट्यांनी अनेकांची पाकिटे पळवली आहेत. यापैकीच एक चोर चोरी करताना मराठा बांधवांच्या हाती लागला आहे. त्यानंतर मराठा बांधवांनी त्या चोराला चांगालच चोप दिला. वेळेत पोलिसांनी हस्तक्षेप करून चोरट्याला घेतले ताब्यात.

गणेशोत्सवाच्या काळात जरांगे मुंबईत धडकणार

मनोज जरांगे हे 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत. या काळात मुंबईत गणेशोत्स्ववाची धूम असणार आहे. त्यामुळेच जरांगे मुंबईत आले तर कायदा आणि सुव्यवस्थेवर ताण पडू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे सरकारकडून आतापासूनच या मोर्चासाठी नियोजन करणे चालू केले आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जरांगे यांच्या मागण्या काय आहेत?

मनोज जरांगे हे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि सरकारने सगेसोयऱ्यांबाबत काढलेला अध्यादेशही लागू करावा, अशी मागणी करत आहेत. सरकारने ऑगस्ट महिन्यापर्यंत या मागण्या पूर्ण कराव्यात, असा अल्टिमेटमही त्यांनी दिला होता. मात्र सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणूनच ते 29 ऑगस्टला मुंबईत येणार आहेत. यावेळी मराठा समाजाचे हजारो लोकही मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. याच आंदोलनाच्या नियोजनासाठी जरांगे सध्या फिरत आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.