मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयला मोठं यश, अखेर मास्टरमांइडला अटक, पुण्यातून उचललं
नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. सीबीयाने नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टमाइंड असलेल्या पीव्ही. कुलकर्णी याला अटक केली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. सीबीयाने नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टमाइंड असलेल्या पीव्ही. कुलकर्णी याला अटक केली आहे. सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार कुलकर्णी हाच नीट पेपर लीक प्रकरणातील मास्टमाइंड आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पीव्ही कुलकर्णी हा पुण्यात केमिस्ट्री लेक्चरर होता. तो नीट परीक्षा 2026 शी संबंधित होता. तो पेपरपर्यंत सहज पोहोचू शकत होता.
समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णीने या प्रकरणातील एक आरोपी असलेल्या मनीषा वाघमारेच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना एकत्र जमवलं. या प्रकरणात आरोपी असलेल्या मनीषा वाघमारेला 14 मे रोजीच सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार कुलकर्णीने आपल्याच घरी विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोचिंग क्लास सुरू केला. आणि याच क्लासमध्ये त्याने विद्यार्थ्यांना प्रश्न त्याचे ऑपशन्स आणि उत्तर सांगितले. त्यानंतर 3 मे रोजी नीटची परीक्षा झाली. त्यामध्ये असं आढळून आलं की, कुलकर्णीने जे प्रश्न सांगितले होते, ते सर्व प्रश्न परीक्षेत आले होते. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणात कुलकर्णीची चौकशी केली आणि त्याला पुण्यातून अटक करण्यात आलं आहे. तो मुळचा लातूरमधील रहिवासी आहे. या प्रकरणात गेल्या 24 तासांमध्ये सीबीआयने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.
या छापेमारीमध्ये सीबीआयकडून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, पुरावे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या सर्व पुराव्याची आता फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे. 12 मे रोजी शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून या संदर्भात तक्रार करण्यात आली होती, या तक्रारीच्या आधारी सीबीआयने या प्रकरणात गुन्हा नोदंवला होता, आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यापूर्वी देखील या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण देशभरात पसरले आहेत. या प्रकरणात आता सीबीआयकडून सखोल चौकशी सूरू आहे. चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.