AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Tariff: आता भारतावर अमेरिकेचे किती टॅरिफ? काय परिणाम होणार? महागाई भडकणार?

America Tariff on India: अमेरिका आणि भारतात राजकीय तणाव निवळल्यानंतर व्यापारी करार झाला. यामध्ये अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवले गेले. तर यापूर्वी 7 टक्के टॅरिफ अमेरिकेने कमी केले होते. आता भारतावर अमेरिकेचे किती टॅरिफ आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?

US Tariff: आता भारतावर अमेरिकेचे किती टॅरिफ? काय परिणाम होणार? महागाई भडकणार?
अमेरिका टॅरिफImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 07, 2026 | 8:41 AM
Share

US India Trade Deal: अमेरिकेने भारतावरील 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ हटवले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयीची घोषणा केली. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा फायदा होईल. अमेरिका आणि भारतात व्यापारी करार झाल्याने व्यापार पुन्हा रुळावर आला आहे. हा टॅरिफ ऑगस्ट 2025 मध्ये लावण्यात आला होता. भारताने रशियाकडून इंधन खरेदी न थांबवल्याने अमेरिकेने हे पाऊल टाकले होते. रशिया-युक्रेन युद्धात चीन, भारत आणि इतर देश इंधन खरेदी करून रशियाला आर्थिक मदत पुरवत असल्याचा ट्रम्प यांचा आरोप होता. दरम्यान अतिरिक्त 25 टक्के आणि 7 टक्के असे टॅरिफ कमी झाले आहे. आता भारतावर अमेरिकेचे किती टॅरिफ लागू आहे?

आता भारतावर किती टॅरिफ?

भारतावर अमेरिकेने एकूण 50 टक्के टॅरिफ लावले होते. 25 टक्के टॅरिफ हे रशियाकडून इंधन खरेदी केल्याने लावण्यात आले होते. तर 25 टक्के टॅरिफ हे नियमित श्रेणीतील होते. आता ट्रम्प यांच्या घोषणेनंतर रशियाकडून खरेदी करणाऱ्या इंधनामुळे लावले गेलेले 25 टक्के टॅरिफ पूर्णपणे हटवले आहे. तर नियमीत 25 टॅरिफ लावण्यात आले होते. त्यातील 7 टक्के टॅरिफ कमी झाले आहे. आता भारतावर अमेरिकेडून एकूण 18 टक्के टॅरिफ लावण्यात आलेले आहे.

भारताचे मोठे पाऊल

या घडामोडींवर व्हाईट हाऊसने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारताने निर्णायक पाऊल टाकल्याचा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय आपत्ती परिस्थिती दूर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भारताने हे आश्वासन दिले आहे की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रशियाकडून कोणत्याही प्रकारे इंधन खरेदी करणार नाही, असे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. तर भारताने अमेरिकेकडून ऊर्जा सयंत्र खरेदीचा विश्वास दाखवल्याचे ते म्हणाले. तर लवकरच दोन्ही देशात संरक्षणाविषयीची नवीन सुरुवात होण्याचे संकेतही त्यांनी दिले.

महागाई भडकणार का?

सध्या केवळ 7 टक्के इतकेच टॅरिफ आणि अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवले गेले आहे. 18 टक्के टॅरिफ कायम आहे. भारताने रशियाकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष इंधन खरेदी केल्यास हे टॅरिफ वाढवले जाऊ शकते. दंड ही आकारला जाऊ शकतो. काही दिवस अमेरिकन अधिकारी भारतीय व्यवहारावर आणि उलाढालीवर लक्ष ठेवणार आहे. यादरम्यान सगळं काही अनुकूल वाटल्यास भारतावरील 18 टक्के टॅरिफमध्ये सुद्धा कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टॅरिफ 12 टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता आहे.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप