दहावीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसोबत विचित्रप्रकार, धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 06, 2023 | 11:56 PM

विद्यार्थ्यांना परीक्षेला योग्य वेळत प्रश्नपत्रिका मिळाव्यात आणि ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा व्हावी यासाठी शाळांकडून काळजी घेतली जाते. पण धाराशिवमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे.

दहावीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसोबत विचित्रप्रकार, धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं?
दहावी, बारावी परीक्षा (प्रातिनिधिक फोटो)
Follow us on

धाराशिव : राज्यात सध्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या परीक्षांच्यावेळी खूप काळजी घेतली जाते. या परीक्षांसाठी राज्यातील सर्व शिक्षण विभाग कामाला लागतं. राज्यभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये काळजी घेतली जाते. विद्यार्थ्यांना परीक्षेला योग्य वेळत प्रश्नपत्रिका मिळाव्यात आणि ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा व्हावी यासाठी शाळांकडून काळजी घेतली जाते. पण धाराशिवमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे.

धाराशिव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा पेपर चुकीचा दिला गेल्याची माहिती समोर आली आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या CBSC पॅटर्नचे पेपर दिले गेले असल्याचा प्रकार शरद पवार हायस्कुल येथे घडला आहे. अशा दुर्लक्षपणामुळे 25 विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर दिला गेला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी तक्रार देऊनही दखल न घेतल्याने विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून पुन्हा पेपर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, धाराशिव येथे चुकीचा पेपर दिल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षण अधिकारी गजानन सुसर यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन भेट दिली आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा केली. झालेल्या प्रकाराचा, वस्तूस्तिथीचा अहवाल शिक्षण मंडळाकडे पाठवू आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊ. केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांच्यावर चौकशी करुन कारवाई करु, असे त्यांनी सांगितले.