तुम्ही अडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर.., अंतरवालीमधून जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा, वातावरण तापलं

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 12 वा दिवस असून, त्यांनी आता थेट इशारा दिला आहे.

तुम्ही अडवे या, मराठ्यांना एक  जरी काठी लागली तर.., अंतरवालीमधून जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा, वातावरण तापलं
Manoj Jarange Patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 3:06 PM

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी अतंरवालीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा बारावा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच तुम्ही अडवे या मराठ्यांना एक जरी काठी लागली तर तुमचं राजकारण एका फटक्यात संपल, असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. आज पुन्हा एकदा अंतरवाली सारटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं. तुम्ही चार लोकांची कुणबी प्रमाणपत्र रद्द केली तुम्हाला हे चागलं वाटलं का? हे खूप दिवस चालत नसतं. तुम्ही हारले आहात, तुम्ही हार मानायला पाहिजे, असा हल्लाबोल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

शिंदेंवर हल्लाबोल

दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदेंनी शहाणं व्हावं, अन्यथा एका फटक्यात संपाल, एकनाथ शिंदे यांना मराठा-मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या आहेत. तुम्ही आम्हाला वेगळ्या भाषेत धमक्या देत आहात असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकारकडून राजकीय स्टंट सुरू आहेत. हे सरकार हारलं आहे. बैठक घेऊन हे सरकार फक्त षडयंत्र रचत आहे, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us