… तर आंदोलनाची वेळ आलीच नसती, जरांगे पाटलांचे वकील सुनावणीनंतर काय म्हणाले? वाचा…

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदावावर उपोषण सुरु केलं आहे. आज या आंदोलनाविरोधात सुनावणी पार पडली. यानंतर जरांगे पाटील यांचे वकील पिंगळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

... तर आंदोलनाची वेळ आलीच नसती, जरांगे पाटलांचे वकील सुनावणीनंतर काय म्हणाले? वाचा...
Jarange vakil
| Updated on: Sep 01, 2025 | 5:13 PM

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदावावर उपोषण सुरु केलं आहे. आज या आंदोलनाविरोधात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकले आणि मुंबईतील रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरूव हटवा असे आदेश सरकारला दिले आहे. तसेच आंदोलकांना मुंबईत येण्यापासून थांबवा असंही कोर्टाने म्हटलं आहे. यानंतर जरांगे पाटील यांचे वकील पिंगळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

सरकारला आंदोलनाबाबत माहिती होती

जरांगे पाटलांचे वकील पिंगळे म्हणाले की, ‘चार महिन्यापूर्वी उपोषणाची घोषणा केली. सरकारला आणि प्रशासनाला याबाबत माहिती होती. सरकारकडे निवेदन आमरण उपोषणाचं होतं. नियम 26 तारखेला आला. पहिली परवानगी मिळाली बॉम्बे पोलीस अॅक्टच्या धोरणाने मिळाली. आझाद मैदान देण्यात आलं आणि उपोषण सुरू झालं. अर्जाच्या दिवशी निरंतर परवानगीचा अर्ज केला. ज्या प्रकारे आंदोलकांचे दोन ते तीन दिवसात मानवी हक्क, आंदोलक हे आरोपी नाहीत. अन्न पाणी लाईट वीज देण्याचं गरजेचं होतं. आंदोलनाची तारीख सरकारला माहीत होतं असं वकिलांनी म्हटलं.

लोकांना त्रास देण्याचा हेतू नाही

पुढे बोलताना वकील पिंगळे म्हणाले की, सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर आंदोलनाची वेळ आलीच नसती. स्थानिक लोकांनाही त्रास झाला नसता. हीच जरांगे पाटलांची आणि मराठा आंदोलकांची इच्छा होती. पण सरकारने वेळ घेतला. सरकारने दिलेल्या वेळेत काम पूर्ण केलं नाही असा आरोप जरांगे पाटलांनी केला.

काही समाजकंटक आंदोलनात घुसले

मराठा आंदोलकांबाबत बोलताना वकील म्हणाले की, ‘काही समाजकंटक आंदोलनात घुसले आहेत. आंदोलन भरकटवण्याचा डाव आहे. घुसखोरांच्या काही वाईट गोष्टी दाखवण्यात आल्या. दादांनी कोर्टाच्या नियमाचं पालन करायला सांगितलं आहे. न्याय आणि कायदा सुव्यवस्था पाळण्यास सांगितलं आहे. आम्ही त्या पाळल्या. 5 हजार लोकांनाच थांबायला सांगितलं आहे. त्यावर जरांगे बोलतील असंही वकिलांनी म्हटलं आहे.

जरांगे पाटील भूमिका जाहीर करणार

आता मराठा आरक्षणाबाबत कोर्टात बाजू मांडणारे वकील जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत. त्यानंतर जरांगे पाटील आंदोलनाबाबत पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत. जरांगे पाटील आता काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.