प्रवाशांनो सावधान, मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
दिनांक 08 नोव्हेंबर रोजी रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने विविध देखभालीच्या कामासाठी रविवार 8 नोव्हेंबर रोजी मुख्य आणि हार्बरमार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड दरम्यान तसेच हार्बर मार्गावर पनवले आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉकचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी सकाळी घरातून बाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
मुख्य मार्ग (MAIN LINE)
ब्लॉक: माटुंगा आणि मुलुंड स्टेशना दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 वा. ते 3:55 वा. दरम्यान
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबईहून सकाळी 10:14 वाजता ते दु. 3:32 वाजताच्या सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकाच्या दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर चालवण्यात येतील . या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोली, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. यानंतर मुलुंड स्थानकानंतर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर या लोकल चालवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशीरा गंतव्य स्थानकावर पोहचतील.
ठाण्याहून स. 11:07 वा. ते दु. 3:51 वाजेपर्यंत प्रस्थान करणाऱ्या अप धीम्या लोकल ट्रेन मुलुंड स्टेशन ते माटुंगा स्टेशन दरम्यान अप फास्ट मार्गावर चालवल्या जातील. या ट्रेन मुलुंड, भांडुप, विक्रोली, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मांटुगा स्थानकापासून या ट्रेन पुन्हा अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. या ट्रेन आपल्या गंतव्य स्थानकांवर नेहमीच्या वेळेपेक्षा 15 मिनिटे उशीरा पोहचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सकाळी 11:00 वाजता त सायंकाळी 5:00 वाजे दरम्यान सुटणाऱ्या आणि पोहचणाऱ्या अप आणि डाऊन लोकल ट्रेन आपल्या गंतव्य स्थानी सुमारे 15 मिनिटे उशीरांनी पोहचतील.
हार्बर लाईन (HARBOUR LINE)
ब्लॉक: पनवेल आणि वाशी स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईनवर (पोर्ट लाईन वगळता ) स. 11:05 वा. ते सायं. 4:05 वाजेपर्यंत
हार्बर लाईन सेक्शन
पनवेलहून सकाळी 10:33 वाजता ते दुपारी 3:49 वाजता पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) च्या दिशेने जाणाऱ्या अप हार्बर लाईनच्या लोकल ट्रेन रद्द रहातील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) हून सकाळी 09:45 वा. ते दुपारी 3:12 वाजेपर्यंत बेलापुर/पनवेलच्या दिशने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन रद्द रहातील.
ट्रान्स-हार्बर लाईन सेक्शन
पनवेलहून सकाळी 11:02 वा. ते दुपारी 3:53 वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर लाईनच्या लोकल ट्रेन आणि ठाण्याहून स. 10:01 वाजता ते दुपारी 3:20 वाजेपर्यंत पनवेल च्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनच्या लोकल ट्रेन रद्द रहातील.
ब्लॉक काळा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई – वाशी सेक्शन दरम्यान विशेष लोकल ट्रेन चालवण्यात येतील. ब्लॉककाळा दरम्यान ठाणे – वाशी/नेरुल स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल उपलब्ध रहातील.