AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 जूनला मराठा मोर्चा निघणारच, विनायक मेटेंचा एल्गार, मोर्चाला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका

कुठल्याही परिस्थितीत 5 जूनला मराठा मोर्चा निघणारच असा दावा विनायक मेटे यांनी आज परळीत केलाय.

5 जूनला मराठा मोर्चा निघणारच, विनायक मेटेंचा एल्गार, मोर्चाला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना
| Updated on: Jun 01, 2021 | 7:56 PM
Share

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अनेक मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही ठाकरे सरकारविरोधात मोर्चा उघडलाय. त्याचाच भाग म्हणून 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चा काढण्याची घोषणा मेटे यांनी केली आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मेटे सध्या बीड जिल्ह्यात बैठका घेत आहेत. कुठल्याही परिस्थितीत 5 जूनला मराठा मोर्चा निघणारच असा दावा मेटे यांनी आज परळीत केलाय. परळीतील विश्रामगृहात मराठा समाजाची बैठक पार पडली. त्यानंतर मेटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Vinayak Mete insists on holding Maratha Morcha on 5th June)

परळी विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले होते. विनायक मेटे यांनी बीड जिल्ह्यात मोर्चाची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई आणि परळी इथं मराठा समाजाच्या बैठका घेतल्या. या बैठकांना मराठा समाजातील लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे 5 तारखेचा मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा निघणारच असा एल्गार मेटे यांनी आज परळीत केलाय. यावेळी मोर्चाला विरोध करणाऱ्या सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आणि काही संघटनांवर जोरदार टीकाही केलीय.

विनायक मेटेंचे गृहमंत्र्यांना निवेदन

5 जून रोजीच्या मराठा मोर्चाला परवानगी देण्यासाठी विनायक मेटे यांनी 27 मे रोजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना एक निवदेनही दिलंय. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड प्रमाणात रोष आहे. 5 जून 2021 बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल याची खात्री असावी.

संभाजीराजे छत्रपती राज्यभरात मोर्चे काढण्याच्या विरोधात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोर्चे काढण्याला संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध आहे. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.

संबंधित बातम्या :

राज्याभिषेक सोहळ्यासाठी मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा; संभाजीराजे छत्रपतींचा आदेश

Chhatrapati Sambhaji raje PC Highlights : तर 7 जूनपासून रायगडावरुन आंदोलनाची सुरुवात करु : संभाजीराजे

Vinayak Mete insists on holding Maratha Morcha on 5th June

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.