AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलेशनशिपमध्ये असताना मित्रांसोबत फिरायचो, पण एकत्र रुम्समध्ये…, रितेश – जिनिलियाचा नात्याबद्दल मोठा खुलासा…

Genelia and Riteish Deshmukh: अभितेना रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं... अता नुकताच झालेल्या मुलाखतीत रितेश आणि जिनिलिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा...

रिलेशनशिपमध्ये असताना मित्रांसोबत फिरायचो, पण एकत्र रुम्समध्ये..., रितेश - जिनिलियाचा नात्याबद्दल मोठा खुलासा...
Genelia and Riteish Deshmukh
| Updated on: Feb 07, 2026 | 8:38 AM
Share

Genelia and Riteish Deshmukh: अभितेना रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख आज यांच्याबद्दल काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ सिनेमात दोघांची पहिली भेट झाली आणि पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं… 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जिनिलिया यांनी लग्न केलं.. आज रितेश आणि जिनिलिया चाहत्यांना कपल गोल्स देतात. पण आता दोघांच्या नात्याबद्दल एक मोठं सत्य समोर आलं आहे. खुद्द रितेश आणि जिनिलिया यांनी लग्नापूर्वीच्या रिलेशनशिपबद्दल मोठं खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र रितेश आणि जिनिलिया यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या पॉडकास्ट दरम्यान अभितेना रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सुरुवातीला जिनिलिया म्हणाली, ‘आम्ही दोघेही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. मी तेव्हा साऊथ सिनेमांमध्ये जास्त काम करायचे आणि रितेश देखील त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असायचा… व्यस्त वेळापत्रकामुळे आम्हाला फार भेटता यायचं नाही. आम्ही आमच्या कामात व्यस्त असायचो… तरी देखील एकमेकांबद्दल आम्हाला सर्व गोष्टी माहिती होत्या… तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त आमच्या करियरवर लक्ष केंद्रित केलं होतं…’ असं जिनिलिया म्हणाली.

यावर पुढे रितेश देशमुख म्हणाला, ‘आम्ही 10 वर्ष एकमेकांना डेट केलं. पण जेव्हा आमचं लग्न झालं, तेव्हाच आम्ही एकमेकांसोबत राहायला सुरुवात केली. आम्ही कायम आमच्या मित्रांसोबत फिरायला जायचो. पण आमचे रुम्स कायम वेगळे असायचे… कोणतं शुटिंग असेल तरी, आम्ही वेग-वेगळ्या रुम्समध्ये राहायचो… जेव्हा आमचं लग्न झालं, तेव्हा पहिल्यांदा आम्ही एकत्र राहायला लागलो… तेव्हाच म्हणजे लग्नानंतर आमच्या खऱ्या आणि नव्या जीवनाची सुरुवात झाली.’, आज रितेश आणि जिनिलिया चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

सांगायचं झालं तर, रितेश एका मुलाखतीत म्हणालेला, ’10 वर्षांच्या डेटिंग काळात आम्हाला कायम विचारण्यात आलं की, तुम्ही एकमेकांना डेट करत आहात का? तेव्हा मी सर्वांना म्हणायचो, ‘We are Just Goog Friends…’, त्यानंतर लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा माध्यमांसमोर गेलो, तेव्हा देखील मी त्यांना सांगितलं, ‘We are still Just Goog Friends…’, आजही दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

रितेश आणि जिनिलिया यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या माध्यमातून रितेश – जिनिलिया चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रितेशवर असणार आहे. तर जिनिलिया सिनेमाची निर्मिती करणार आहे. 1 मे 2026 मध्ये सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.