AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंच्या पक्षात महाफुट, अमित शाहांची महाराष्ट्रात एन्ट्री, राज्यात दोन दिवस तळ ठोकणार, नेमकं काय घडतंय?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची सोडली आहे, या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता अमित शाहा यांची महाराष्ट्रात एन्ट्री होणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षात महाफुट, अमित शाहांची महाराष्ट्रात एन्ट्री, राज्यात दोन दिवस तळ ठोकणार, नेमकं काय घडतंय?
अमित शाहा यांचा महाराष्ट्र दौरा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 7:30 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. सहा खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हे खासदार आता लवकरच स्वतंत्र गटाची स्थापना करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची पत्रकार परिषद पार पडली होती, या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाचे खासदार नाराज झाले आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांबद्दल अपशब्द वापरण्यात आले, त्यानंतर हे सर्व खासदार चांगलेच नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता उद्याच हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

दरम्यान एकीकडे शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, तब्बल 6 खासदार फुटले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री हे आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाहा 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. 20 जूनला त्यांची पोलीस परेड मैदान येथे जाहीर सभा होणार आहे.  या सभेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या सभेसाठी मंडप उभारण्याचं काम सध्या सुरू असून उद्या दुपारपर्यंत पूर्ण केल जाणार आहे.  धन्यवाद अमितजी असं या सभेला नाव देण्यात आलं असून, या सभेला महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं नियोजन करण्यात आलं आहे. कोल्हापुरात सध्या अंबाबाई विकास आराखड्याचे काम सुरू आहे या विकास आराखड्यासाठी केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे.

या निधीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाहा यांचा मोठा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा काही बोलणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं