
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची हत्या घडवून आणण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आलाय. त्यांच्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. यावर आता खुद्द मनोज जरांगे पाटील बोलले आहेत. “कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल माझ्या गोरगरीब समाजापर्यंत मला हा खरा संदेश देणं गरजेचं होतं. मराठा समाजाला आवाहन केलं की शांत रहायचं. मराठ समाजाला हात जोडून विनंती आहे की, तुम्ही शांत रहा. तुम्ही साधी काम करा. मी अवघड काम करायला आहे” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “मी आहे तो पर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. मी जे सांगणार आहे, ते सगळया क्षेत्रासाठी खूप महत्वाचं आहे. यातून सगळेच जागे होणार आहेत, ज्या घटना करुन घेणार आहे, त्याने केलेल्या घटना आतापर्यंत कोणाला माहित झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे आपण बाप ठरलो, की त्यांच्या करायच्या आधीच सगळं भांड फुटलं. आपले सुद्धा हात खूप लांब आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
“मराठा समाजाला मी एक शब्द देतो. आपण सावध, सतर्क होणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो, मराठा समाजाने शांत यासाठी रहायचं, कारण मी जो पर्यंत जिवंत आहे, तो पर्यंत तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा. मी आहे तो पर्यंत शांत रहायचं. कारण करण्याआधीच त्यांचे सगळे डावे उघडले पडलेत. माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे. आपण सावध, सर्तक नसतो, तर आरक्षण मिळालं नसतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
उद्या कदाचित तुमच्यावर वेळ येईल
“एक शब्द देतो, तुम्ही शांत रहा. तुम्ही हसला पाहिजे असं काम करुन दाखविन. आता सुखाचे दिवस आलेत. मला काय म्हणायचय ते समजून घ्या.साडेसाती गेली गावची, राज्याची, जिल्ह्याची. तुम्ही शांत राहिलात तर मला सुखाचे दिवस आणता येतील. मराठा समाज शातं राहील अशी अपेक्षा आहे. जेवढे मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत, त्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. मराठा समाजाच्या संघटना, स्वयंसेवक यांनी हा विषय सीरियस घ्या. आज माझ्यावर वेळ आली म्हणून तुम्ही मजा घ्यायची. तुमच्यावर वेळ आली आम्ही मजा बघायची असं नको. मतभेद परवडले. समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी सहज घेऊ नका. आज माझ्यावर बेतली, उद्या तुमच्यावर बेतेल. एकजीवाने अशा वृत्तीचा नायनाट करावा लागेल. त्याशिवाय हे थांबणार नाही. उद्या कदाचित तुमच्यावर वेळ येईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.